लक्ष्मीनारायण व्यायामशाळा आखाड्याच्या जागेसंदर्भात कायदेशीर,
व्यवहार्य आणि शाश्वत तोडगा काढावा
-उपसभापती सचिन अहिर
मुंबई, दि. २४: लक्ष्मीनारायण व्यायामशाळा आखाड्याच्या जागेसंदर्भात कायदेशीरदृष्ट्या सक्षम, व्यवहार्य आणि दीर्घकालीन हित लक्षात घेऊन मसुदा तयार करण्याचे निर्देश उपसभापती सचिन अहिर यांनी दिले.
श्री लक्ष्मीनारायण व्यायामशाळा, आखाडा चिंचपोकळी, या आखाड्याची परंपरा आणि क्रीडा उपक्रम पुनर्विकासानंतरही अबाधित राहावेत, यासाठी शाश्वत व कायदेशीरदृष्ट्या सक्षम तोडगा काढण्याच्या दृष्टीने विधानभवन येथे उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.
बैठकीस बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहआयुक्त किरण दिघावकर, कार्यकारी अभियंता (विकास नियोजन) प्रशांत कामत, उपसंचालक युवा सेवा शेखर बांगर, सहायक संचालक युवा सेवा अनु राणे तसेच आखाड्याचे विश्वस्त व सभासद उपस्थित होते.
No comments:
Post a Comment