Saturday, 25 July 2026

कोणावरही अन्याय न होता योग्य पुनर्वसन करून ‘पंढरपूर कॉरिडॉर’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 कोणावरही अन्याय न होता योग्य पुनर्वसन करून पंढरपूर कॉरिडॉरचे क- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा

 

            पंढरपूर, दि. 25: श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी वाढणारी भक्तांची गर्दी पाहता त्यांना उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर परिसर विकासाचे काम पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. कोणावरही अन्याय न होता सर्वांचे योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या अडीच वर्षांत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

            

            मागील काळात सुरू केलेले मंदिर विकासाचे काम बहुतांश पूर्ण झाले असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो लोक येतात. येथे अत्यंत कमी जागा आहे. आता मोठी जागा तयार करणे गरजेचे आहे. यावर्षी हे काम सुरू करायचे आहे. कॉरिडॉर विकासात येथील व्यावसायिकांचा व्यवसाय वाढेल, नागरिकांना घरे मिळतील, भाडेकरूंची व्यवस्था होईल, अशा पद्धतीने त्याची रचना करण्यात आली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर कितीही भाविक आले तरी अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी होईल. 

आषाढी वारीत प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा;

 आषाढी वारीत प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विमानतळावर रुग्णाची केली विचारपूस

            पंढरपूर दि. 25: श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर येथून पंढरपूरला आलेल्या भाविकाला छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करून एअर ॲम्ब्युलन्सने सोलापूरला हलविण्यात आले. आषाढी वारीच्या इतिहासात एअर ॲम्ब्युलन्स सेवेद्वारे प्रथमच रुग्णावर उपचार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर एअर ॲम्ब्युलन्समध्ये रुग्णाची भेट घेऊन आवश्यक उपचार करण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.


छत्रपती संभाजीनगर येथील भाविक बाळू आसाराम पडूळ (वय 54) हे दर्शनासाठी पंढरपूर येथे आले होते. अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना तीन रस्ता येथील अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले व पुढील तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे पाठवले. उपजिल्हा रुग्णालयात त्यांचा ईसीजी काढण्यात आला. प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्यांना तातडीने सोलापूरला पुढील उपचारासाठी एअर ॲम्ब्युलन्सने पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यांना सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तेथे हृदयरोगतज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी दिली. 

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या भक्तिनिवासाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

 श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या भक्तिनिवासाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यांच्या हस्ते भूमिपूजन

 

पंढरपूर, दि.25:  श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे नाथ चौक, पंढरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेतले;  त्यांच्या हस्ते विधीवत पूजा करुन संस्थानच्या भक्तिनिवासाचे भूमिपूजन करण्यात आले.

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार बापूसाहेब पठारे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ, पालखी सोहळा प्रमुख तथा विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त चैतन्य लोंढे, डॉ. रोहणी पवार, पुरूषोत्तम पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

  मुख्यमंत्री  फडणवीस यांचा यावेळी संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे मुंबई शहर जिल्ह्यात आयोजन रेल, क्रुपया तारीख ठिकाणे पाहावीत

 छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे

मुंबई शहर जिल्ह्यात आयोजन

 

मुंबई, दि.२४ : मुंबई शहर जिल्हाधिकारी, कार्यालयामार्फत मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारसंघात २८ जुलै, २९ जुलै, व १ ऑगस्ट, २०२६ रोजी स. १०.०० ते सायं. ६.०० या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

१८२-वरळी, विधानसभा मतदासंघादि. २८ जुलै २०२६ रोजी लाला लजपतराय कॉलेज ऑफ कॉमर्स अॅन्ड कॉनॉमिक्स, लाला लजपतराय मार्ग, हाजअली गव्हन्मेन्ट कॉलनी, महालक्ष्मी मुंबई ४०० ०३४

 

१८४- भायखळा, विधानसभा मतदासंघा२८ जुलै २०२६ रोजी तळमजला, ऑडिटोरीयम, पेंग्वीन बिल्डींग संत सावतामार्ग, भायखळा (पूर्व) मुंबई - ४०००१७

 

१८६- मुंबादेवी विधानसभा मतदासंघा२८ जुलै २०२६ रोजी लक्ष्मी नारायण मंदीर आणि माधव बाग चॅरिटीज, सी.पी. टैंक रोड, मुंबई-४००००४

 

१८३- शिवडी विधानसभा मतदासंघा२९ जुलै २०२६ रोजी राष्ट्रीय मिल मजदूर संघ हॉल, जी.डी. आंबेडकर मार्ग, भोईवाडा, परेल, मुंबई-४०००२७

 

१८७-कुलाबा विधानसभा मतदासंघा ऑगस्ट २०२६ रोजी रामा आणि सुंदरी वाटूमुल (के. सी. महाविद्यालय) ऑडिटोरियम हॉल, के.एम. कुंदणी चौक, १२४ दिनशा वाच्छा रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२०

 

या दिवशी मुंबई शहर जिल्हयातील सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांसोबतच केंद्र शासनाचे/राज्य शासनाचे विविध विभाग/स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील विविध योजनांचा लाभ तसेच सेवा हमी कायद्यानुसार द्यावयांचा सेवा (जसे विविध दाखले, नवमतदारांची नोंदणी, संजय गांधी निराधार योजना अनुदान, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अनुदान, शिधापत्रिकेसंबंधित सेवा, मत्स्य विभागाकडील विविध सेवा, बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणारे जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र इ. चा) लाभ देण्यात येणार आहे.


प्रतिकूल परिस्थितीत उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे

 बाल कल्याण समितीचे अध्यक्ष महादेव सावंत यांनी प्रतिकूल परिस्थितीत उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील शिक्षण व करिअर वाटचालीसाठी मोठी स्वप्ने बाळगण्याचे आवाहन केले. महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मर्यादित सुविधांमध्येही जिद्दीच्या जोरावर यश मिळवलेल्या मुलांची ही कामगिरी अतुलनीय असून अशा गौरव सोहळ्यांमुळे मुलांचा आत्मविश्वास अधिक दृढ होतो, असे प्रतिपादन त्यांनी केले.


प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची कास धरून यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा सन्मान इतर मुलांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या यशामागे संस्थांचे अधीक्षक, शिक्षक, कर्मचारी आणि मार्गदर्शक यांचेही महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे नमूद करून त्यांचेही यावेळी अभिनंदन करण्यात आले. मानवी तस्करीपासून स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे याची माहिती देणारी चित्राफित यावेळी दाखविण्यात आली.


कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्हे, प्रशस्तीपत्रे आणि शुभेच्छा देऊन त्यांच्या शैक्षणिक यशाचा यथोचित गौरव करण्यात आला. सूत्र संचालन अनिशा गोरे यांनी कले. आभार मुंबई शहर जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अमोल जाधव यांनी मानले.

दहावी, बारावीच्या परीक्षेतील विशेष गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय, महिला व बाल विकास विभाग आणि बाल कल्याण समितीच्या संयुक्त विद्यमाने गौरव सोहळा

 दहावी, बारावीच्या परीक्षेतील विशेष गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय, महिला व बाल विकास विभाग आणि बाल कल्याण समितीच्या संयुक्त विद्यमाने गौरव सोहळा

 

मुंबई, दि. २४ : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या बालगृह, निरीक्षणगृह आणि खुले निवारा गृहातील विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा माटुंगा येथील बेहरामजी जीजीभाई होम फॉर चिल्ड्रन्स येथे झाला.

 

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय आणि बाल कल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

 

विशेष गुणवंत गौरव व सत्कार सोहळा - २०२६ च्या कार्यक्रमास बाल कल्याण समिती अध्यक्ष महादेव सावंत, मुंबई शहर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार, बाल कल्याण समिती सदस्य श्याम मिस्त्री, अरुणा काटकर, मुग्धा दांडेकर, उषा गायकवाड यांच्यासह आशियाना फाउंडेशनचे विनोदभाई शाह, ग्रेस फाउंडेशनचे शंकर मुगलखोद, हमारा फाउंडेशनच्या प्रिया शेंडे, ऑल इज वेल फाउंडेशनचे प्रकाश राजन, बी.जे होम संस्थेच्या अधीक्षिका अनघा माळवी, जिल्हा परिविक्षा अधिकारी महेश पाटील आदी उपस्थित होते.


तालीम संघासाठी पूर्वी मंजूर करण्यात आलेल्या व्यायामशाळा व कार्यालयाच्या जागेचा आढावा घेत पुनर्विकास प्रकल्पातील संरक्षित मोकळी जागा

 उपसभापती सचिन अहिर यांनी तालीम संघासाठी पूर्वी मंजूर करण्यात आलेल्या व्यायामशाळा व कार्यालयाच्या जागेचा आढावा घेत पुनर्विकास प्रकल्पातील संरक्षित मोकळी जागा कायम राखून भविष्यात आखाड्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या पर्यायावर सकारात्मक भूमिका मांडली. अंतिम भोगवटा प्रमाणपत्र व आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्रे प्राप्त झाल्यानंतर उपलब्ध जागेचा आखाडा व क्रीडा उपक्रमांसाठी उपयोग करण्याच्या शक्यतेवरही त्यांनी भर दिला. संरक्षित मोकळी जागा कोणत्याही कायमस्वरूपी बांधकामाशिवाय खेळ व आखाड्याच्या उपक्रमांसाठी राखीव ठेवण्याच्या पर्यायाचा सकापुनर्विकास प्रक्रियेत तालीम संघाची सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा परंपरा अबाधित राहील, यासाठी सर्व संबंधितांनी समन्वय आणि सहमतीच्या माध्यमातून शाश्वत तोडगा काढावा, असे निर्देश उपसभापती अहिर यांनी यावेळी दिले.

पुनर्विकास प्रकल्पातील संरक्षित मोकळी जागा कायम ठेवून भविष्यात आखाड्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या पर्यायावर चर्चा करण्यात आली.रात्मक विचार करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.

Featured post

Lakshvedhi