Monday, 25 May 2026

खतांचा संतुलित वापर करण्यावर भर देण्यात यावा

 खतांचा संतुलित वापर करण्यावर भर देण्यात यावा

- राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल

राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी लाभदायक, निर्यातक्षम आणि मूल्यवर्धित पिकांकडे शेतकऱ्यांना वळविण्याच्या दिशेने कृषी विभागाने नियोजनबद्ध पावले उचलली जात आहेत. राज्यातील विविध पिकांचे उत्पादन, बाजारपेठ, निर्यात क्षमता आणि मागणी यांचे मॅपिंग करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी अधिक उत्पन्न देणाऱ्या आणि बाजारपेठेतील संधी असलेल्या पिकांकडे वळू शकतील. सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन विविध स्तरांवर प्रयत्न करत असून रासायनिक खतांचा संतुलित वापर, नैसर्गिक शेती पद्धती आणि पर्यावरणपूरक कृषी व्यवस्थेला चालना देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

             यावेळी कृषि क्षेत्रातील विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे लोकार्पण करण्यात आले.


खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व्यापक नियोजन

 खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व्यापक नियोजन

- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी जिल्हानिहाय व तालुकानिहाय नियोजन करण्यात आले असून आवश्यक बियाणे व खतांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. मागील वर्षी अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि पुरामुळे सुमारे १ कोटी ३६ लाख शेतकरी बाधित झाले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने १५ हजार कोटी रुपयांहून अधिक मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली होती. यंदाच्या खरीप हंगामासाठी सुमारे २०.१६ लाख क्विंटल बियाण्यांची गरज असताना २८.०६ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असून खतांचा पुरेसा साठाही राखून ठेवण्यात आला आहे. एल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन कृषी विभागाने यंदा ठिबक सिंचन, तुषार सिंचन, मल्चिंग, सेंद्रिय खत, रुंद वरंबा-सरी तंत्रज्ञान आणि हवामान बदलास सहनशील बियाण्यांच्या वापरावर भर दिला आहे. खरीप हंगामासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक बियाणे उपलब्ध करून देण्यात आले असून खतांचा पुरेसा साठाही राखून ठेवण्यात आला आहे. महाविस्तार ॲप, अग्रीस्टॅक योजना, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कृषी धोरण, ड्रोन आणि रोबोटिक्सच्या वापराद्वारे शेती अधिक आधुनिक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी शिकणे सक्तीचे

 १५ ऑगस्टपर्यंत रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी शिकणे सक्तीचे

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. २२ : राज्यातील प्रवाशांसोबत रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीत संवाद साधता यावा, यासाठी त्यांना मराठी भाषा शिकविण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिकणे सक्तीचे असून, १६ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला

आपला दवाखाना’ ही योजना केवळ उपचारापुरती मर्यादित नसून नागरिकांच्या

 मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, ‘आपला दवाखाना’ ही योजना केवळ उपचारापुरती मर्यादित नसून नागरिकांच्या दैनंदिन आरोग्य सुरक्षेचा महत्त्वाचा आधार बनत आहे. राज्यातील प्रत्येक गरजू नागरिकापर्यंत मोफत आणि सुलभ आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

या योजनेंतर्गत प्रत्येक दवाखान्यासाठी वार्षिक आर्थिक तरतूद करण्यात आली असून वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, आरोग्य सेवक, सुरक्षा रक्षक आणि सफाई कर्मचारी अशी मनुष्यबळ व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. एप्रिल २०२६ अखेरपर्यंत ३५०० मंजूर पदांपैकी २९५७ पदे भरली गेली असून उर्वरित पदभरती प्रक्रिया सुरू आहे.

निर्णयानुसार राज्यभरात ७०० “आपला दवाखाना” सुरू करण्यास मान्यता

 मंत्री आबिटकर म्हणाले की, राज्य शासनाने ११ जुलै २०२३ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यभरात ७०० आपला दवाखाना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. यामागचा उद्देश शहरी भागातील गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत ४७५ दवाखाने शासन संस्थांमार्फत तर २२५ दवाखाने बाह्य संस्थांमार्फत चालविण्यात येत आहेत.

 

सध्या ४४९ दवाखाने इन-हाऊसपद्धतीने तर २२५ दवाखाने बाह्य संस्थांमार्फत कार्यान्वित असून एकूण ६७४ दवाखान्यांमधून नागरिकांना सेवा दिली जात आहे. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील २१ आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रातील ५ दवाखाने लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

 

या दवाखान्यांमधून नागरिकांना मोफत बाह्यरुग्ण तपासणी, १०५ प्रकारची मोफत औषधे, ३० प्रकारच्या प्रयोगशाळा चाचण्या, गरोदर मातांची तपासणी, मानसिक आरोग्य समुपदेशन, आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा तसेच मोफत लसीकरण सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

आपला दवाखाना’ योजनेमुळे सर्वसामान्यांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध

 ‘आपला दवाखाना योजनेमुळे सर्वसामान्यांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध

- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबई : दि.२२  : राज्यातील शहरी, झोपडपट्टी तसेच सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना दर्जेदार व मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना प्रभावीपणे राबविली जात असून आतापर्यंत राज्यात ६७४ दवाखाने कार्यान्वित करण्यात आले आहेत. उर्वरित २६ दवाखानेही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

 

मंत्री आबिटकर म्हणाले की, राज्य शासनाने ११ जुलै २०२३ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यभरात ७०० आपला दवाखाना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. यामागचा उद्देश शहरी भागातील गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत ४७५ दवाखाने शासन संस्थांमार्फत तर २२५ दवाखाने बाह्य संस्थांमार्फत चालविण्यात येत आहेत.

मुंबई आणि एमएमआरला जागतिक आर्थिक केंद्र बनवण्याचा संकल्प

 मुंबई आणि एमएमआरला जागतिक आर्थिक केंद्र बनवण्याचा संकल्प

 मुंबई हे देशाचे ग्रोथ इंजिनअसून संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशाला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आर्थिक क्षेत्र बनवण्याचे सरकारचे ध्येय आहे.

नीती आयोगाने दिलेल्या रोडमॅपनुसार मुंबईचा जीडीपी दुप्पट करण्यासाठी आणि मुंबईला ग्लोबल फिनटेक कॅपिटलबनवण्यासाठी राज्य सरकार वेगाने काम करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi