कृषी मंत्री भरणे म्हणाले, केंद्र आणि राज्याच्या समन्वयातून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून आणि प्रभावी अंमलबजावणीद्वारे खरीप हंगाम 2026 यशस्वी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत त्यांना सक्षम करण्याचे काम सातत्याने सुरू राहील. अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटांच्या पार्श्वभूमीवरही महाराष्ट्रातील शेतकरी खंबीरपणे उभा आहे. शासन त्याच्या पाठीशी ठामपणे उभे असून, तातडीने मदत आणि दीर्घकालीन उपाययोजनांद्वारे शेती अधिक सक्षम करण्यावर आमचा भर आहे. या परिषदेमुळे आगामी काळातील कृषी धोरणांना दिशा मिळणार असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस चालना मिळेल, असा विश्वास कृषिमंत्री भरणे यांनी व्यक्त केला आहे.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 8 April 2026
सायबर विभागाकडे नोंदणी गरजेची
सायबर विभागाकडे नोंदणी गरजेची
राज्यातील ऑनलाइन फूड व अन्य वस्तू वितरण करणाऱ्या कंपन्यांमध्ये कार्यरत गिग व प्लॅटफॉर्म कामगारांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या नियमनासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज बैठकीमध्ये अधोरेखित करण्यात आली. राज्यातील बहुतेक अॅग्रीगेटर कंपन्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे काम करत असून, त्या थेट कर्मचारी भरती न करता तृतीय पक्ष (थर्ड पार्टी) संस्थांमार्फत गिग कामगारांची नियुक्ती करतात. त्यामुळे पारंपरिक नियोक्ता-कामगार संबंध निर्माण होत नाहीत आणि जबाबदाऱ्यांमध्ये अस्पष्टता राहते. गिग कामगारांची नियुक्ती प्रामुख्याने अॅप-आधारित प्रणालीद्वारे केली जाते. यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक तपशील, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन कागदपत्रे, विमा, ई-श्रम नोंदणी यांसह विविध कागदपत्रे आवश्यक ठरवली जातात. मात्र, या प्रक्रियेत एकसमान नियमावली गरजेची आहे. त्याचप्रमाणे सर्व गिग कामगारांची सायबर विभागाकडे नोंदणी, तसेच क्यूआर कोड असलेले ओळखपत्र बाळगणे सक्तीचे करण्याबाबत आणि ग्राहकांच्या मागणीनुसार सादर करणे अनिवार्य करण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.
गिग व प्लॅटफॉर्म वर्कर्सची नोंदणी ज्या प्लॅटफॉर्मवर ‘पार्टनर
कामगार मंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, गिग व प्लॅटफॉर्म वर्कर्सची नोंदणी ज्या प्लॅटफॉर्मवर ‘पार्टनर’ म्हणून केली जाते, त्या कंपन्यांनीच या कामगारांची पार्श्वभूमी तपासाची व सुरक्षिततेची पूर्ण जबाबदारी स्वीकारली पाहिजे. डिलिव्हरीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांचे व्यवसायिक रजिस्ट्रेशन, चालकांकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स, पगार त्यांचे माध्यम या सर्व बाबींचा संबंधित सर्व विभागांच्या समन्वयाने अभ्यास करून सर्वसमावेशक आराखडा तयार करावा, असे निर्देश मंत्री ॲड. फुंडकर यांनी यावेळी दिले.
गिग व प्लॅटफॉर्म वर्कर्सची नोंदणी ज्या प्लॅटफॉर्मवर ‘पार्टनर’ म्हणून केली
कामगार मंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, गिग व प्लॅटफॉर्म वर्कर्सची नोंदणी ज्या प्लॅटफॉर्मवर ‘पार्टनर’ म्हणून केली जाते, त्या कंपन्यांनीच या कामगारांची पार्श्वभूमी तपासाची व सुरक्षिततेची पूर्ण जबाबदारी स्वीकारली पाहिजे. डिलिव्हरीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांचे व्यवसायिक रजिस्ट्रेशन, चालकांकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स, पगार त्यांचे माध्यम या सर्व बाबींचा संबंधित सर्व विभागांच्या समन्वयाने अभ्यास करून सर्वसमावेशक आराखडा तयार करावा, असे निर्देश मंत्री ॲड. फुंडकर यांनी यावेळी दिले.
विविध डिलिव्हरी व सेवा देणाऱ्या कंपन्या ग्राहकांना घरपोच
विविध डिलिव्हरी व सेवा देणाऱ्या कंपन्या ग्राहकांना घरपोच सेवा पुरविण्यासाठी डिलिव्हरी पार्टनर्स नियुक्त करतात. सध्या या कंपन्या त्यांची ऑनलाईन, फेसलेस पद्धतीने नोंदणी करून नंतर ही माहिती थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन एजन्सीकडे पाठवतात; मात्र या एजन्सींना पडताळणीचे अधिकार, त्यांच्या प्रक्रियेला कायदेशीर आधार ग्राहक व कामगार सुरक्षितता याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
ऑनलाईन प्लॅटफॉर्म, गिग आणि डिलिव्हरी क्षेत्रातील कामगारांची पडताळणी व सुरक्षितता आवश्यक
ऑनलाईन प्लॅटफॉर्म, गिग आणि डिलिव्हरी क्षेत्रातील कामगारांची
पडताळणी व सुरक्षितता आवश्यक
-कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर
· ग्राहक व कामगार सुरक्षितता केंद्रस्थानी ठेवून सर्वसमावेशक आराखडा तयार करावा
· कामगार आणि गृह विभागाची संयुक्त बैठक
मुंबई, दि. 7 : ऑनलाइन प्लॅटफॉर्म, गिग आणि डिलिव्हरी वर्कर्समार्फत ग्राहकांना सुरक्षित सेवा पुरविली जावी, यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या पडताळणीवर भर देत ग्राहकांना ही सेवा निर्दोष, सुरक्षित आणि कायद्याच्या चौकटीत मिळावी, याकरिता सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी कामगार आणि गृह विभागाच्या मंत्रालयात आयोजित संयुक्त बैठकीत दिले.
देशभरातून येणाऱ्या भाविकांनी कोणत्याही प्रकारची वैद्यकीय गैरसोय होऊ नये याची काळजी
देशभरातून येणाऱ्या भाविकांनी कोणत्याही प्रकारची वैद्यकीय गैरसोय होऊ नये याची काळजी घ्यावी. आरोग्य सेवा व्यवस्थापनासाठी विविध स्तरांवर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने व्यापक तयारी करण्याचे निर्देशही आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.
कुंभमेळ्याच्या दरम्यान रोगराईचा प्रसार रोखण्यासाठी नाशिक, त्र्यंबक, रामकुंड, सीतामंडी व इतर सर्व धार्मिक स्थळावरील स्वच्छतेवर विशेष भर द्यावा. पाण्याच्या स्रोतांची तपासणी करावी. ‘आरोग्य रक्षक किट’ व पुरेसा औषध साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...