Thursday, 28 May 2026

दर्जेदार शिक्षणासोबतच दर्जेदार निवासावर शासनाचा भर

 दर्जेदार शिक्षणासोबतच दर्जेदार निवासावर शासनाचा भर

-          उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

 

·         वांद्रे येथे 'सर जे. जे. कला संस्था वसतिगृहाच्या' भव्य नव्या इमारतीची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पाहणी

·         एक हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींची निवास क्षमता; आधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज इमारत

मुले व मुलींसाठी प्रत्येकी १८२ स्वतंत्र खोल्या;

 

मुंबई, २७ मे:  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी वसतिगृहामध्ये आधुनिक आणि सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. याच ध्येयाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधायुक्त वसतिगृह उभारण्यावर शासनाचा मुख्य भर आहे, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

 

वांद्रे पूर्व येथील कलानगर परिसरात सुरू असलेल्या 'सर जे. जे. कला संस्था वसतिगृहाच्या' नव्या इमारतीच्या बांधकामाची मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पाहणी केली, आणि कामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणीदरम्यान त्यांनी बांधकामाची सद्यस्थिती, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच कामाच्या गुणवत्तेबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली व काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

संगीत शिक्षणाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्यासाठी अत्याधुनिक महाविद्यालय उभारणार

  

संगीत शिक्षणाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देण्यासाठी

 अत्याधुनिक महाविद्यालय उभारणार

-          उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

 

·         भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या नव्या इमारतीच्या कामाचा मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून आढावा

 

मुंबई, दि. २७ : राज्यातील संगीत शिक्षणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनातर्फे 'भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय' उभारण्यात येत आहे. इमारतीच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेऊन बांधकामाचा दर्जा उत्तम ठेवून ते निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये सुरू असलेल्या या महाविद्यालयाच्या भव्य आणि अत्याधुनिक इमारतीच्या बांधकामाची पाहणी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. या पाहणीवेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर आदिनाथ मंगेशकर, बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, संगीत क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तसेच नवे काही शिकण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे महाविद्यालय महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार आहे. आधुनिक सुविधा, दर्जेदार प्रशिक्षण आणि जागतिक दर्जाचे शैक्षणिक वातावरण यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला नवे व्यासपीठ मिळेल.

देशात आंतरराष्ट्रीय स्तरावरील संगीत शिक्षण संस्था उभी राहावी आणि भारतीय संगीत परंपरेचा गौरव जागतिक स्तरावर पोहोचावा, या उद्देशाने राज्य शासनाकडून या भव्य व अत्याधुनिक इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. या महाविद्यालयाच्या माध्यमातून पारंपरिक तसेच आधुनिक संगीत शिक्षणाला चालना मिळून राज्यातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.

0000

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करा

 राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण कर

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

·         राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीची मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पाहणी

 

मुंबई, दि. २७ : राज्यातील विद्यार्थी, संशोधक आणि वाचनप्रेमींसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारतीची कामे निर्धारित वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी  अधिकाऱ्यांना दिल्या.

 

राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या नवीन इमारत बांधकामाची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पाहणी केली यावेळी  उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की,  या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्यात आले असून

 फर्निचर, अंतर्गत सजावट आणि इतर पूरक कामे सुरू आहेत. या सर्व कामांमध्ये दर्जा राखून ती वेळेत पूर्ण करावीत.

आधुनिक तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे हे ग्रंथालय राज्यातील विद्यार्थ्यांसाठी, संशोधकांसाठी तसेच वाचन संस्कृती जोपासणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ज्ञानकेंद्र ठरणार आहे. अभ्यास, संशोधन आणि ज्ञानवृद्धीसाठी आवश्यक सुविधा या ग्रंथालयात उपलब्ध करून देण्यात येणार असून हे ग्रंथालय लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होईल, असेही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी  सांगितले

मत्स्य पाव’ मोबाईल फूड व्हॅन योजना

 मत्स्य पावमोबाईल फूड व्हॅन योजना

राज्यातील मच्छीमारांना मूल्यवर्धनातून अधिक उत्पन्न मिळावे आणि शहरी भागात स्वच्छ व पौष्टिक समुद्री खाद्य उपलब्ध व्हावे यासाठी मत्स्य पाव मोबाईल फूड व्हॅन’ योजना राबविण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत फिश पाव’, ‘मत्स्य वडापावआणि इतर मत्स्यजन्य पदार्थांची विक्री केली जाणार आहे. एका प्रकल्पाची अंदाजित किंमत सुमारे १२.५० लाख रुपये असून युवक, महिला बचत गट आणि मत्स्य उत्पादक संस्थांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध होणार आहे.

पावसाळी मासेमारी बंदी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्याबाबत सरकार सकारात्मक

 पावसाळी मासेमारी बंदी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्याबाबत सरकार सकारात्मक

 राज्यातील मत्स्यसाठ्यांचे संवर्धन, मच्छीमारांचे जीवित व आर्थिक संरक्षण; तसेच समुद्रातील वाढत्या वादळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पावसाळी मासेमारी बंदी कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्याबाबत शासनस्तरावर गंभीरपणे विचार सुरू आहे.

सध्या महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अंतर्गत दरवर्षी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत यांत्रिक व यंत्रचलित नौकांना मासेमारी बंदी लागू असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून समुद्रातील वादळी वातावरण, चक्रीवादळे व प्रतिकूल हवामानामुळे १ ऑगस्टनंतरही  मासेमारीसाठी समुद्रात जाणे शक्य होत नसल्याने; तसेच या कालावधीत मत्स्य प्रजननास  वाव असल्याने बंदी कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्याची मागणी मच्छीमार संघटनांकडून करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

तोट्यातील एसटी विभागांना नफ्याकडे नेण्यासाठी ‘पालक अधिकारी’

 तोट्यातील एसटी विभागांना नफ्याकडे नेण्यासाठी पालक अधिकारी

                                                        - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबई, दि. २७ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातत्याने तोट्यात चालणाऱ्या विभागांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि नफ्यात आणण्यासाठी व्यापक उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तोट्यातील प्रत्येक विभागासाठी प्रादेशिक व्यवस्थापक दर्जाच्या अथवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांची पालक अधिकारीम्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

 

एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात बोलाविण्यात आलेल्या बैठकीत मंत्री सरनाईक बोलत होते. या बैठकीला मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी प्रियंका नारनवरे, वित्तीय सल्लागार गिरीश देशमुख यांच्यासह सर्व खाते प्रमुख व प्रादेशिक व्यवस्थापक उपस्थित होते.

 

एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केवळ उत्पन्नवाढ नव्हे तर खर्च नियंत्रण, इंधन बचत, महसूल गळती रोखणे आणि प्रशासकीय शिस्त यांचा एकत्रित विचार करून ही कार्यपद्धती राबविण्यात येणार आहे. यासाठी संबंधित पालक अधिकाऱ्यांवर विभागाच्या आर्थिक प्रगतीची थेट जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे.

 


किनारी सुरक्षेसाठी समन्वय यंत्रणा अधिक सक्षम करणार

 किनारी सुरक्षेसाठी समन्वय यंत्रणा अधिक सक्षम करणार मंत्री नितेश राणे

 

मुंबई, दि.२७ : महाराष्ट्राचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लक्षात घेता किनारी सुरक्षा अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे. राज्यातील सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय वाढवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सागरी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात येईल. मच्छीमार, किनारी भागातील नागरिक आणि सागरी वाहतुकीची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे  मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

 

मंत्रालयात सागरी किनारीपट्टी  सुरक्षेच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत मंत्री राणे बोलत होते. यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव रामास्वामी एन, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

राज्यातील किनारी सुरक्षेची यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय वाढविणे, सागरी गस्त अधिक बळकट करणे तसेच पोलीस विभागासाठी आवश्यक जेट्टी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन गंभीर असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

0000

Featured post

Lakshvedhi