Friday, 5 June 2026

राष्ट्रीय ई-शासन पुरस्कारांमध्ये नंदुरबार, पुणे आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड

 राष्ट्रीय ई-शासन पुरस्कारांमध्ये नंदुरबार, पुणे आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड

 

नवी दिल्ली, दि. ४ : ई-शासन उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या २९ व्या राष्ट्रीय ई-सुशासन पुरस्कार २०२६ मध्ये महाराष्ट्र राज्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. केंद्र सरकारतर्फे घोषित करण्यात आलेल्या राष्ट्रीय विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा परिषद, पुणे महानगरपालिका आणि सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायत यांच्या महत्त्वपूर्ण डिजिटल उपक्रमांचा समावेश झाला आहे.

 

प्रशासनातील गतिमानता, पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावी विस्तार या निकषांवर यंदाच्या पुरस्कारांची निवड करण्यात आली आहे. देशभरातून निवड झालेल्या एकूण १७ महत्त्वपूर्ण उपक्रमांमध्ये महाराष्ट्रातील तीनही प्रकल्पांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या पुरस्कारांमध्ये प्रथमच ग्रामपंचायत या स्वतंत्र श्रेणीचा समावेश करण्यात आला असून ग्रामीण भागातील सेवा वितरणाच्या डिजिटायझेशनमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उपक्रमांची दखल घेण्यात आली आहे.

 

महाराष्ट्रातील निवड झालेल्या तीनही उपक्रमांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि कार्यक्षम करण्यामध्ये यश मिळवले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना जलद, दर्जेदार आणि तंत्रज्ञानस्नेही आरोग्य सेवा उपलब्ध करून देणाऱ्या आरोग्य विभागाच्या ई-आरोग्य धमनीया उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात येणार आहे.

 

तसेच, नागरी प्रशासनात पारदर्शकता वाढवून महापालिकेच्या विविध सेवा नागरिकांना एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या पुणे ३६० या नाविन्यपूर्ण उपक्रमाचीही राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

 

कोकण भवनात ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे कार्यालय सुरू विविध योजनांसह 50 कोटींचा निधी मंजूर

 कोकण भवनात ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे कार्यालय सुरू

 विविध योजनांसह 50 कोटींचा निधी मंजूर

नवी मुंबई दि. 03(विमाका):- ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा वृद्धापकाळ सुखाचा आणि सन्मानाचा घालवता यावा, यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत स्थापन करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे कार्यालय कोकण भवन येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. अशी माहिती ज्येष्ठ नागरिक महामंडळाचे सहव्यवस्थापक यांनी दिली आहे.

 या महामंडळाच्या माध्यमातून ज्येष्ठांचे सामाजिक जीवन सुसह्य करणे, त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुस्थितीत राखणे, आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, तसेच त्यांना हक्काचे विमा संरक्षण आणि वैद्यकीय मदत मिळवून देणे शक्य होणार आहे. याशिवाय वृद्धापकाळात होणारी छळवणूक, जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण आणि निवारा यांसारख्या अत्यंत संवेदनशील बाबींवरही हे महामंडळ विशेष लक्ष केंद्रित करणार आहे

Give Priority to Local Residents in Small-Scale and Ancillary Works at Vadhvan Port

 Give Priority to Local Residents in Small-Scale and Ancillary Works at Vadhvan Port Project – MLA Vilas Tare


# Meets JNPA Chairman and Managing Director IAS Gaurav Dyal in Person


Navi Mumbai / Palghar (Representative)  – MLA Vilas Tare of the Boisar Assembly Constituency has urged that priority be accorded to local sons of the soil, tribal communities, and project-affected persons in the small-scale, ancillary, and support works associated with the proposed Vadhvan Port Project. In this regard, he personally met Shri Gaurav Dyal, IAS, Chairman and Managing Director of the Jawaharlal Nehru Port Authority (JNPA) and the concerned authority for the Vadhvan Port Project, and submitted a written memorandum highlighting the demand.

Speaking on the occasion, MLA Vilas Tare stated that the proposed Vadhvan Port Project in Palghar district is an ambitious and developmental project of national importance. A significant portion of the project falls within the jurisdiction of the Boisar Assembly Constituency. The project is expected to have both direct and indirect impacts on local residents, tribal communities, fishing communities, and other project-affected families residing in the surrounding villages.

वाढवण बंदर में लघु उद्योगों में स्थानीय लोगों को प्राथमिकता दें –

 वाढवण बंदर में लघु उद्योगों में स्थानीय लोगों को प्राथमिकता दें – विधायक विलास तरे


जे.एन.पी.ए. अध्यक्ष एवं प्रबंध निदेशक आई.ए.एस. गौरव दयाल से की प्रत्यक्ष मुलाकात


नवी मुंबई / पालघर। (प्रतिनिधि) – प्रस्तावित वाढवण बंदर परियोजना के अंतर्गत लघु एवं सहायक कार्यों में स्थानीय भूमिपुत्रों, आदिवासियों तथा परियोजना प्रभावित नागरिकों को प्राथमिकता दी जाए, ऐसी मांग बोईसर विधानसभा के विधायक विलास तरे ने जे.एन.पी.ए. अध्यक्ष एवं प्रबंध निदेशक आई.ए.एस. गौरव दयाल (वधावन बंदर प्राधिकरण) से प्रत्यक्ष मुलाकात कर लिखित निवेदन सौंपते हुए की।

इस अवसर पर विधायक तरे ने कहा कि, पालघर जिले में प्रस्तावित वाढवण बंदर देश की दृष्टि से अत्यंत महत्वाकांक्षी एवं विकासोन्मुख परियोजना है तथा इस परियोजना का बड़ा हिस्सा मेरे बोईसर विधानसभा क्षेत्र से संबंधित है। इस परियोजना के कारण क्षेत्र के अनेक गांवों के स्थानीय नागरिकों, आदिवासी भाइयों, मछुआरा समुदाय तथा अन्य परियोजना प्रभावित परिवारों पर प्रत्यक्ष एवं अप्रत्यक्ष प्रभाव पड़ने वाला है।

वाढवण बंदर परियोजना के निर्माणकाल तथा भविष्य में परियोजना से संबंधित विभिन्न लघु, सहायक एवं पूरक कार्यों के बड़े पैमाने पर अवसर उपलब्ध होंगे। इनमें परिवहन, सुरक्षा, स्वच्छता, रखरखाव, कार्यालयीन सहायता, निर्माण कार्यों से संबंधित लघु ठेका कार्य, सामग्री आपूर्ति, मशीनरी सहायता, भोजन व्यवस्था, लॉजिस्टिक सेवाएं तथा अन्य विभिन्न सेवा क्षेत्रों में रोजगार एवं व्यवसाय के अवसर उपलब्ध होंगे। इन सभी कार्यों में स्थानीय भूमिपुत्रों, आदिवासी युवक-युवतियों, बेरोजगार युवाओं तथा परियोजना प्रभावित परिवारों को प्राथमिकता देना अत्यंत आवश्यक है।

विकास की दृष्टि रखने वाले स्थानीय नागरिकों ने इस परियोजना के लिए सकारात्मक भूमिका अपनाई है तथा उनके सामाजिक एवं आर्थिक उत्थान के लिए परियोजना से उत्पन्न होने वाले रोजगार एवं व्यावसायिक अवसरों का लाभ सर्वप्रथम उन्हें मिलना अपेक्षित है। इसलिए वाढवण बंदर से संबंधित सभी विभागों, ठेकेदार संस्थाओं एवं एजेंसियों को आवश्यक निर्देश देकर लघु एवं सहायक कार्यों में स्थानीय लोगों को प्राथमिकता देने संबंधी स्पष्ट नीति अपनाई जाए, ऐसी मांग विधायक विलास तरे ने जे.एन.पी.ए. अध्यक्ष एवं प्रबंध निदेशक आई.ए.एस. गौरव दयाल से प्रत्यक्ष मुलाकात कर लिखित निवेदन के माध्यम से की है।

इस दौरान जे.एन.पी.ए. अध्यक्ष एवं प्रबंध निदेशक आई.ए.एस. गौरव दयाल ने कहा कि स्थानीय लोगों को प्राथमिकता देने के संबंध में आवश्यक सभी उपाय किए जाएंगे। साथ ही स्थानीय युवाओं को कौशल विकास, प्रशिक्षण एवं रोजगार योग्य बनाने के लिए विशेष उपक्रम चलाए जा रहे हैं। इससे परियोजना के प्रति स्थानीय लोगों में विश्वास निर्माण करने में सहायता मिलेगी तथा परियोजना और स्थानीय समाज के बीच समन्वय एवं सहयोग की भावना को और अधिक मजबूत करने का हमारा उद्देश्य है, ऐसा दयाल ने कहा।

वाढवण बंदरात लघु उद्योगात स्थानिकांना प्राधान्य द्या – आमदार विलास तरे

 वाढवण बंदरात लघु उद्योगात स्थानिकांना प्राधान्य द्या – आमदार विलास तरे


# जे.एन.पी.ए. अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भा.प्र.से. गौरव दयाल यांची घेतली प्रत्यक्ष भेट


नवी मुंबई / पालघर. ( प्रतिनिधी ) – प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पातील लघु व सहाय्यक कामांमध्ये स्थानिक भूमिपुत्र, आदिवासी व प्रकल्पग्रस्त नागरिकांना प्राधान्य द्या अशी मागणी बोईसर विधानसभा आमदार विलास तरे यांनी जे.एन.पी.ए. अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भा.प्र.से. गौरव दयाल (वाढवण बंदर अधिकारी) यांची प्रत्यक्ष भेट भेट घेऊन मागणी करत लेखी निवेदन दिले आहे.

यावेळी आमदार तरे म्हणाले की, पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदर हा देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी व विकासात्मक प्रकल्प असून या प्रकल्पाचा मोठा भाग माझ्या बोईसर विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्राशी निगडित आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील अनेक गावांतील स्थानिक नागरिक, आदिवासी बांधव, मच्छीमार समाज तसेच इतर प्रकल्पग्रस्त कुटुंबांवर थेट व अप्रत्यक्ष परिणाम होणार आहे. वाढवण बंदर प्रकल्पाच्या उभारणीदरम्यान तसेच भविष्यात प्रकल्पाशी संबंधित विविध लघु, सहाय्यक व पूरक कामे मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार आहेत. यामध्ये वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता, देखभाल, कार्यालयीन सहाय्य, बांधकामाशी संबंधित लघु कंत्राटी कामे, साहित्य पुरवठा, यंत्रसामग्री सहाय्य, भोजन व्यवस्था, लॉजिस्टिक सेवा तसेच इतर विविध सेवा क्षेत्रातील संधी उपलब्ध होणार आहेत. या सर्व कामांमध्ये स्थानिक भूमिपुत्र, आदिवासी युवक-युवती, बेरोजगार तरुण तसेच प्रकल्पग्रस्त कुटुंबांना प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे.

विकासाचा दृष्टिकोन ठेवणाऱ्या स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पासाठी विकासाच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घेतली असून, त्यांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या रोजगार व व्यवसाय संधींचा लाभ त्यांना प्रथम मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे वाढवण बंदराशी संबंधित सर्व विभाग, कंत्राटदार संस्था व एजन्सींना आवश्यक निर्देश देऊन लघु व सहाय्यक कामांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याबाबत स्पष्ट धोरण अवलंबण्यात यावे, अशी मागणी आमदार विलास तरे यांनी जे.एन.पी.ए. अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भा.प्र.से. गौरव दयाल यांची प्रत्यक्ष भेट घरून लेखी निवेदन देऊन केली आहे.

दरम्यान जे.एन.पी.ए. अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक भा.प्र.से. गौरव दयाल म्हणाले की, स्थानिकांना प्राधान्याच्या अनुषंगाने आवश्यक ते सर्व उपाययोजना करण्यात येतील. तसेच, स्थानिक युवकांना कौशल्य विकास, प्रशिक्षण व रोजगारक्षम बनविण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत असून यामुळे प्रकल्पाविषयी स्थानिकांमध्ये विश्वास निर्माण होण्यास मदत होईल तसेच प्रकल्प आणि स्थानिक समाज यांच्यात समन्वय व सहकार्याची भावना अधिक दृढ करण्याचा आमचा मानस आहे, असे दयाल म्हणाले.

Thursday, 4 June 2026

आढावा घेतलेले प्रकल्प

 आढावा घेतलेले प्रकल्प

मेट्रो लाईन २ ब (डी एन नगर ते मंडले),

मेट्रो लाईन २ (कासारवडवली ते वडाळा),

मेट्रो लाईन ५ (ठाणे - भिवंडी- कल्याण),

मेट्रो लाईन ६ (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी),

मेट्रो लाईन ७ अ (अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ),

मेट्रो लाईन ९ (दहिसर पूर्व ते मीरा-भाईंदर),

शिवडी ते वरळी उन्नत मार्ग,

पुणे शहरातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी टप्पा १ मेट्रो लाईन ,

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजना,

पुणे शहरातील मान - हिंजवडी - शिवाजीनगर मेट्रो लाईन ३, मुळा व मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प, पुणे वर्तुळाकार मार्ग, विरार ते अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर, वांद्रा वर्सोवा सागरी सेतू मार्ग, गोरेगाव ते मुलुंड जोड रस्ता प्रकल्प, ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प, ना.म जोशी मार्ग, वरळी व नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, धारावी पुनर्विकास प्रकल्प.

पुणे वर्तुळाकार मार्गाचे काम गतीने पूर्ण करावे

 पुणे वर्तुळाकार मार्गाचे काम गतीने पूर्ण करावे

मुळा व मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून द्यावी. पुण्यामध्ये मेट्रोचे जाळे विस्तारात आहे. यासाठी एकीकृत तिकीट व्यवस्था असावी. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका व पाणीपुरवठा विभागाने समन्वयाने काम करावे. यामधील अडचणी दूर करत छत्रपती संभाजीनगर वासियांना मुबलक पाणीपुरवठा करावा, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

 

Featured post

Lakshvedhi