Thursday, 25 June 2026

महासारथीमुळे योजनांची अचूक अंमलबजावणी शक्य

 महासारथीमुळे योजनांची अचूक अंमलबजावणी शक्य

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महासारथी  अंतर्गत तयार करण्यात आलेला एकात्मिक डेटा पूल केवळ शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच उपयुक्त ठरणार नाही, तर भविष्यातील योजना तयार करणे, त्यांचे नियोजन करणे आणि लक्ष्यित पद्धतीने अंमलबजावणी करणे यासाठीही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.या प्रणालीमुळे लाभार्थ्यांचे डुप्लिकेशन टाळणे, योजनांतील गैरवापर ओळखणे आणि पात्र नागरिकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय योजनांचा लाभ मिळवून देणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

महा-एआय मॉडेलद्वारे डेटा-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल

 महा-एआय मॉडेलद्वारे डेटा-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने

 शासनाचे महत्त्वाचे पाऊल

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•          महासारथी, महाडीबीटी २.०, डिजिटल हयातीचा दाखला आणि राज्याच्या महा एआय मॉडेलचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण

 

मुंबई, दि. २४ : नागरिकांचे जीवन अधिक सुलभ करण्यासाठी राज्य शासन सातत्याने तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. राज्याच्या एआय मॉडेलद्वारे ज्ञानाधारित आणि डेटा-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने महाराष्ट्राने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. या नवीन उपक्रमांमुळे राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक वेगाने, सुलभतेने आणि पारदर्शकपणे उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

विधानभवन येथे महासारथी, महाडीबीटी २.०, सेवा केंद्रांचे मानकीकरण, डिजिटल लाईफ सर्टिफिकेट आणि राज्याच्या एआय मॉडेलच्या लोकार्पणप्रसंगी बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, सर्व विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, व्ही.सी.द्वारे, सर्व विभागीय आयुक्त, सर्व पोलीस महानिरीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक, सर्व जिल्हाधिकारी, सर्व आयुक्त महानगरपालिका, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व पोलीस अधीक्षक  बैठकीला उपस्थित  होते. यावेळी लाभार्थी मधुकर मोरे व वत्सला पाटील यांना हयातीच्या दाखल्याचे वितरण करण्यात आले.

Wednesday, 24 June 2026

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी

अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. २३ : राज्य शासनाने २०२५-२६ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ऑनलाईन आवेदने मागविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी २७ जून, २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून https://forms.gle/EgZ२६६AqNDxFJDZW या लिंकवर नावनोंदणी सुरू करण्यात येणार आहे. या अनुषंगाने राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांमधील इच्छुक शिक्षकांनी दिनांक १० जुलै, २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन आवेदन करावे, असे आवाहन शिक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज अणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जात असल्याची माहिती शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील सात मान्यवरांना ‘पद्म' पुरस्कार प्रदान

 महाराष्ट्रातील सात मान्यवरांना पद्म' पुरस्कार प्रदान

 

नवी दिल्ली, दि. 23 : देशातील महत्वाचे नागरी सन्मान असलेल्या पद्म पुरस्कारांचेवितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानपूर्वक करण्यात आले. महाराष्ट्रातील सात मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरविण्यात आले.

राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडपयेथे आयोजित या समारंभास  उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यासह अन्य केंद्रीय मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते.

पद्म पुरस्कार वितरणाच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरातील 65 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये 2 पद्मविभूषण, 7 पद्मभूषण आणि 56 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील मान्यवरांपैकी प्रसिद्ध पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. 16 हून अधिक भाषांमध्ये 2 हजारांपेक्षा अधिक गीते गाऊन त्यांनी भारतीय संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.

सहा मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार

क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हिटमॅनम्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्मा यांनी भारतीय क्रिकेटला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. आर्मिडा फर्नांडिस यांना पद्मश्री प्रदान करण्यात आला. भारतातील नवजात शिशुवैद्यकशास्त्राच्या अग्रणी तज्ज्ञांपैकी एक असलेल्या डॉ. फर्नांडिस यांनी 1989 मध्ये मुंबईतील सायन रुग्णालयात आशियातील पहिली मानवी दूध बँक सुरू केली. अकाली आणि दुर्बल नवजात बालकांचे प्राण वाचविण्यात त्यांच्या कार्याचा मोठा वाटा आहे.

वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे 89 वर्षीय तारपावादक भिकल्या लाडक्या धिंडा यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. बांबू आणि सुक्या भोपळ्यापासून तयार होणारे सुमारे 10 फूट लांबीचे तारपा वाद्य वाजविण्याच्या त्यांच्या कौशल्याला राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले.

अभिनेते, पटकथा लेखक, निर्माते आणि दिग्दर्शक आर. माधवन यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अलैपायुथे’, ‘रहना है तेरे दिल में’, ‘थ्री इडियट्स’, ‘तनू वेड्स मनू’, ‘विक्रम वेधायासारख्या चित्रपटांतील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली आहे. रॉकेट्री : द नंबी इफेक्टया चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली.

ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमी या तिन्ही माध्यमांमध्ये चार दशकांहून अधिक काळ त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या वतीने हा पुरस्कार त्यांचे बंधू अरविंद मामनिया यांनी स्वीकारला.

उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अशोक खाडे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. माझगाव डॉकमध्ये नोकरी करत असताना अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून त्यांनी 1992 मध्ये भावांसह दास ऑफशोअरकंपनीची स्थापना केली. आज ही कंपनी देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते.

यंदाच्या पद्म पुरस्कारांसाठी एकूण 131 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कारार्थींमध्ये 19 महिलांचा समावेश असून 16 मान्यवरांना मरणोत्तर सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

0000

बालविवाह प्रतिबंधासाठी आदिशक्ती समित्यांकडून विशेष मोहीम राबविण्यात

 बालविवाह प्रतिबंधासाठी आदिशक्ती समित्यांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत असून, रोखण्यात आलेल्या बालविवाहांची तसेच नोंदविण्यात आलेल्या प्रकरणांची माहिती संकलित केली जात आहे. या माहितीच्या आधारे विभागाकडून पुढील धोरणात्मक निर्णय घेतले जात असल्याचेही मंत्री तटकरे यांनी सांगितले.

आदिशक्ती अभियानाचा उल्लेख करताना

 आदिशक्ती अभियानाचा उल्लेख करताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, राज्यात आतापर्यंत २४ हजारांहून अधिक आदिशक्ती समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्यांमार्फत गावपातळीवर कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना, शाळाबाह्य मुलींची संख्या, विधवांची परिस्थिती, मुलींच्या उच्च शिक्षणाची स्थिती तसेच महिलांना मिळणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या लाभांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

प्रत्येक आदिशक्ती समितीच्या अध्यक्षपदी महिला असून, निवृत्त पोलीस अधिकारी किंवा शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, आरोग्य सेविका तसेच स्वच्छता क्षेत्रातील महिला कार्यकर्त्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत. या माध्यमातून शासकीय यंत्रणा आणि स्थानिक समाज यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्याच वर्षात इतक्या मोठ्या संख्येने समित्या कार्यरत होणे हे ग्रामीण भागातील महिलांच्या नेतृत्वक्षमतेचे आणि सहभागाचे द्योतक असल्याचे त्यांनी नमूद केले.

विधवा दिना’ऐवजी ‘एकल महिला दिन’ ही संकल्पना आणि एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण या निर्णयांमागे

 आई वडिलांच्या नावाचा संयुक्त उल्लेख, ‘विधवा दिनाऐवजी एकल महिला दिनही संकल्पना आणि एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण या निर्णयांमागे व्यापक सामाजिक परिवर्तनाचा दृष्टिकोन असल्याचे त्यांनी नमूद केले. एकल महिलाही ओळख महिलांनी अभिमानाने स्वीकारावी आणि विधवाहा शब्द हळूहळू वापरातून कमी व्हावा, हीच या उपक्रमामागील भूमिका असल्याचे त्या म्हणाल्या.

आदिशक्ती अभियानाचा उल्लेख करताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, राज्यात आतापर्यंत २४ हजारांहून अधिक आदिशक्ती समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्यांमार्फत गावपातळीवर कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना, शाळाबाह्य मुलींची संख्या, विधवांची परिस्थिती, मुलींच्या उच्च शिक्षणाची स्थिती तसेच महिलांना मिळणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या लाभांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

Featured post

Lakshvedhi