Thursday, 28 May 2026

दर्जेदार शिक्षणासोबतच दर्जेदार निवासावर शासनाचा भर

 दर्जेदार शिक्षणासोबतच दर्जेदार निवासावर शासनाचा भर

-          उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

 

·         वांद्रे येथे 'सर जे. जे. कला संस्था वसतिगृहाच्या' भव्य नव्या इमारतीची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पाहणी

·         एक हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींची निवास क्षमता; आधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज इमारत

मुले व मुलींसाठी प्रत्येकी १८२ स्वतंत्र खोल्या;

 

मुंबई, २७ मे:  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी वसतिगृहामध्ये आधुनिक आणि सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. याच ध्येयाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधायुक्त वसतिगृह उभारण्यावर शासनाचा मुख्य भर आहे, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

 

वांद्रे पूर्व येथील कलानगर परिसरात सुरू असलेल्या 'सर जे. जे. कला संस्था वसतिगृहाच्या' नव्या इमारतीच्या बांधकामाची मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पाहणी केली, आणि कामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणीदरम्यान त्यांनी बांधकामाची सद्यस्थिती, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच कामाच्या गुणवत्तेबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली व काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi