Monday, 20 July 2026

स्पिक मॅके'च्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

 स्पिक मॅके'च्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

 

मुंबई, दि. 16 : 'सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक अँड कल्चर अमंग युथ' ('स्पिक मॅके) च्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली.

 

शिष्टमंडळाने भारतीय शास्त्रीय संगीत आणि संस्कृतीचा प्रसार करणाऱ्या 'स्पिक मॅके या संस्थेच्या उपक्रमांविषयीची  माहिती देणारी 'संदेश' या  पुस्त‍िकेची प्रत राज्यपालांना भेट दिली तसेच राज्यपालांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली येथे होणाऱ्या 'स्पिक मॅके'च्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचे निमंत्रण  दिले

राज्यातील नागरिकांना जलद, पारदर्शक आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी

 सेवांचे एकत्रीकरण व सुलभीकरण

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील नागरिकांना जलद, पारदर्शक आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने शासकीय सेवांचे व्यापक पुनरावलोकन केले आहे. त्यानुसार विविध विभागांतील सेवांचे एकत्रीकरण व सुलभीकरण करून सेवांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये दुहेरी सेवांचे एकत्रीकरण तसेच कालबाह्य व अन्य सेवांची समाप्ती करण्यात आली आहे.

महाडीबीटी 2.0, मैत्री आणि आपले सरकार 2.0 या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सर्व शासकीय सेवा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. सेवा वितरणात कोणताही तांत्रिक अडथळा येणार नाही, यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने सक्षम तांत्रिक व्यवस्था उभारावी, तसेच सर्व कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

डेटा ॲनालिटिक्स ॲज अ सर्व्हिस

 डेटा ॲनालिटिक्स ॲज अ सर्व्हिस आणि मिनी सेतू केंद्र प्रकल्पाचे लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या डेटा ॲनालिटिक्स ॲज अ सर्व्हिस आणि मिनी सेतू केंद्र या दोन प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पणसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, डेटा ॲनालिटिक्सच्या वापरामुळे प्रशासनातील उत्तरदायित्व अधिक प्रभावी होत असून गैरव्यवहार रोखणे, शासनाचा निधी वाचविणे आणि सेवा वितरणात पारदर्शकता वाढविणे शक्य होते. गडचिरोली जिल्ह्यातील माओवादमुक्त भागांमध्ये 'पोलीस दादालोरा खिडकी'चे 'सेतू केंद्रात' रूपांतर करण्याचा निर्णय नागरिकाभिमुख प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे सांगून या भागांमध्ये सर्व शासकीय सेवा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

भविष्य निर्वाह निधीचे वार्षिक विवरणपत्र सेवार्थवर उपलब्ध

 भविष्य निर्वाह निधीचे वार्षिक विवरणपत्र सेवार्थवर उपलब्ध

मुंबई, दि. २० : महालेखाकार (लेखा व हक्क), महाराष्ट्र, नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र शासनाच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (जीपीएफ) लेख्यांचे २०२५-२६ चे वार्षिक विवरणपत्र सेवार्थ प्रणालीवर उपलब्ध करून दिले असून, संबंधित कर्मचाऱ्यांनी आपल्या खात्याची माहिती काळजीपूर्वक तपासून आवश्यक त्रुटींची तत्काळ दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

ज्या कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी लेखे प्रधान महालेखाकार (लेखा व हक्क), नागपूर कार्यालयाकडे आहेत, त्यांना सेवार्थ पोर्टलवर वार्षिक विवरणपत्र पाहता, डाउनलोड करता व प्रिंट काढता येणार आहे. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांनी वेळेत माहितीची पडताळणी केल्यास निवृत्तीच्या वेळी निधी मंजुरीतील अनावश्यक विलंब टाळता येणार आहे.

 

महालेखाकार कार्यालय, नागपूर यांच्या कार्यालयात ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे लेखे ठेवले जात आहेत अशा कर्मचाऱ्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक सेवार्थमध्ये अद्ययावत करण्याबाबत  सूचना देण्यात आल्या आहेत.  जीपीएफशी संबंधित ओटीपी आणि अन्य महत्त्वाचे संदेश नोंदणीकृत मोबाईलवरच पाठविण्यात येणार असल्याने ज्यांचा मोबाईल क्रमांक अद्याप नोंदणीकृत नाही, त्यांनी आवश्यक तपशीलासह कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच वार्षिक विवरणपत्रातील नाव, जन्मतारीख आणि इतर वैयक्तिक माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्यावी. कोणतीही तफावत आढळल्यास संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्या माध्यमातून सेवार्थ आयडीसह आवश्यक कागदपत्रे पाठवून दुरुस्ती करून घ्यावीत.

 

याशिवाय, सेवार्थ पोर्टलवर लॉगिन करण्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत असणे आवश्यक असून, आयडी अथवा पासवर्ड उपलब्ध नसल्यास ‘Forgot Password’ पर्यायाचा वापर करून नव्याने संकेतशब्द तयार करता येणार आहे. कर्मचाऱ्यांनी आपल्या भविष्य निर्वाह निधी खात्यातील मासिक अभिदानाची नियमित नोंद तपासावी. अभिदानाची रक्कम खात्यात जमा न झाल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांमार्फत कोषागार प्रमाणपत्र, चलन क्रमांक, दिनांक आणि आवश्यक कागदपत्रांसह माहिती सादर करावी, असेही स्पष्ट केले आहे.

 

कर्मचाऱ्यांनी वेळेत माहितीची पडताळणी करून आवश्यक त्रुटी दूर कराव्यात, जेणेकरून निवृत्तीच्या वेळी भविष्य निर्वाह निधीची रक्कम मंजूर करताना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, असे आवाहन महालेखाकार (ले. व. ह.) ll महाराष्ट्र , नागपूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

महाराष्ट्र इको-टुरिझम बोर्डाची मान्यता, पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाकडून आवश्यक सीआरझेड मंजुरी

 महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र इको-टुरिझम बोर्डाची मान्यता, पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाकडून आवश्यक सीआरझेड मंजुरी आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांची तांत्रिक मान्यता देखील प्राप्त झाली आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निधीतून ४५ कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी यावेळी सांगितले.

या प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शाश्वत पर्यटन यांचा प्रभावी संगम साधला जाणार असून, मुंबई उपनगर जिल्ह्याच्या पर्यावरणीय व पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार आहे, असेही मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.

भांडूप पक्षी उद्यान हे भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित पक्षी शोध व निरीक्षण प्रणाली

 भांडूप पक्षी उद्यान हे भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित पक्षी शोध व निरीक्षण प्रणाली असलेले पर्यावरणपूरक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. सुमारे १.५ किलोमीटर परिसरात रिअल-टाईम पक्षी निरीक्षण, एआय आधारित पक्षी ओळख प्रणाली, स्वयंचलित ट्रॅकिंग, इव्हेंट ॲनालिटिक्स, रेकॉर्डिंग, प्लेबॅक आणि जैवविविधता दस्तऐवजीकरण यासारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच डिजिटल लेन्स इंटिग्रेशन, केंद्रीकृत डेटा व्यवस्थापन, लाईव्ह सिंक्रोनायझेशन आणि परस्परसंवादी डिजिटल प्रणालीमुळे देश-विदेशातील पर्यटक, संशोधक, पक्षी अभ्यासक आणि निसर्गप्रेमींसाठी हे केंद्र आकर्षणाचे ठरणार आहे.

भांडूप पक्षी उद्यान प्रकल्पाला गती देत पर्यावरण संवर्धनासह इको-टुरिझमला चालना

 भांडूप पक्षी उद्यान प्रकल्पाला गती देत पर्यावरण संवर्धनासह इको-टुरिझमला चालना


- मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड आशिष शेलार


· जिल्हा नियोजन निधीतून ४५ कोटी रुपयांचा निधी मं

मुंबई, दि. २० : मुंबई उपनगराच्या भांडूप येथील महत्त्वाकांक्षी भांडूप पक्षी उद्यान प्रकल्पाच्या उभारणीला गती मिळाली असून, पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि शाश्वत पर्यटनाला चालना देणारा हा प्रकल्प मुंबईसाठी महत्त्वाचा ठरणार आहे, यासाठी जिल्हा नियोजन निधीतून ४५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येत असल्याची माहिती, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली.


मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.शेलार यांनी भांडूप पक्षी उद्यान प्रकल्पाची पाहणी केली. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत स्थानिक आमदार मिहीर कोटेचा, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, नगरसेविका हेतल गाला मोरवेकर, दीपिका घाग आणि अधिकारी उपस्थित होते.


 आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य क्षेत्रात हा प्रकल्प प्रस्तावित असून, भांडूप पंपिंग स्टेशनलगत ठाणे खाडीच्या किनारी सुमारे २०.०९ हेक्टर क्षेत्रात त्याची उभारणी करण्यात येणार आहे. यापैकी केवळ ०.३५ हेक्टर क्षेत्रामध्ये पर्यावरणपूरक व कमी हस्तक्षेपाच्या तत्त्वावर पर्यटन सुविधा विकसित करण्यात येणार आहेत.

Featured post

Lakshvedhi