Monday, 25 May 2026

स्लम फ्री’ मुंबईसाठी विशेष अभियान

 स्लम फ्रीमुंबईसाठी विशेष अभियान

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानच्या माध्यमातून मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली जात आहे. नेत्रम तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपग्रह डेटा, जीआयएस मॅपिंग आणि डिजिटल पाळत ठेवून नवीन अतिक्रमणे रोखली जाणार आहेत. धारावी पुनर्विकास हा जगातील सर्वात मोठ्या आधुनिक पुनर्विकास प्रकल्पांपैकी एक ठरणार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पात्र आणि अपात्र नागरिकांसाठी स्वतंत्र गृहनिर्माण योजना राबवल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले.

डिजिटल हाऊसिंग पोर्टल आणि क्लस्टर पुनर्विकास

  

डिजिटल हाऊसिंग पोर्टल आणि क्लस्टर पुनर्विकास

एआय आधारित केंद्रीकृत डिजिटल हाऊसिंग पोर्टल विकसित करण्यात येत असून, त्यामध्ये जिओ-टॅगिंग, लँड बँक, महारेरा, महाभूलेख आणि पीएम गतिशक्ती यांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. क्लस्टर रीडेव्हलपमेंट आणि पुनर्विकास प्रकल्पांना प्राधान्य देत प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Sunday, 24 May 2026

गृहनिर्माण क्षेत्रात मोठे बदल

 गृहनिर्माण क्षेत्रात मोठे बदल

मुंबईत १२ लाख आणि एमएमआरमध्ये २० लाख घरांची गरज लक्षात घेऊन सरकारने १७ वर्षांनंतर नवीन गृहनिर्माण धोरण लागू केले आहे.

माय होम माय राईट या संकल्पनेतून २०३० पर्यंत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी ३५ लाख घरे उभारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

 

सॅटेलाईट शहरांना स्वयंपूर्ण आर्थिक केंद्र बनवणार

 सॅटेलाईट शहरांना स्वयंपूर्ण आर्थिक केंद्र बनवणार

कल्याणला लॉजिस्टिक्स हब, डोंबिवलीला नॉलेज आणि सर्व्हिस सेक्टर हब, अंबरनाथला औद्योगिक आणि एमएसएमई हब तर बदलापूरला शाश्वत नागरी विकासाचे मॉडेल बनवले जात आहे. सॅटेलाईट शहरांना केवळ निवासी विस्तार न ठेवता रोजगार, उद्योग आणि आधुनिक सुविधांनी युक्त स्वयंपूर्ण आर्थिक केंद्र बनवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

‘६० मिनिटांची मुंबई’ हे लक्ष्य

 ६० मिनिटांची मुंबईहे लक्ष्य

मुंबईतील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट सिस्टीम विकसित केली जात आहे. मुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ६० मिनिटांत पोहोचता आले पाहिजे, हे लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एमएमआरमध्ये ३३७ किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क उभारले जात असून मेट्रो लाईन्स २बी, , , , ७ए, ९ आणि १२ मुळे शहरी वाहतुकीत मोठा बदल होणार आहे.

मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्य यंत्रणा सज्ज ; सादरीकरणातून माहिती

 मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्य यंत्रणा सज्ज ; सादरीकरणातून माहिती

केंद्र व राज्य शासनाच्या विविध शासकीय यंत्रणांची मान्सूनपूर्व तयारीबाबत सादरीकरणातून मुख्यमंत्री फडणवीस यांना माहिती दिली. आगामी मान्सून हंगामाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागामार्फत राज्य शासनाच्या पूर्वतयारी आणि आपत्ती प्रतिसाद व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. यावेळी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी सादरीकरण केले.

भारतीय लष्कर, नौदल, वायुदल, तटरक्षक दल तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांच्याशी समन्वय वाढविण्यात येत असून, आपत्कालीन परिस्थितीसाठी विविध यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. वेस्टर्न नौदल कमांडकडून मोठी व लहान जहाजे, हेलिकॉप्टर व इंटरसेप्टर क्राफ्ट उपलब्ध ठेवण्यात आले आहेत, तर वायुदलाकडून एअर ॲम्ब्युलन्स आणि एअर कार्गो सुविधा सज्ज आहेत. राज्यात एसडीआरएफच्या 10  टीम कार्यरत असून आणखी दोन टीमना मान्यता देण्यात आली आहे.

मुंबईत अतिवृष्टी आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणांसाठी 43 मोठे पंपिंग स्टेशन कार्यरत करण्यात आले असून, स्मार्ट पंप मॉनिटरिंग प्रणाली सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, कोकण व घाट विभागातील रेल्वेमार्गांवर सुरक्षेच्या दृष्टीने गाड्यांचा वेग नियंत्रित ठेवण्यात येणार आहे. रुग्णालयांमध्ये 3 हजार खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून, आपत्ती व्यवस्थापन केंद्रे 24x7 कार्यरत राहणार आहेत.

आपत्तीमध्ये राज्य शासनाची तत्पर मदत

 आपत्तीमध्ये राज्य शासनाची तत्पर मदत

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन म्हणाले, पावसाळ्यामध्ये धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावात पूर निर्माण होतो या परिस्थितीत समन्वय नसल्यास मोठी हानी होते. यादृष्टीने संबंधित विभागांमध्ये योग्य समन्वय आणि सतर्कता महत्त्वाचे आहे. कमजोर पुलांमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट व त्यावर नुसार कार्यवाही करताना धोकादायक पुलांवरील वाहतूक देखील बंद केली जावे. आवश्यक उपाययोजना लागू करण्यात याव्यात, असे मंत्री महाजन म्हणाले.

             मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील म्हणाले, शेतकऱ्यांची शेती, घर, पशुधन व मनुष्यहानीचे पंचनामे पूर्ण करून विशेष पॅकेज मंजूर करण्यात आले. खरीप हंगामासाठी प्रति हेक्टर 10 हजार रुपये मदत, वाहून गेलेल्या जमिनीसाठी 47 हजार रुपये भरपाई तसेच रोजगार हमी योजनेतून ₹5 हजार रुपये पर्यंत अनुदान देण्यात आले.

अतिवृष्टीनंतर राज्य शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने मदत उपाययोजना राबवल्या.

सुमारे 11 हजार विहिरींसाठी प्रथमच प्रति विहीर 30 हजार रुपये नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली. मदतीची मर्यादा 2 हेक्टरवरून 3 हेक्टरपर्यंत वाढविण्यात आली. राज्यातील 1.06 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे 16,224 कोटी रुपये जमा करण्यात आले.

Featured post

Lakshvedhi