Thursday, 16 July 2026

कंत्राट व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी सेवा स्तर करार प्रभावीपणे राबविणे

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कंत्राट व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी सेवा स्तर करार प्रभावीपणे राबविणे, जोखीम व्यवस्थापन मजबूत करणे, प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर सातत्याने देखरेख ठेवणे आणि लवाद व न्यायालयीन वादांची संख्या कमी करण्यासाठी सुरुवातीपासूनच सक्षम करार व्यवस्था विकसित करण्यावर भर देण्यात यावा. प्रत्येक निविदेत अतिसूक्ष्म तांत्रिक अटी घालण्याऐवजी शासनाने अपेक्षित परिणाम स्पष्टपणे मांडावेत आणि त्यासाठी उद्योग क्षेत्राने नाविन्यपूर्ण उपाय सुचवावेत, असा दृष्टिकोन स्वीकारल्यास संशोधन, नवकल्पना आणि आधुनिक तंत्रज्ञानाला चालना मिळेल.

शासकीय निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेसाठी व्यापक सुधारणा कराव्यात

 शासकीय निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेसाठी व्यापक सुधारणा कराव्यात

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

धोरणात्मक निर्णयांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करणार

मुंबई, दि. १५ : राज्यातील शासकीय निविदा आणि खरेदी प्रक्रियेत सुसूत्रता, पारदर्शकता, गुणवत्ता, नाविन्यपूर्णता आणि उत्तरदायित्व वाढविण्यासाठी व्यापक सुधारणा कराव्यात, यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करावी असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मंत्रालयात शासकीय खरेदी धोरणासंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल  यासह विविध विभागांचे सचिव उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शासकीय खरेदी धोरणासंदर्भात शासनाच्या विविध विभागांकडून प्राप्त झालेल्या सूचनांवर एकमत झाले आहे. या प्रक्रियेला आता अधिकृत स्वरूप देण्याची आवश्यकता आहे. शासकीय खरेदी धोरणासंदर्भात नव्याने स्थापन होणारी समिती सध्या  शासकीय निविदा प्रकियांच्या नियमांचा अभ्यास करेल व आवश्यक सुधारणा सुचविणार आहे. त्यानंतर सुधारित नियमावलीनुसार शासन निर्णय जारी केले जातील. महालेखापरीक्षक यांच्या लेखापरीक्षणादरम्यान  प्रशासनाने घेतलेला कोणताही निर्णय संबंधित धोरण आणि नियमांच्या चौकटीत घेण्यात आला आहे की नाही, यालाच महत्त्व दिले जाते. त्यामुळे प्रत्येक प्रशासकीय निर्णय हा स्पष्ट धोरणावर आधारित असणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शालेय स्तरापासून कौशल्य शिक्षणाला विशेष

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शालेय स्तरापासून कौशल्य शिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. भविष्यात कौशल्याचे महत्त्व अधिक वाढणार असून, राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक युवक-युवतीपर्यंत, विशेषतः आदिवासी व दुर्गम भागातील तरुणांपर्यंत आधुनिक कौशल्य प्रशिक्षण पोहोचविणे ही काळाची गरज आहे. भारतीय युवकांनी आपल्या गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या बळावर जगभरात विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे त्यांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधींसाठी सक्षम बनविण्याच्या दिशेने शासन उद्योग, प्रशिक्षण संस्था आणि विविध भागीदारांच्या सहकार्याने सातत्याने कार्यरत आहे. महाराष्ट्राला अधिक कौशल्यसंपन्न राज्य बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे योगदान द्यावे."

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई-१ येथील इंटरनेट ऑफ थिंग्ज

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई-१ येथील इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) अभ्यासक्रमातील प्रशिक्षणादरम्यानच रोजगारासाठी निवड झालेल्या ११ प्रशिक्षणार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. ग्रामीण व दुर्गम भागातील युवकांना दर्जेदार कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र योजनेअंतर्गत दोन प्रशिक्षण संस्थांना इरादा पत्र प्रदान करण्यात आले. तसेच सीएसआर उपक्रमांतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना इनडोअर जिम, क्रीडा साहित्य आणि वॉटर कूलर्स उपलब्ध करून दिल्याबद्दल स्नेहधारा चॅरिटी कौन्सिलचा विशेष सत्कार करण्यात आला.

ग्रामीण व दुर्गम भागातील युवकांना दर्जेदार कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई-१ येथील इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) अभ्यासक्रमातील प्रशिक्षणादरम्यानच रोजगारासाठी निवड झालेल्या ११ प्रशिक्षणार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. ग्रामीण व दुर्गम भागातील युवकांना दर्जेदार कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र योजनेअंतर्गत दोन प्रशिक्षण संस्थांना इरादा पत्र प्रदान करण्यात आले. तसेच सीएसआर उपक्रमांतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना इनडोअर जिम, क्रीडा साहित्य आणि वॉटर कूलर्स उपलब्ध करून दिल्याबद्दल स्नेहधारा चॅरिटी कौन्सिलचा विशेष सत्कार करण्यात आला.

ग्रामीण व दुर्गम भागातील युवकांना दर्जेदार कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा ज्योतिबा

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई-१ येथील इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) अभ्यासक्रमातील प्रशिक्षणादरम्यानच रोजगारासाठी निवड झालेल्या ११ प्रशिक्षणार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. ग्रामीण व दुर्गम भागातील युवकांना दर्जेदार कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र योजनेअंतर्गत दोन प्रशिक्षण संस्थांना इरादा पत्र प्रदान करण्यात आले. तसेच सीएसआर उपक्रमांतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना इनडोअर जिम, क्रीडा साहित्य आणि वॉटर कूलर्स उपलब्ध करून दिल्याबद्दल स्नेहधारा चॅरिटी कौन्सिलचा विशेष सत्कार करण्यात आला.

वर्ल्डस्किल्स शांघाय 2026 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व

 वर्ल्डस्किल्स शांघाय 2026 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडल्या गेलेल्या महाराष्ट्रातील पाच राष्ट्रस्तरीय विजेत्यांचा रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. तसेच वर्ल्डस्किल्स शांघाय 2026 स्पर्धेत या स्पर्धकांनी सुवर्ण पदक प्राप्त केल्यास ५ लाख रुपये रोख, रौप्य पदक मिळवणाऱ्या विजेत्यास ३ लाख रुपये आणि कांस्य पदक मिळवणाऱ्या स्पर्धकास २ लाख रुपये देण्याची घोषणा मंत्री  लोढा यांनी केली.

Featured post

Lakshvedhi