Monday, 1 June 2026

महाराष्ट्र लोकभवन येथे सिक्कीम व गोवा राज्य स्थापना दिवस संपन्न

 महाराष्ट्र लोकभवन येथे सिक्कीम व गोवा राज्य स्थापना दिवस संपन्न

मुंबई, दि. 1 : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र लोकभवन येथे सिक्कीम व गोवा राज्य स्थापना दिवस आज सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात विद्यापीठाच्या तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सिक्कीम व गोवा राज्यांची लोकगीते व लोकनृत्ये सादर केली.

विविध राज्यांमध्ये राज्य स्थापना दिवस साजरे केल्यामुळे त्या - त्या राज्यांच्या संस्कृती, वेशभूषा, नृत्य व सांस्कृतिक परंपरेचे दर्शन होते व त्यातून राष्ट्रीय एकात्मता बळकट होते, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी केले.

सिक्कीम व गोवा राज्य परस्परांपासून शेकडो मैल दूर असली तरीही दोन्ही राज्यांच्या विविधतेतून एकात्मता दिसून येते असे राज्यपालांनी सांगितले.

सिक्कीम राज्य सुंदर गिरीरांगांनी नटलेले आहे तर गोव्याला सुंदर समुद्र किनारा लाभला आहे. दोन्ही राज्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या पसंतीची राज्ये ठरली आहेत. 

'एक भारत श्रेष्ठ भारत' हा एकसमानता साजरे करणारा उपक्रम नसून तो विविधता साजरा करणारा उत्सव आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

भारत हा केवळ भौगोलिक सीमांनी बांधलेला प्रदेश नसून तो विविधांगी संस्कृतीनी सजलेला देश आहे असे त्यांनी सांगितले. गोवा महाराष्ट्राचा शेजारी आहे, आणि दोन्ही राज्यांमध्ये सांस्कृतिक देवाण घेवाण होते. मुंबईत कामानिमित्त आलेल्या सिक्कीमच्या लोकांनी आपली संस्था निर्माण करावी व परस्परांना सहकार्य करावे असे राज्यपालांनी सांगितले.   

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सांस्कृतिक सादरीकरण केल्याबद्दल राज्यपालांनी त्यांना कौतुकाची थाप दिली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या 'मारिया पिता शे' या गोव्याच्या गीत-नृत्याला उपस्थितांनी दाद दिली.

कार्यक्रमात सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथूर व गोव्याचे राज्यपाल अशोक गजपती राजू पुसपति यांचे व्हिडीओ संदेश दाखविण्यात आले, तसेच दोन्ही राज्यांचा इतिहास, वारसा, पर्यटनस्थळे दाखविणारे लघुपट दाखविण्यात आले.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ अपूर्वा पालकर यांनी यावेळी राज्यपालांचा सत्कार केला.

कार्यक्रमाला राज्यपालांचे सहसचिव एस राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे व मुंबईत शिक्षण व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले सिक्कीमचे लोक उपस्थित होते. सहायक प्रशासकीय अधिकारी संजय करंगे यांनी आभार प्रदर्शन केले.

एक भारत श्रेष्ठ भारत' हा एकसमानता साजरे करणारा उपक्रम

 एक भारत श्रेष्ठ भारत' हा एकसमानता साजरे करणारा उपक्रम नसून तो विविधता साजरा करणारा उत्सव आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

भारत हा केवळ भौगोलिक सीमांनी बांधलेला प्रदेश नसून तो विविधांगी संस्कृतीनी सजलेला देश आहे असे त्यांनी सांगितले. गोवा महाराष्ट्राचा शेजारी आहे, आणि दोन्ही राज्यांमध्ये सांस्कृतिक देवाण घेवाण होते. मुंबईत कामानिमित्त आलेल्या सिक्कीमच्या लोकांनी आपली संस्था निर्माण करावी व परस्परांना सहकार्य करावे असे राज्यपालांनी सांगितले.   

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सांस्कृतिक सादरीकरण केल्याबद्दल राज्यपालांनी त्यांना कौतुकाची थाप दिली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या 'मारिया पिता शे' या गोव्याच्या गीत-नृत्याला उपस्थितांनी दाद दिली.

कार्यक्रमात सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथूर व गोव्याचे राज्यपाल अशोक गजपती राजू पुसपति यांचे व्हिडीओ संदेश दाखविण्यात आले, तसेच दोन्ही राज्यांचा इतिहास, वारसा, पर्यटनस्थळे दाखविणारे लघुपट दाखविण्यात आले.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ अपूर्वा पालकर यांनी यावेळी राज्यपालांचा सत्कार केला.

कार्यक्रमाला राज्यपालांचे सहसचिव एस राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे व मुंबईत शिक्षण व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले सिक्कीमचे लोक उपस्थित होते. सहायक प्रशासकीय अधिकारी संजय करंगे यांनी आभार प्रदर्शन केले. 

००००

महाराष्ट्र लोकभवन येथे सिक्कीम व गोवा राज्य स्थापना दिवस संपन्न

 महाराष्ट्र लोकभवन येथे सिक्कीम व गोवा राज्य स्थापना दिवस संपन्न

मुंबई, दि. 1 : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र लोकभवन येथे सिक्कीम व गोवा राज्य स्थापना दिवस आज सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात विद्यापीठाच्या तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सिक्कीम व गोवा राज्यांची लोकगीते व लोकनृत्ये सादर केली.

विविध राज्यांमध्ये राज्य स्थापना दिवस साजरे केल्यामुळे त्या - त्या राज्यांच्या संस्कृती, वेशभूषा, नृत्य व सांस्कृतिक परंपरेचे दर्शन होते व त्यातून राष्ट्रीय एकात्मता बळकट होते, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी केले.

सिक्कीम व गोवा राज्य परस्परांपासून शेकडो मैल दूर असली तरीही दोन्ही राज्यांच्या विविधतेतून एकात्मता दिसून येते असे राज्यपालांनी सांगितले.

सिक्कीम राज्य सुंदर गिरीरांगांनी नटलेले आहे तर गोव्याला सुंदर समुद्र किनारा लाभला आहे. दोन्ही राज्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या पसंतीची राज्ये ठरली आहेत. 

शेतकऱ्यांपर्यंत 'पशु आरोग्य मित्र' (मोबाईल व्हेटर्नरी व्हॅन) च्या माध्यमातून पशुवैद्यकीय सेवा

 क्षमता बांधणी प्रशिक्षण

अहिल्यानगरमधील राहुरी, राहता आणि श्रीरामपूर तालुक्यातील २६ गावांमधील ३ हजारहून अधिक शेतकऱ्यांपर्यंत 'पशु आरोग्य मित्र' (मोबाईल व्हेटर्नरी व्हॅन) च्या माध्यमातून पशुवैद्यकीय सेवा पोहोचवली जात आहे. याशिवाय, १२० गावांधील ५ हजार शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डिजिटल सल्ला सेवा आणि क्षमता बांधणीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

 या उपक्रमांतर्गत दोन फिरते पशुवैद्यकीय दवाखाने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या वाहनांमध्ये आधुनिक निदान साधने, औषधे आणि लसींसाठी कोल्ड-चेन सुविधा उपलब्ध असेल. यामुळे थेट शेतकऱ्यांच्या दारात वेळेवर उपचार मिळून जनावरांचा मृत्यूदर कमी होण्यास मदत होणार आहे. 'डिजिटल ग्रीन' द्वारे 'पशु सखी' आणि पॅरा-व्हेट्सना मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षित केले जाईल, जे गावोगावी जाऊन पशु पोषण, वासरांची काळजी, स्वच्छता आणि दुग्ध व्यवस्थापनाचे धडे देतील. शेतकऱ्यांसाठी फार्मरचॅट हे एआय-संचलित, आवाज आधारित प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आले आहे, जे स्थानिक भाषेत जनावरांचे आजार आणि सरकारी योजनांची माहिती दिली जाईल, अशी माहिती यावेळी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

कारगिल इंडियाचे अध्यक्ष आणि कारगिल ॲनिमल न्यूट्रिशन अँड हेल्थचे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक रविंदर बलाईन म्हणाले की, महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेशी पशुसंवर्धन जोडलेले आहे. कारगिल गेल्या अनेक वर्षांपासून येथील शेतकऱ्यांसोबत काम करत असून, या नव्या उपक्रमामुळे दुग्धव्यवसाय परिसंस्था अधिक मजबूत होईल.

डिजिटल ग्रीन इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी भसीन आणि सिनजेंटा फाउंडेशन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम बोराडे यांनीही या भागीदारीबद्दल आनंद व्यक्त करत, हा प्रकल्प शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि हवामान-अनुकूल शेतीला चालना देण्यासाठी सहाय्यकारी ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

0000

कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून पशुपालनात भरभराट

 कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि

पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून पशुपालनात भरभराट

-पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीवर राज्य शासनाचा भर

मुंबई, दि. १ जून : कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून राज्यातील पशुपालन व्यवसायाला भरभराटी आणावी, असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे केले. 

'कारगिल' कंपनीने 'सिजेंटा फाउंडेशन इंडिया' आणि 'डिजिटल ग्रीन इंडिया' यांच्या भागीदारीत महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात 'एकात्मिक दुग्धव्यवसाय विकास उपक्रम' सुरू केला आहे. मंत्रालयात आयोजित या उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात श्रीमती मुंडे बोलत होत्या. 

विभागाचे सचिव एन. रामास्वामी, कारगिल इंडियाचे अध्यक्ष आणि कारगिल ॲनिमल न्यूट्रिशन अँड हेल्थचे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक रविंदर बलाईन, डिजिटल ग्रीन इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी भसीन आणि सिनजेंटा फाउंडेशन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम बोराडे आदी उपस्थित होते. तर अहिल्यानगर जिल्ह्यातून पशुपालक शेतकरी आणि इतर संबंधित व्यक्ती ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमास उपस्थित होत.

श्रीमती मुंडे म्हणाल्या की, शासनाचा नेहमीच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्यावर आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर राहिला आहे. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय हा आपल्या ग्रामीण जीवनमानाचा मुख्य कणा आहे. कारगिल, सिजेंटा फाउंडेशन आणि डिजिटल ग्रीन यांचा हा संयुक्त उपक्रम आपल्या 'विकसित महाराष्ट्र' आणि 'विकसित भारत' या संकल्पनेला गती देणारा ठरेल.

तंत्रज्ञान, 'फार्मरचॅट' सारखे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डिजिटल मार्गदर्शन आणि थेट दारात पोहोचणारी 'पशु आरोग्य मित्र' फिरती पशुवैद्यकीय सेवा यांच्या माध्यमातून अहिल्यानगरमधील हजारो शेतकऱ्यांना थेट फायदा होईल. 'पशु सखी'च्या माध्यमातून महिलांचा वाढणारा सहभाग ग्रामीण महिला सक्षमीकरणाला नवी दिशा देईल. हा पथदर्शी प्रकल्प संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श मॉडेल ठरेल, असा विश्वासही श्रीमती मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य करताना

 पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल आणि सामाजिक माध्यमांच्या विस्तारामुळे माहिती प्रसारणाचे स्वरूप बदलले आहे. तथापि, कोणती बातमी किती वेगाने प्रसारित झाली यापेक्षा तिची सत्यता आणि विश्वासार्हता अधिक महत्त्वाची आहे. लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, समाजजीवनातील मूल्यांचे जतन आणि लोकशाही संस्थांना बळकटी देण्याचे कार्य पत्रकारिता करत असते. बदलत्या काळातही पत्रकारितेने आपल्या मूलभूत मूल्यांचे जतन करीत समाजहिताची भूमिका कायम ठेवावी.

उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी यावेळी हिंदी ही तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असून भाषा सर्वांना जोडण्याचे काम करते, असे सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हिंदी पत्रकारितेसाठी योगदान दिलेल्या वरिष्ठ पत्रकार गंगाधर ढोबळे, हेमंत तिवारी, कुमुद संघवी चावरे, विनीत कुमार सिंग, अवधेश व्यास यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रा.राममोहन पाठक तसेच गायक सुरेश शुक्ला यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

मुंबई हिंदी पत्रकार संघाचे महासचिव विजयसिंह कौशिक यांनी प्रास्ताविकात हिंदी पत्रकारितेची २०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुंबई हिंदी पत्रकार संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून पत्रकार संघाच्या

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यातील सांस्कृतिक व ऐतिहासिक संबंधांचा उल्लेख करताना

 महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यातील सांस्कृतिक व ऐतिहासिक संबंधांचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ज्ञान, परंपरा आणि संस्कृतीच्या माध्यमातून दोन्ही राज्यांमध्ये शतकानुशतके दृढ संबंध राहिले आहेत. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषा संस्कृत परंपरेतून विकसित झालेल्या असून देवनागरी लिपीमुळे त्यांच्यात नैसर्गिक जवळीक आहे. भारतीय भाषांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, जगातील बहुतांश विकसित राष्ट्रांमध्ये मातृभाषेतून शिक्षण दिले जाते. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास ज्ञान अधिक प्रभावीपणे आत्मसात करता येते. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मातृभाषेला प्राधान्य देण्याचे धोरण देशाच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेबरोबरच इतर भारतीय भाषांचेही ज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Featured post

Lakshvedhi