Saturday, 25 July 2026

लक्ष्मीनारायण व्यायामशाळा आखाड्याच्या जागेसंदर्भात कायदेशीर

 लक्ष्मीनारायण व्यायामशाळा आखाड्याच्या जागेसंदर्भात कायदेशीर,

व्यवहार्य आणि शाश्वत तोडगा काढावा

 -उपसभापती सचिन अहिर

 

मुंबई, दि. २४: लक्ष्मीनारायण व्यायामशाळा आखाड्याच्या जागेसंदर्भात कायदेशीरदृष्ट्या सक्षम, व्यवहार्य आणि दीर्घकालीन हित लक्षात घेऊन मसुदा तयार करण्याचे निर्देश उपसभापती सचिन अहिर यांनी दिले.

 

श्री लक्ष्मीनारायण व्यायामशाळा, आखाडा चिंचपोकळी,  या आखाड्याची परंपरा आणि क्रीडा उपक्रम पुनर्विकासानंतरही अबाधित राहावेत, यासाठी शाश्वत व कायदेशीरदृष्ट्या सक्षम तोडगा काढण्याच्या दृष्टीने विधानभवन येथे उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.

बैठकीस बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त  किरण दिघावकर, कार्यकारी अभियंता (विकास नियोजन) प्रशांत कामत, उपसंचालक युवा सेवा शेखर बांगर, सहायक संचालक युवा सेवा अनु राणे तसेच आखाड्याचे विश्वस्त व सभासद उपस्थित होते.

मुंबई मेट्रो, कोस्टल रोड प्रकल्प, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक तसेच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग यांसारखे महत्त्वाकांक्षी

 मुंबई मेट्रो, कोस्टल रोड प्रकल्प, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक तसेच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प हे करदात्यांच्या योगदानाचे जिवंत उदाहरण असल्याचे सांगून, या प्रकल्पांमुळे वाहतूक व्यवस्था, संपर्क, आर्थिक विकास आणि भविष्यासाठी सक्षम शहर उभारण्यास मोठी चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपालांच्या उपस्थितीत १६७ वा आयकर दिन साजरा आयकर विभागाचा 'भीतीदायक यंत्रणा' ते 'जनस्नेही संस्था' हा प्रवास सुखावणारा

 राज्यपालांच्या उपस्थितीत १६७ वा आयकर दिन साजरा

आयकर विभागाचा 'भीतीदायक यंत्रणा' ते 'जनस्नेही संस्था' हा प्रवास सुखावणारा

राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई, दि.२४ : तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारदर्शकता वाढवून, कर भरण्याची प्रक्रिया सुलभ करून आणि करदात्यांचा विश्वास संपादन करून स्वतःला जनस्नेही संस्थेमध्ये रूपांतरित केल्याबद्दल राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आयकर विभागाचे अभिनंदन केले. ‘एकेकाळी 'भीतीदायक’ म्हणून ओळखला जाणारा आयकर विभाग आज 'जनस्नेही मित्र' बनला आहे," असे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.

राज्यपालांच्या उपस्थितीत आयकर विभागाचा १६७ वा स्थापना दिवस विभागाच्या मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील कौटिल्य भवन येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. 

भारत ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना आयकर विभागाचे योगदान अधिक महत्वाचे असल्याचे राज्यपालांनी सांगितले. कर महसुलामुळे देशात सार्वजनिक शाळा, रुग्णालये, रस्ते, पायाभूत सुविधा तसेच विविध कल्याणकारी योजनांची उभारणी शक्य झाली असून, देशाच्या प्रगतीत विभागाचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

देशातील प्रत्यक्ष कर संकलनात महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा असून, मुंबईने देशाची आर्थिक राजधानी म्हणून आपले स्थान कायम राखले असल्याचे राज्यपालांनी सांगितले.  

मुंबई मेट्रो, कोस्टल रोड प्रकल्प, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक तसेच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प हे करदात्यांच्या योगदानाचे जिवंत उदाहरण असल्याचे सांगून, या प्रकल्पांमुळे वाहतूक व्यवस्था, संपर्क, आर्थिक विकास आणि भविष्यासाठी सक्षम शहर उभारण्यास मोठी चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

'अग्रीम कर' हा देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे सांगून प्रत्येक करदात्याने अग्रीम कर आपली सामाजिक जबाबदारी समजून भरावा, असे आवाहन केले.

शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीजमाफी देण्याचे काम

 पालकमंत्री श्री. गोरे म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीजमाफी देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे. शेतकरी समृद्ध, मजबूत होईल अशा पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळात काम केले आहे. ही वारी वारकऱ्यांना आनंद देणारी स्वच्छ आणि सुंदर अशी वारी होत आहे. जवळपास ३५ लाख वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत आहेत. पंढरी कॉरिडॉरच्या माध्यमातून वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी पायाभूत सोयी निर्माण करण्याचा मानस मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र होईल, असेही ते म्हणाले.

पंढरपूरला तसेच सोलापूर जिल्ह्याला संपूर्ण दक्षिणेशी जोडण्याचे काम निश्चितपणे

 रेल्वे मार्गाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंढरपूरला तसेच सोलापूर जिल्ह्याला संपूर्ण दक्षिणेशी जोडण्याचे काम निश्चितपणे पूर्ण करू. लोणंद-पंढरपूर रेल्वेमार्गासाठी राज्यशासनाने पैसे दिले असून काम सुरू करायचे आहे. परंतु, पंढरपूर-विजापूर रेल्वेसाठीही मागील काळात केंद्र सरकारला विनंती केली असून त्याचा पाठपुरावा  करण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले.

दरवर्षी कोल्हापूर आणि सांगलीमध्ये शिरणाऱ्या पुराच्या पाण्यावर डायव्हर्जन कॅनल

 दरवर्षी कोल्हापूर आणि सांगलीमध्ये शिरणाऱ्या पुराच्या पाण्यावर डायव्हर्जन कॅनल आपण सुरू केला असून यावर्षीच त्याचे काम पूर्ण होत आहे. यामुळे ३५ ते ४० टीएमसी पाणी हे तेथून उजनीमध्ये आणण्यात येणार आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह येथील दुष्काळी भाग आणि मराठवाड्याचा भाग या दोन्ही भागांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. या पाण्यामुळे उजनीमधील मृत साठा वापरावा लागण्याची परिस्थिती पुढील काळात राहणार नाही.

दरवर्षी कोल्हापूर आणि सांगलीमध्ये शिरणाऱ्या पुराच्या पाण्यावर डायव्हर्जन कॅनल आपण सुरू केला असून

 दरवर्षी कोल्हापूर आणि सांगलीमध्ये शिरणाऱ्या पुराच्या पाण्यावर डायव्हर्जन कॅनल आपण सुरू केला असून यावर्षीच त्याचे काम पूर्ण होत आहे. यामुळे ३५ ते ४० टीएमसी पाणी हे तेथून उजनीमध्ये आणण्यात येणार आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह येथील दुष्काळी भाग आणि मराठवाड्याचा भाग या दोन्ही भागांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. या पाण्यामुळे उजनीमधील मृत साठा वापरावा लागण्याची परिस्थिती पुढील काळात राहणार नाही.

Featured post

Lakshvedhi