Saturday, 25 July 2026

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे मुंबई शहर जिल्ह्यात आयोजन रेल, क्रुपया तारीख ठिकाणे पाहावीत

 छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे

मुंबई शहर जिल्ह्यात आयोजन

 

मुंबई, दि.२४ : मुंबई शहर जिल्हाधिकारी, कार्यालयामार्फत मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारसंघात २८ जुलै, २९ जुलै, व १ ऑगस्ट, २०२६ रोजी स. १०.०० ते सायं. ६.०० या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

१८२-वरळी, विधानसभा मतदासंघादि. २८ जुलै २०२६ रोजी लाला लजपतराय कॉलेज ऑफ कॉमर्स अॅन्ड कॉनॉमिक्स, लाला लजपतराय मार्ग, हाजअली गव्हन्मेन्ट कॉलनी, महालक्ष्मी मुंबई ४०० ०३४

 

१८४- भायखळा, विधानसभा मतदासंघा२८ जुलै २०२६ रोजी तळमजला, ऑडिटोरीयम, पेंग्वीन बिल्डींग संत सावतामार्ग, भायखळा (पूर्व) मुंबई - ४०००१७

 

१८६- मुंबादेवी विधानसभा मतदासंघा२८ जुलै २०२६ रोजी लक्ष्मी नारायण मंदीर आणि माधव बाग चॅरिटीज, सी.पी. टैंक रोड, मुंबई-४००००४

 

१८३- शिवडी विधानसभा मतदासंघा२९ जुलै २०२६ रोजी राष्ट्रीय मिल मजदूर संघ हॉल, जी.डी. आंबेडकर मार्ग, भोईवाडा, परेल, मुंबई-४०००२७

 

१८७-कुलाबा विधानसभा मतदासंघा ऑगस्ट २०२६ रोजी रामा आणि सुंदरी वाटूमुल (के. सी. महाविद्यालय) ऑडिटोरियम हॉल, के.एम. कुंदणी चौक, १२४ दिनशा वाच्छा रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२०

 

या दिवशी मुंबई शहर जिल्हयातील सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांसोबतच केंद्र शासनाचे/राज्य शासनाचे विविध विभाग/स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील विविध योजनांचा लाभ तसेच सेवा हमी कायद्यानुसार द्यावयांचा सेवा (जसे विविध दाखले, नवमतदारांची नोंदणी, संजय गांधी निराधार योजना अनुदान, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अनुदान, शिधापत्रिकेसंबंधित सेवा, मत्स्य विभागाकडील विविध सेवा, बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणारे जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र इ. चा) लाभ देण्यात येणार आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi