धुळे-नंदुरबारला राज्याच्या विकासाचे नवे ‘ग्रोथ इंजिन’ बनवणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• अण्णासाहेब चुडामण पाटील यांच्या ‘अजिंक्य’ चरित्रग्रंथाचे प्रकाशन
• ‘अजिंक्य’ चरित्रग्रंथातून संघर्ष, नेतृत्व, राष्ट्रप्रेम आणि समाजसेवेची प्रेरणा मिळेल
मुंबई, दि.१२ : धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये प्रचंड विकासक्षमता आहे. राज्याच्या विकासाला नवी गती देणारी ‘ग्रोथ इंजिन्स’ म्हणून या दोन्ही जिल्ह्यांचा विकास करण्याचा शासनाचा निर्धार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
एनसीपीए येथील टाटा थिएटरमध्ये आयोजित माजी खासदार दिवंगत अण्णासाहेब उपाख्य चुडामण पाटील यांच्या 'अजिंक्य' या जीवनचरित्राच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार शोभाताई बच्छाव, आमदार अमरीशभाई पटेल, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, सौरभ शुक्ला, विनय सहस्रबुद्धे , कुणाल पाटील, माजी आमदार जयंत पाटील, चित्रा वाघ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment