Saturday, 13 June 2026

योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी

 योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी

- मंत्री जयकुमार रावल
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर महावाणिज्यदूत आणि मानद वाणिज्यदूतांसाठी विशेष योग सत्र
मुंबई, दि. 13 : योग ही भारताने जगाला दिलेली सर्वात मौल्यवान देणगी आहे. योग केवळ शारीरिक व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांच्यात सुसंवाद निर्माण करणारी जीवनपद्धती असल्याचे प्रतिपादन पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी आज केले. आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 च्या पार्श्वभूमीवर सर्व देशांच्या महावाणिज्यदूत व मानद वाणिज्यदूतांसाठी आयोजित केलेल्या विशेष योग सत्राच्या उदघाट्नप्रसंगी ते बोलत होते.
राजशिष्टाचार विभाग आणि कैवल्यधाम योग संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मरीन ड्राईव्ह येथील संस्थेच्या सभागृहात शनिवारी सकाळी हे विशेष सत्र उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. मंत्री श्री रावल यांच्या हस्ते योग सत्राचे उद्घाटन झाले.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक शंखनादाने करण्यात आली. त्यानंतर कैवल्यधाम संस्थेचे विश्वस्त निवित श्रीवास्तव यांनी मंत्री जयकुमार रावल यांचे स्वागत केले. कैवल्यधाम या भारतातील सर्वात जुन्या योग संशोधन व शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वामी कुवलयानंद यांच्या प्रतिमेस मंत्री श्री रावल आणि मान्यवरांनी पुषार्पण केले.
यावेळी मंत्री श्री रावल म्हणाले, आंतरराष्ट्रीय योग दिनाला संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेली जागतिक मान्यता ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे योगाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. विविध देश, संस्कृती आणि परंपरांतून आलेल्या समाजास आरोग्य, शांतता आणि आनंद या समान मूल्यांनी जोडण्याचे सामर्थ्य योगामध्ये आहे. योगाच्या शास्त्रीय परंपरेचे जतन आणि प्रसार करण्यासाठी कैवल्यधाम संस्थेने केलेल्या शतकोत्तर कार्याचे कौतुक त्यांनी यावेळी केले.
यावेळी कैवल्यधाम योग संस्थेच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांनी उपस्थितांना विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करून त्यांचे आरोग्यविषयक लाभ समजावून सांगितले. योग सत्रात युगांडा, अर्जेंटिना, न्यूझीलंड, बांगलादेश, ब्रिटन, घाना, जपान, युक्रेन, फ्रान्स, झेक प्रजासत्ताक, सिंगापूर, इजिप्त, नॉर्वे, ब्राझील, मॉरिशस, थायलंड, तुर्की, कॅनडा, आयर्लंड, येमेन, बेलारूस, मेक्सिको, श्रीलंका, दक्षिण कोरिया, पेरू आणि ग्रीस आदी 26 देशांचे महावाणिज्यदूत, वाणिज्यदूत, उच्चायुक्त तसेच त्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले.
आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जून रोजी जगभर साजरा केला जातो. या उपक्रमामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधींना भारतीय संस्कृती आणि योग परंपरेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. उपस्थित मान्यवरांनीही या उपक्रमाचे कौतुक करून योगाच्या जागतिक प्रसारासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

पावसाळ्यात पूर परिस्थितीचे नियोजन करताना रेल्वे, महापालिका, बेस्ट आणि, जिल्हाधिकारी कार्यालये, मेट्रो आणि अन्य प्राधिकरणे

 पावसाळ्यात पूर परिस्थितीचे नियोजन करताना रेल्वे, महापालिका, बेस्ट आणि, जिल्हाधिकारी कार्यालये, मेट्रो आणि अन्य प्राधिकरणे यांनी इंटिग्रेटेड प्लॅन तयार करुन समन्वयाने काम करा, अशा सूचना मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज केल्या.

मुंबईतील रेल्वेच्या हद्दीत येणाऱ्या नालेसफाईच्या कामाचा व मान्सून पुर्व कामाचा आढावा घेण्यासाठी मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. शेलार यांनी पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात समन्वय बैठक घेतली. या बैठकीला मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे, मध्य रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक हिरेश मिणा, पश्चिम रेल्वेचे विभागीय महाव्यवस्थापक पंकज सिंग यांच्यासह मुंबई शहर आणि उपनगराचे जिल्हाधिकारी, महापालिका, रेल्वे, फायर ब्रिगेडचे अधिकारी उपस्थित होते.
पश्चिम रेल्वेने सांगितले की, पाण्याचा निचरा करण्यासाठी चर्चगेट ते विरार या दरम्यान एकुण 15 मायक्रो टनेल रेल्वे ट्रॅक खालून करण्यात आले असून या वर्षात 4 मायक्रो टनेल पूर्ण करण्यात आले आहे. तर पाणी उपसण्यासाठी पंपांची संख्या वाढवून यावेळी 126 पंप बसवण्यात आले आहेत तर 2400 व्हँगन इतका गाळ काढण्यात आला आहे. तर मध्य रेल्वेच्या मार्गावर ही पंपाची संख्या वाढवण्यात आली असून 220 पंप बसवण्यात आले आहेत. 350 किलोमिटर लांबीच्या मार्गावरील 160 नाले व गटारांची सफाई करण्यात आली आहे. दोन्ही मार्गावर सीसीटीव्ही कँमेरे आणि पर्जन्यमापक बसवण्यात आले आहेत. यावेळी कांजूर मार्ग येथील उषा नगर नाला आणि कुर्ला येथील ब्राम्हणवाडी नाल्याच्या खोली करण आणि रुंदीकरणाची कामे करण्यात आल्याने पाण्याचा निचरा वेगाने होऊ शकेल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले.
दरम्यान दोन्ही रेल्वेचे सादरीकरण झाल्यानंतर मुंबई महापालिका आणि फायर ब्रिगेडने त्यांच्या काही सूचनाही केल्या. पुर्वी पेक्षा आता रेल्वे आणि महापालिका यामध्ये समन्वय अधिक चांगल्या प्रकारे होत असल्याचे दोन्ही कडून सांगण्यात आले.
पालकमंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले की, दुर्दैवाने पूर परिस्थिती निर्माण झाली तर ज्या रेल्वे स्टेशनवर गर्दी होईल अशा रेल्वे स्टेशन मधून गर्दी बाहेर काढणे, बाहेरच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करणे, प्रवाशांना पाणी, अन्नपदार्थ देणे या एकुण परिस्थितीचा इंटिग्रेटेड प्लॅन तयार करा, तसेच दोन्ही प्राधिकरणाच्या सीसीटीव्ही आणि सुचना देणारी यंत्रणा, आपत्कालीन कक्ष यामध्ये समन्वय ठेवा, रेल्वे स्टेशन मधील आणि बाहेरील पादचारी पुल, वाहतूकीचे पुल, रेल्वे स्टेशन परिसरातील होर्डिंग या सगळ्यांचे स्ट्रक्चरल आँडिट करा, रेल्वे आणि महापालिका यांचे पंप यांचा ही इंटिग्रेटेड प्लँन तयार करण्यात यावा अशा सूचना मंत्री शेलार यांनी केल्या. तसेच मस्जिद बंदर आणि परिसरातील रेल्वे हद्दीत येणाऱ्या व धोकादायक ठरलेल्या 24 इमारती आणि काही झोपड्या यांचे पुनर्वसन व तेथील रहिवासी याबाबत ही सविस्तर अहवाल तयार करुन शासनाकडे पाठवा, अशा सूचनाही मंत्री ॲड.शेलार यांनी केल्या.

राज्याच्या नव्या विकास आराखड्यात धुळे व नंदुरबारला महत्वाचे स्थान

 राज्याच्या नव्या विकास आराखड्यात धुळे व नंदुरबारला महत्वाचे स्थान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, धुळे जिल्ह्याने अनेक दशकांपासून महाराष्ट्राला समृद्ध केले आहे. या भागातील मानवी संसाधने, उद्योग, शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील क्षमता लक्षात घेऊन राज्याच्या नव्या विकास आराखड्यात या दोन्ही जिल्ह्यांना महत्वाचे स्थान दिले जाणार आहे.

धुळे-नंदुरबारला राज्याच्या विकासाचे नवे ‘ग्रोथ इंजिन’ बनवणार

 धुळे-नंदुरबारला राज्याच्या विकासाचे नवे ग्रोथ इंजिनबनवणार

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•       अण्णासाहेब चुडामण पाटील यांच्या अजिंक्यचरित्रग्रंथाचे प्रकाशन

•       ‘अजिंक्यचरित्रग्रंथातून संघर्ष, नेतृत्व, राष्ट्रप्रेम आणि समाजसेवेची प्रेरणा मिळेल

 

मुंबई, दि.१२ : धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये प्रचंड विकासक्षमता आहे. राज्याच्या विकासाला नवी गती देणारी ग्रोथ इंजिन्सम्हणून या दोन्ही जिल्ह्यांचा विकास करण्याचा शासनाचा निर्धार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

एनसीपीए येथील टाटा थिएटरमध्ये आयोजित माजी खासदार दिवंगत अण्णासाहेब उपाख्य चुडामण पाटील यांच्या 'अजिंक्य' या जीवनचरित्राच्या  प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री  पंकज भोयर, खासदार शोभाताई बच्छाव, आमदार अमरीशभाई पटेल, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, सौरभ शुक्ला, विनय सहस्रबुद्धे , कुणाल पाटील, माजी आमदार जयंत पाटील, चित्रा वाघ उपस्थित होते.


महाडीबीटी पोर्टल, पीएम किसान योजना, पीक कापणी प्रयोग, पीक पेरणी नोंदी, किड व रोग सर्वेक्षण, महाकृषी ॲप,

 कृषी विभागाच्या विविध योजना आणि उपक्रमांची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर डिजिटल माध्यमातून होत आहे. महाडीबीटी पोर्टल, पीएम किसान योजना, पीक कापणी प्रयोग, पीक पेरणी नोंदी, किड व रोग सर्वेक्षण, महाकृषी ॲप, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, हवामान व आपत्कालीन संदेश, निविष्ठा नियोजन तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कृषी उपक्रमांची माहिती क्षेत्रीय स्तरावरून ऑनलाइन अद्ययावत करावी लागते.

सध्या या कामासाठी क्षेत्रीय कर्मचारी मोबाईलचा वापर करत असून अनेक वेळा कार्यालयातील संगणकांवर अवलंबून राहावे लागते. तसेच गुगल स्प्रेडशीटसह विविध डिजिटल प्रणालींमध्ये माहिती अद्ययावत करण्यासाठी तालुका किंवा मंडळ कार्यालयात जावे लागत असल्याने कामकाजावर परिणाम होत होता.  या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय कर्मचारी वर्गात लॅपटॉप पुरवठा करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना 2021 पासून तसेच कृषी पर्यवेक्षक संघटना 2023 पासून करते आहे. या संघटनांसोबत आयुक्तालय स्तरावर तसेच मंत्रालय स्तरावर बैठका घेऊन त्यांची अडचण व मागणी समजावून घेण्यात आली आहे. या मागणीची दखल घेत शासनाने २०२५-२६ मध्ये या प्रस्तावाला प्राधान्याने मान्यता दिली

लॅपटॉपमुळे डिजिटल कृषी प्रशासनाला चालना

 लॅपटॉपमुळे डिजिटल कृषी प्रशासनाला चालना

- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

 

·         शेतकऱ्यांना योजनांचा लाभ अधिक वेगाने मिळणार

·         दहा वर्षाच्या मागणीला यश; १३,२७५ क्षेत्रीय कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणार अत्याधुनिक लॅपटॉप

·         पंधरा दिवसांत क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लॅपटॉपचे वितरण

 

मुंबई, दि. १२ : "महाराष्ट्र हे खास कृषीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) धोरण स्वीकारणारे देशातील पहिले राज्य आहे. शासनाच्या कृषी योजनांची अंमलबजावणी आणि लाभार्थी सेवा आता मोठ्या प्रमाणावर डिजिटल माध्यमातून होत आहेत. त्यामुळे कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेला आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करणे ही काळाची गरज आहे. क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लॅपटॅापसारखी आवश्यक डिजिटल साधनसामग्री उपलब्ध झाल्यामुळे योजनांची माहिती तात्काळ ऑनलाइन नोंदविणे, कागदपत्रे अपलोड करणे आणि शेतकऱ्यांच्या अर्जांवर तत्पर कार्यवाही करणे अधिक सुलभ होणार आहे. परिणामी, शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळण्यास होणारा विलंब कमी होऊन सेवा वितरण अधिक वेगवान आणि प्रभावी होईल. अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

राज्यातील १३,२७५ क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्यासाठी १०९ कोटी रुपयांच्या निधीस शासनाने मान्यता दिली आहे. सदर लॅपटॉपचा पुरवठा जुलै २०२६ अखेर पूर्ण होण्याचे नियोजन असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांपर्यंत ते पोहोचविण्यात येतील. पुरवठादाराकडून प्राप्त होणाऱ्या प्रत्येक लॅपटॉपची १०० टक्के गुणवत्ता तपासणी करण्यात येणार असून ही तपासणी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे या स्वतंत्र त्रयस्थ संस्थेमार्फत केली जाणार आहे.

‘वेव्हज् डॉक बाजार’ आयोजित करण्यात येणार आहे. डॉक बाजारसाठी १५५ प्रस्ताव

 महोत्सवादरम्यान १० मास्टरक्लास, नॉलेज सिरीज, भारतीय माहितीपट निर्माते संघटनेचा (IDPA) ओपन फोरम तसेच दुसऱ्या आवृत्तीतील वेव्हज् डॉक बाजारआयोजित करण्यात येणार आहे. डॉक बाजारसाठी १५५ प्रस्ताव प्राप्त झाले असून निवडक प्रकल्पांना मार्गदर्शन व उद्योग क्षेत्रातील व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.

चित्रपटनिर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर लक्षात घेऊन एल अँड टी माइंडट्रीच्या सहकार्याने एआय फिल्ममेकिंग हॅकाथॉनचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रकाश मगदूम यांनी यावेळी सांगितले.

महोत्सवाचे उद्घाटन व समारोप प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिरात होणार आहे. एनएफडीसीच्या पाच प्रदर्शन स्थळांबरोबरच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT), तसेच बांद्रा आणि विलेपार्ले येथील दोन महाविद्यालयांमध्येही चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे.

 

महोत्सवात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विभागांमध्ये एकूण १८ पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून एकूण पारितोषिक रक्कम ४५ लाख रुपये आहे. याशिवाय १० लाख रुपयांचा प्रतिष्ठेचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहे. यंदा व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरील चरित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

Featured post

Lakshvedhi