Tuesday, 12 May 2026

सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर एसटी उभारणार २०० चार्जिंग स्टेशन

 सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर एसटी उभारणार २०० चार्जिंग स्टेशन

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. ११ : एसटी महामंडळातील सर्व बसेस २०३५ पर्यंत ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याच्या दृष्टीने राज्य शासन आणि एसटी महामंडळाकडून वेगाने प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने आवश्यक असलेल्या चार्जिंग सुविधांची उभारणी करण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राज्यभरात किमान २०० चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असूनयासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

 

मंत्रालयीन दालनात आयोजित बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकरवित्तीय सल्लागार गिरीश देशमुख तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

Monday, 11 May 2026

नांदगाव परिसर राष्ट्रीय महामार्ग, समर्पित मालवाहतूक

 नांदगाव परिसर पालघर जिल्ह्यात असून मुंबईपासून सुमारे १४० किलोमीटरवर आहे. तसेच हा परिसर तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या जवळ असल्याने त्याचे धोरणात्मक महत्त्व वेगळे आहे. मात्रया भागातील भूगर्भीय रचना अतिशय सैल गाळयुक्त असून कमी खोलीवर कठीण खडक असल्याने मोठ्या प्रमाणावर ड्रेजिंग करावे लागणार असल्याने समुद्रातील आवश्यक खोली मिळविण्यासाठी सुमारे चार किलोमीटरपर्यंत समुद्रात जावे लागणार असल्याचे नमूद करण्यात आले. हा परिसर सीआरझेड-१ व सीआरझेड-३ क्षेत्रात येत असल्याने पर्यावरणीय बाबींचाही विचार करावा लागणार असल्याचे सांगण्यात आले.

 

नांदगाव परिसर राष्ट्रीय महामार्गसमर्पित मालवाहतूक मार्ग आणि प्रस्तावित पायाभूत प्रकल्पांमुळे संपर्काच्या दृष्टीने सक्षम असल्याचे सादरीकरणात नमूद करण्यात आले.

सर्व तीन स्थळांसाठी प्राथमिक स्वरूपातील आराखडे तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. किनारी भागात उपलब्ध जमीन मर्यादित असल्याने जहाजबांधणी प्रकल्पासाठी समुद्रातून भूभाग पुनर्भरण (Reclamation) करून विकास करावा लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मुख्य जहाजबांधणी सुविधा समुद्रातील पुनर्भरण केलेल्या भूभागावर उभारण्यात येणार असून सहाय्यक सुविधा त्यास जोडून विकसित करण्यात येतीलशी माहितीही यावेळी देण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जहाजबांधणी प्रकल्पासाठी पायाभूत सुविधा वेगाने उभाराव्या

 सिंधुदुर्ग जिल्ह्या जहाजबांधणी प्रकल्पासाठी

पायाभूत सुविधा वेगाने उभाराव्या

-         बंदरे विकास मंत्री नितेश राणे

 

·         जहाजबांधणी उद्योगासाठी स्थळ निवडीच्या प्रक्रियेला वेग

·         तांत्रिकदृष्ट्या सक्षम स्थळांचा आढावा

मुंबई, दि. ७ : राज्यातील जहाजबांधणी व सागरी पायाभूत सुविधा विकासाच्या दृष्टीने नांदगावदिघी आणि विजयदुर्ग या तीन संभाव्य स्थळांचा सविस्तर तांत्रिक व आर्थिक आढावा घेण्यात आला असूनसिंधुदुर्ग जिल्ह्यास प्राधान्य देत संबंधित स्थळांचे प्रत्यक्ष सर्वेक्षणपुनर्भरणट्रॅफिक लाँचिंग तसेच सागरी पायाभूत सुविधांच्या नियोजनाबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. जहाजबांधणी उद्योगात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या ऑपरेटर्सना प्राथमिक स्वरूपातील माहिती व अहवाल उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी जहाजबांधणी प्रकल्पासाठी संभाव्य स्थळांबाबत तांत्रिक क्षमतासमुद्रातील खोलीभूगर्भीय स्थितीसंपर्क व्यवस्था आणि भविष्यातील औद्योगिक संधी संदर्भात सविस्तर सादरीकरण करण्यात आले. बैठकीस महाराष्ट्र सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीपहस्कोनिंग कंपनीचे जॉन सम्यूएलबिजापूरतसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची प्रसिद्ध

 इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची प्रसिद्ध

 

मुंबईदि. 7 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार 26 एप्रिल2026 रोजी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. चौथी) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. सातवी) आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेची इयत्तानिहायपेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.

अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप नोंदविण्याची कार्यपद्धती

या अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन स्वरूपात करता येईल. हे निवेदन पालकांकरिता संकेतस्थळावर व शाळांकरिता त्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्रुटी/ आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरिता 7 ते 14 मे 2026 या कालावधीची मुदत देण्यात येत आहे. त्यानंतर निवेदन स्वीकारले जाणार नाही. तसेच ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे प्राप्त त्रुटी/ आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाहीअसेही परीक्षा परिषदेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता

 दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता

 

मुंबईदि. 7 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल उद्या शुक्रवार दि. 8 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी दिली आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या पुणेनागपूरछत्रपती संभाजीनगरमुंबईकोल्हापूरअमरावतीनाशिकलातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वीच्या परीक्षेचा निकाल पुढील अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन जाहीर करण्यात येईल. 

 

1) https://results.digilocker.gov.in 2) https://mahahsscboard.in 3) https://sscresult.mkcl.org 4)  https://results.targetpublications.org 5) https://results.navneet.com 6) https://www.tv9marathi.com आणि 7) https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results

 

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker App मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर शाळांना त्यांच्या शाळांचा एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

 

       ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीपुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरून स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या असल्याचे मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

गेली 27 वर्ष काळा घोडा फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते आहे. या फेस्टीव्हलमध्ये

 काळा घोडा फेस्टिव्हलच्या आयोजक तथा संस्थापक बृंदा मेलर म्हणाल्या कीगेली 27 वर्ष काळा घोडा फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते आहे. या फेस्टीव्हलमध्ये सातत्यता असल्यामुळेच हा फेस्टिव्हल यशस्वी आहे. कोणत्याही खाजगी फेस्टिव्हलला जर शासनाचा पाठिंबा मिळाला तर ते काम चांगले यशस्वी  होते हेच काळाघोडा फेस्टिव्हलचे यश आहे. सुरूवातीला या फेस्टिव्हलला मर्यादा होती. आता फेस्टिव्हल शासनाच्या मदतीमुळे चांगला होत आहे याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले.

एआय उपयुक्त, पण मानवी भावना आणि सर्जनशीलतेला पर्याय नाही’

 एआय उपयुक्तपण मानवी भावना आणि सर्जनशीलतेला पर्याय नाही’

  • टेक वारी 2.0’ कार्यक्रमातील कलारंग : आर्टएआय अँड गव्हर्नन्स’ परिसंवादात मान्यवरांचे मत

 

मुंबईदि. 7 : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही कला, चित्रपटसृष्टी तसेच सर्वच क्षेत्रासाठी उपयुक्त तांत्रिक साधन असलेतरी मानवी भावनासंवेदना आणि सर्जनशीलतेची जागा ती कधीच घेऊ शकत नाहीअसा सूर मंत्रालयात आयोजित टेक वारी 2.0’ कार्यक्रमातील कलारंग : आर्टएआय अँड गव्हर्नन्स’ या परिसंवादात उमटला. कलाचित्रपट आणि शिल्पकलेतील मान्यवरांनी एआयच्या वाढत्या प्रभावावर भाष्य करताना तंत्रज्ञानाचा वापर सजगतेने आणि विचारपूर्वक करण्याची गरज अधोरेखित केली.

 

सामान्य प्रशासन विभागातर्फे मंत्रालयात त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित टेक वारी 2.0’ अंतर्गत कलारंग : आर्टएआय अँड गव्हर्नन्स’ या विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात काळा घोडा आर्ट्स फेस्टिव्हलच्या संस्थापक आणि कलाकार बृंदा मिलरशिल्पकार अरझान खंबाटाचित्रपट दिग्दर्शक रोहन सिप्पी आणि ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक अशोक कौल यांनी सहभाग घेतला. राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालक निधी चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही.राधा उपस्थि‍त होत्या.

 

Featured post

Lakshvedhi