Wednesday, 22 July 2026

आरोग्य सुविधांचे बळकटीकरण; लाखो नागरिकांना लाभ

 आरोग्य सुविधांचे बळकटीकरण; लाखो नागरिकांना लाभ

            आरोग्य क्षेत्रात आयुष्मान भारत अभियानाशी सुसंगत पद्धतीने ५० हेल्थ अँड वेलनेस सेंटरचे आधुनिकीकरण व सक्षमीकरण करण्यात आले असून, त्याचा सुमारे ३.२ लाख नागरिकांना थेट लाभ झाला आहे. अॅनिमियामुक्त भारत अभियानाअंतर्गत महिलांमध्ये आणि किशोरवयीन मुलींमध्ये रक्तक्षय ओळखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या माध्यमातून सुमारे ५ हजार उच्च जोखमीच्या गर्भवती महिलांची ओळख करून त्यांना विशेष उपचारासाठी संदर्भित करण्यात आले, तर एक हजारांहून अधिक पाच वर्षांखालील बालकांना प्रगत उपचारासाठी पाठविण्यात आले.

            २२६ आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन नवजात बालकांची घरपोच आरोग्य तपासणी, उच्च जोखमीच्या रुग्णांची ओळख आणि प्राथमिक आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यात आली. आरोग्य जनजागृतीसाठी विविध विशेष आरोग्य शिबिरे तसेच जागतिक आरोग्य, क्षयरोग, मातृत्व आणि योग दिन साजरा करण्यात आला.

मोंडेलेज इंडियाच्या ‘शुभ आरंभ’ या प्रमुख सामाजिक

 मोंडेलेज इंडियाच्या शुभ आरंभया प्रमुख सामाजिक उपक्रमांतर्गत गेल्या १३ वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील मावळ आणि खेड तालुक्यातील ६० गावांमध्ये स्थानिक गरजांनुसार आरोग्य, पोषण, शिक्षण, जलसंधारण, पर्यावरण संवर्धन, क्रीडा आणि समुदाय विकासासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांमुळे हजारो कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून आला असून, शासनाच्या विविध योजनांनाही प्रभावी पूरक बळ मिळाले आहे.

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ

 उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून विकसित महाराष्ट्रच्या ध्येयाला बळ

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         पुणे जिल्ह्यातील मावळ व खेड परिसरात शुभ आरंभउपक्रमातून उल्लेखनीय परिवर्तन

 

            मुंबई, दि. २२ : राज्य शासनाच्या सर्वसमावेशक विकासाच्या धोरणाला उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वाची प्रभावी साथ लाभत आहे. शासन आणि उद्योग क्षेत्राच्या भागीदारीतून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साध्य होत आहे. अशा उपक्रमांमुळे विकसित महाराष्ट्र २०४७ या राज्याच्या ध्येयाला बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

            मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस म्हणाले, राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांना पूरक ठरणारे उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्वाचे उपक्रम ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवत आहेत. आरोग्य, पोषण, जलसुरक्षा, पर्यावरण संवर्धन, क्रीडा आणि शालेय पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये सातत्यपूर्ण काम करणारे उपक्रम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

            मोंडेलेज इंडियाच्या शुभ आरंभया प्रमुख सामाजिक उपक्रमांतर्गत गेल्या १३ वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील मावळ आणि खेड तालुक्यातील ६० गावांमध्ये स्थानिक गरजांनुसार आरोग्य, पोषण, शिक्षण, जलसंधारण, पर्यावरण संवर्धन, क्रीडा आणि समुदाय विकासासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांमुळे हजारो कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून आला असून, शासनाच्या विविध योजनांनाही प्रभावी पूरक बळ मिळाले आहे.

कंटूर सर्व्हे पूर्ण होताच भूसंपादन, रस्ते, पाणीपुरवठा आणि अन्य पायाभूत सुविधांच्या

 मंडणगड येथे प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रासाठी सुरुवातीला १०० एकर क्षेत्राचा प्रस्ताव होता. त्यामध्ये वाढ करून सुमारे १५० एकर क्षेत्रात पहिल्या टप्प्यात औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याचा निर्णय बैठकीत कायम ठेवण्यात आला. यासाठी करण्यात आलेल्या कंटूर सर्व्हेचा अंतिम अहवाल प्राप्त करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

 

डॉ. सामंत यांनी सांगितले की, कंटूर सर्व्हे पूर्ण होताच भूसंपादन, रस्ते, पाणीपुरवठा आणि अन्य पायाभूत सुविधांच्या विकासाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात यावी. दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाला आता गती देणे आवश्यक असून कोणत्याही प्रशासकीय कारणामुळे कामे रखडू नयेत, असेही त्यांनी सांगितले.

 

बैठकीत मंडणगडच्या भौगोलिक स्थानाचा लाभ घेत मोठ्या उद्योगांना आकर्षित करण्याबाबतही चर्चा झाली. रायगड जिल्ह्याच्या औद्योगिक पट्ट्याला लागून असल्याने मंडणगडमध्ये उद्योगविकासाची मोठी क्षमता असून गुंतवणूकदारांशी सकारात्मक संवाद साधून उद्योग उभारणीसाठी आवश्यक सर्व सहकार्य देण्यात येईल, असे डॉ. सामंत यांनी सांगितले. तसेच उद्योग उभारणीसाठी आवश्यक प्रोत्साहन, सवलती आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

भूसंपादन, कंटूर सर्व्हे आणि उद्योग गुंतवणुकीची कामे तातडीने पूर्ण करा

 भूसंपादन, कंटूर सर्व्हे आणि उद्योग गुंतवणुकीची कामे तातडीने पूर्ण करा

- उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

·         मंडणगड एमआयडीसीच्या विकासाला गती

 

मुंबई, दि. २१ : मंडणगड येथील प्रस्तावित औद्योगिक क्षेत्राचा विकास वेगाने करण्यासाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया, कंटूर सर्व्हे, पायाभूत सुविधांचे नियोजन आणि उद्योग गुंतवणूक आकर्षित करण्यासाठीची सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अधिकाऱ्यांना दिले.

 

उद्योगमंत्री डॉ.सामंत यांच्या मंत्रालयीन दालनात झालेल्या बैठकीस महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह आणि दूरदृश्यप्रणालीद्वारे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मंडणगड औद्योगिक क्षेत्रासंदर्भात भूसंपादन, पूर्वी अधिसूचित झालेल्या जमिनींची सद्यस्थिती, शेतकऱ्यांच्या मागण्या, कंटूर सर्व्हेचा प्रलंबित अहवाल तसेच नवीन औद्योगिक क्षेत्राच्या विकासाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

 

औद्योगिक क्षेत्रामध्ये एमएसएमई उद्योगांसाठी प्लॉटिंग करण्यास प्राधान्य

 


मंत्री डॉ. सामंत यांनी प्रारंभी या औद्योगिक क्षेत्रामध्ये एमएसएमई उद्योगांसाठी प्लॉटिंग करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश दिले. त्यामुळे अल्पावधीत अधिक उद्योग उभे राहतील, स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि उद्योग विकासाला गती मिळेल, असे त्यांनी सांगितले. आवश्यक प्रतिसाद न मिळाल्यास पुढील टप्प्यात मोठ्या उद्योगांसाठीही जागा उपलब्ध करून देण्याचा विचार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 

मंत्री डॉ.सामंत यांनी सांगितले की, नाधवडे औद्योगिक क्षेत्र राष्ट्रीय महामार्गालगत असून प्रस्तावित वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्ग तसेच विद्यमान रेल्वे स्थानकाच्या निकट असल्याने या परिसराला उत्कृष्ट रस्ते व रेल्वे संपर्काचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात हे औद्योगिक क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होण्याची क्षमता असल्याचा विश्वास उद्योग मंत्री डॉ.सामंत आणि पालकमंत्री राणे यांनी व्यक्त केला.

सिंधुदुर्गच्या नाधवडे एमआयडीसीची पायाभूत विकासकामे तातडीने सुरू करावीत;

 सिंधुदुर्गच्या नाधवडे एमआयडीसीची पायाभूत विकासकामे तातडीने सुरू करावीत;

उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

·         एमएसएमई उद्योगांना प्राधान्य द्यावे

 

मुंबई, दि. २१ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मौजे नाधवडे येथील एमआयडीसी क्षेत्राचा विकास जलदगतीने पूर्ण करून तेथे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना प्राधान्याने संधी उपलब्ध करून द्यावी, तसेच पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत उद्योगमंत्री डॉ.सामंत यांच्या मंत्रालयीन दालनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह तसेच दूरदृश प्रणालीद्वारे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

 

मंत्री डॉ.सामंत म्हणाले की, सिंधुदुर्गच्या नाधवडे येथील सुमारे ११.१४ हेक्टर एमआयडीसीची जमीन भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन महामंडळाच्या ताब्यात असून संबंधित शेतकऱ्यांना मोबदल्याचे वितरण पूर्ण झाले असून सातबारा नोंदीही एमआयडीसीच्या नावावर झाली आहे. २०२२-२३ मध्ये तयार करण्यात आलेल्या पायाभूत सुविधांचे अंदाजपत्रक आता कालबाह्य झाल्यामुळे त्याचा तातडीने फेरआढावा घेऊन सुधारित अंदाजपत्रक तयार करावे आणि मंजुरीसाठी त्वरित सादर करावे. सुमारे १५ कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांच्या विकासकामांना विलंब न लावता प्रारंभ करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Featured post

Lakshvedhi