Wednesday, 22 July 2026

मंत्रालयातील पाणीपुरवठा सुरक्षित · सर्व टाक्यांची स्वच्छता, जलशुद्धीकरण यंत्रणांची सर्व्हिसिंग पूर्ण · पाण्याचे नमुने पिण्यास योग्य असल्याचा महापालिकेच्या प्रयोगशाळेचा अहवाल · तज्ज्ञ समितीमार्फत स्वतंत्र तपासणी सुरू

 मंत्रालयातील पाणीपुरवठा सुरक्षित

·         सर्व टाक्यांची स्वच्छता, जलशुद्धीकरण यंत्रणांची सर्व्हिसिंग पूर्ण

·         पाण्याचे नमुने पिण्यास योग्य असल्याचा महापालिकेच्या प्रयोगशाळेचा अहवाल

·         तज्ज्ञ समितीमार्फत स्वतंत्र तपासणी सुरू

            मुंबई, दि. 21 : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने आवश्यक उपाययोजना राबवल्या असून मंत्रालयातील पाणीपुरवठा सुरक्षित असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

            सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 8 जुलै 2026 रोजी मंत्रालयातील जमिनीखालील एक पाण्याची टाकी तसेच मुख्य व विस्तार इमारतीवरील एकूण 30 पाण्याच्या टाक्यांची संपूर्ण साफसफाई करण्यात आली. पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता केली जात असून, यापुढे दर 15 दिवसांनी सर्व टाक्यांची साफसफाई करण्याच्या सूचनांनुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

            मंत्रालयातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रयोगशाळेत करण्यात आली असून, 29 एप्रिल 2026 तसेच 10 जुलै 2026 रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार पाणी पिण्यास योग्य असल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे. तसेच महापालिकेमार्फत मंत्रालयात येणाऱ्या पाण्याचे आणि जमिनीखालील आरसीसी टाकीमध्ये साठविलेल्या पाण्याचे नमुने तपासण्यात आले असून, 10 जुलै 2026 रोजीच्या अहवालानुसार तेही पिण्यास योग्य आहे.

            याशिवाय, मंत्रालयाच्या मुख्य व विस्तार इमारतीमधील एकूण 33 जलशुद्धीकरण यंत्रणांची (वॉटर प्युरिफायर) सर्व्हिसिंगची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.

            पाणीपुरवठ्याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर 11 जुलै 2026 रोजी मुख्य सचिव यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची तज्ज्ञ समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने 13 जुलै 2026 रोजी मंत्रालयातील जमिनीखालील टाकी, टेरेसवरील टाक्या तसेच मुख्य आणि विस्तार इमारतीच्या प्रत्येक मजल्यावरील पाण्याचे नमुने सलग तीन दिवस तपासणीसाठी संकलित केले असून त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होणे अपेक्षित आहे.

            दरम्यान, मंत्रालयाच्या मुख्य व विस्तार इमारतीतील एकूण 88 प्रसाधनगृहांची दैनंदिन स्वच्छता नियुक्त कंत्राटदारामार्फत निश्चित वारंवारतेनुसार नियमितपणे केली जात असल्याचे सार्वजनिक बांधका

Governor Interacts with Swayamsiddha coordinators of universities

 Governor Interacts with Swayamsiddha coordinators of universities

 

      Mumbai, 21 July : Maharashtra Governor and Chancellor of state universities Jishnu Dev Varma today interacted with the University Coordinators of the online women empowerment platform related to State Public Universities, ‘Swayamsiddha’, through online mode from Lok Bhavan.

            Addressing the meeting, the Governor said Swayamsiddha is a unique platform that aims to empower women through education, skill development, leadership, entrepreneurship and enhanced employability.  He called for making ‘Swayamsiddha’ the tool of women empowerment by making it participatory, interactive, interesting and innovative.

            He called upon the universities to enrol maximum girl students both from within and outside the State on the platform and further called for inviting role models to interact with the students. 

            Vice Chancellor of SNDT Women’s University Prof Ujwala Chakradeo, Vice Chancellor of Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University Dr Manali Kshirsagar and State Coordinator of Swayamsiddha Anuradha Potdar gave their presentation on the occasion.

 

      Mumbai, 21 July : Maharashtra Governor and Chancellor of state universities Jishnu Dev Varma today interacted with the University Coordinators of the online women empowerment platform related to State Public Universities, ‘Swayamsiddha’, through online mode from Lok Bhavan.

            Addressing the meeting, the Governor said Swayamsiddha is a unique platform that aims to empower women through education, skill development, leadership, entrepreneurship and enhanced employability.  He called for making ‘Swayamsiddha’ the tool of women empowerment by making it participatory, interactive, interesting and innovative.

            He called upon the universities to enrol maximum girl students both from within and outside the State on the platform and further called for inviting role models to interact with the students. 

            Vice Chancellor of SNDT Women’s University Prof Ujwala Chakradeo, Vice Chancellor of Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University Dr Manali Kshirsagar and State Coordinator of Swayamsiddha Anuradha Potdar gave their presentation on the occasion.

राज्यपाल ने ‘स्वयंसिद्धा’ विश्वविद्यालय समन्वयकों से संवाद किया

 राज्यपाल ने ‘स्वयंसिद्धा’ विश्वविद्यालय समन्वयकों से संवाद किया

            मुंबई, दि. २१ : महाराष्ट्र के राज्यपाल एवं राज्य विश्वविद्यालयों के कुलाधिपति जिष्णु देव वर्मा ने लोकभवन से ऑनलाइन माध्यम द्वारा राज्य सार्वजनिक विश्वविद्यालयों से संबंधित महिला सशक्तिकरण मंच स्वयंसिद्धा’ के विश्वविद्यालय समन्वयकों से संवाद किया।

            बैठक को संबोधित करते हुए राज्यपाल ने कहा कि स्वयंसिद्धा’ शिक्षा, कौशल विकास, नेतृत्व, उद्यमिता और रोजगार क्षमता के माध्यम से महिलाओं को सशक्त बनाने का एक अनूठा मंच है। उन्होंने इसे सहभागितापूर्ण, संवादात्मक, रोचक और नवोन्मेषी बनाकर महिला सशक्तिकरण का प्रभावी साधन बनाने का आह्वान किया।

            राज्यपाल ने विश्वविद्यालयों से आग्रह किया कि वे अधिक से अधिक छात्राओं को, राज्य के भीतर और बाहर से, इस मंच पर नामांकित करें तथा छात्राओं के साथ संवाद के लिए प्रेरणादायी व्यक्तित्वों को आमंत्रित करें।

            इस अवसर पर एसएनडीटी महिला विश्वविद्यालय की कुलपति प्रो. उज्ज्वला चक्रदेव, राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय की कुलपति डॉ. मणाली क्षीरसागर तथा स्वयंसिद्धा’ की राज्य समन्वयक अनुराधा पोटदार ने अपने विचार एवं प्रस्तुतीकरण साझा किए।

स्वयंसिद्धा समन्वयकांशी राज्यपालांचा संवाद

 स्वयंसिद्धा समन्वयकांशी राज्यपालांचा संवाद

 

मुंबई, दि. २१ : महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी स्वयंसिद्धा या राज्य सार्वजनिक विद्यापीठांशी संबंधित महिला सक्षमीकरण पोर्टल संदर्भात राज्यातील विद्यापीठ समन्वयकांशी लोकभवन येथून ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला.

 

स्वयंसिद्धा हे महिलांना शिक्षण, कौशल्य विकास, नेतृत्व, उद्योजकता आणि रोजगारक्षमता वृद्धी यांच्या माध्यमातून सक्षम करण्याचे प्रभावी व्यासपीठ असून ते अधिक संवादात्मक, समावेशी, आकर्षक आणि नाविन्यपूर्ण बनवावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.  

 

विद्यापीठांनी या पोर्टलवर राज्यातील तसेच राज्याबाहेरील अधिकाधिक विद्यार्थिनींची नोंदणी करावी तसेच विविध क्षेत्रांतील प्रेरणादायी व्यक्तींना या मंचावर संवादासाठी आमंत्रित करण्याचे राज्यपालांनी सांगितले.

 

यावेळी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. उज्ज्वला चक्रदेव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मनाली क्षीरसागर तसेच स्वयंसिद्धाच्या राज्य समन्वयक अनुराधा पोतदार यांनी सादरीकरण केले.

वसंतराव नाईक महामंडळाच्या विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहनविमुक्त जाती व भटक्या जमाती ,दूरध्वनी क्रमांक ०२२-३१८९७३०३ वर संपर्क

 वसंतराव नाईक महामंडळाच्या विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहनदूरध्वनी क्रमांक ०२२-३१८९७३०३ वर संपर्क

            मुंबई, दि. २१ : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक संदीप शिवराम चव्हाण यांनी केले आहे.

            २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी महामंडळास वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, बीज भांडवल कर्ज योजना आणि एक लाख रुपये थेट कर्ज योजना या योजनांची उद्दिष्टे महामंडळाच्या मुख्यालयाकडून प्राप्त झाली आहेत. पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी vnvjntdc.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.

            याशिवाय महाराष्ट्र शासनाने वडार समाजासाठी पैलवान कै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी), रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) लोहार समाजासाठी ब्रह्मलीन आचार्य पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) गवळी समाजासाठी श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) विणकर समाजासाठी विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) आणि नाथपंथी समाजासाठी श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ या सहा महामंडळांची स्थापना केली असून, ही सर्व महामंडळे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या अंतर्गत कार्यरत आहेत. या महामंडळांच्या योजनांसाठीही मुख्यालयाकडून उद्दिष्टे प्राप्त झाली आहेत.

            अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा कार्यालय, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.), गृहनिर्माण भवन, खोली क्रमांक ३३, तळमजला, कलानगर, वांद्रे (पूर्व), मुंबई–४०००५१ येथे किंवा दूरध्वनी क्रमांक ०२२-३१८९७३०३ वर संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

मुंबई येथे 23 जुलै 2026 रोजी ‘खिडकी : एक मनामनातलं अभिवाचन’ · मानवी भावविश्वाचा संवेदनशील कलात्मक आविष्कार रसिकांना अनुभवता येणार

 मुंबई येथे 23 जुलै 2026 रोजी खिडकी : एक मनामनातलं अभिवाचन

·         मानवी भावविश्वाचा संवेदनशील कलात्मक आविष्कार रसिकांना अनुभवता येणार

 

            मुंबई, दि. 22 : सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यावतीने खिडकी : एक मनामनातलं अभिवाचनया वैशिष्ट्यपूर्ण साहित्य-रंगमंचीय कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 7.30  वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या मिनी थिएटरमध्ये आयोजन करण्यात आले आहे.

            गुरु प्रॉडक्शन्स आणि आरती आर्ट अकादमी निर्मित हा 56 वा प्रयोग रसिकांसाठी विनामूल्य खुला असून साहित्य, अभिनय आणि प्रभावी अभिवाचनाचा संगम अनुभवण्याची संधी या कार्यक्रमातून रसिकांना मिळणार आहे. प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रदीप कबरे लिखित व अभिनित खिडकीहे अभिवाचन जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा देणारे आहे. दैनंदिन जीवनातील विविध अनुभव, मानवी नातेसंबंध, सामाजिक वास्तव आणि भावविश्व यांचे प्रभावी शब्दचित्र या कार्यक्रमातून साकारले जाते. बस, रेल्वे, मोटार, रिक्षा, घर, कार्यालय अशा विविध खिडक्यांतून दिसणारे प्रसंग आणि त्यातून उलगडणाऱ्या भावना प्रदीप कबरे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिवाचन शैलीतून प्रेक्षकांसमोर जिवंत करतात. त्यामुळे हे केवळ अभिवाचन न राहता एक प्रभावी रंगमंचीय अनुभव ठरतो.

            या साहित्यकृतीला ज्येष्ठ नाटककार वस्त्रहरणकार गंगाराम गव्हाणकर यांची प्रस्तावना लाभली आहे; तसेच शं. ना. नवरे, अरुण नलावडे, स्मिता जयकर, ऐश्वर्या नारकर, संभाजी सावंत, डॉ.अनिल बांदिवडेकर, अभिराम भडकमकर, नितीन तेंडुलकर यांसह अनेक नामवंत साहित्यिक, रंगकर्मी आणि कलावंतांनी खिडकीया अभिवाचनाचे मुक्तकंठाने कौतुक केले आहे.

            हास्य, करुणा, संवेदना, अंतर्मुखता आणि जीवनातील विविध भावछटा यांचा सुरेख संगम या कार्यक्रमात अनुभवता येणार आहे. प्रत्येक खिडकीतून दिसणाऱ्या वेगवेगळ्या जगाचा आणि त्या अनुभवांशी जोडल्या जाणाऱ्या मानवी भावनांचा कलात्मक प्रवास या अभिवाचनातून उलगडत जातो. साहित्यिक आशय, नाट्यमय मांडणी आणि प्रभावी सादरीकरण यामुळे हा कार्यक्रम सर्व वयोगटातील रसिकांसाठी संस्मरणीय ठरणार आहे.

कारगिल विजय दिवसानिमित्त वीरसैनिक व वीरपत्नींचा कृतज्ञता सन्मान सोहळा

 कारगिल विजय दिवसानिमित्त वीरसैनिक व वीरपत्नींचा कृतज्ञता सन्मान सोहळा

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे कृतज्ञतापूर्वक अभिवादन

 

            मुंबई, दि. 22 : सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यावतीने कारगिल विजय दिवसानिमित्त कारगिल युद्धातील महाराष्ट्रातील वीरसैनिक, वीरपत्नी, वीरमाता तसेच दिव्यांग सैनिक यांच्या राष्ट्रसेवेतील अद्वितीय शौर्य, त्याग आणि अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वीरसैनिक व वीरसैनिकांच्या वीरपत्नींचा कृतज्ञता सन्मान सोहळाआयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा सोमवार, 27 जुलै 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता लोकभवन, मुंबई येथे होणार आहे.

            कारगिल युद्धातील वीर योद्धे, वीरनारी, वीरमाता तसेच दिव्यांग सैनिक यांच्या राष्ट्रसेवेतील अद्वितीय शौर्य, पराक्रम, त्याग आणि योगदानाला कृतज्ञ अभिवादन करण्याच्या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे रक्षण करताना भारतीय सशस्त्र दलातील वीर जवानांनी केलेल्या सर्वोच्च त्यागाची स्मृती जागविणे आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

            राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री ॲड. आशिष शेलार तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सन 1962 मध्ये महान गीतकार कविवर्य प्रदीप यांनी रचलेली आणि संगीतकार सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेली वीरनारी व वीरमातांना समर्पित ऐतिहासिक देशभक्तिपर रचना, स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांनी नव्याने स्वरबद्ध केली आहे. या रचनेतून राष्ट्रभक्ती, शौर्य आणि त्यागाच्या भावनेला उजाळा देण्यात येणार आहे.

            भारतीय सशस्त्र दलाच्या अदम्य शौर्य, पराक्रम, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेला अभिवादन करणारी देशभक्तिपर सांगीतिक प्रस्तुतीही या कार्यक्रमात सादर करण्यात येणार आहे. नचिकेत देसाई, शिवम सिंह आणि इतर ख्यातनाम कलाकारांच्या सादरीकरणातून भारतीय सैनिकांच्या शौर्यगाथेला सांगीतिक अभिवादन करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी दिली.

००००

Featured post

Lakshvedhi