Friday, 22 May 2026

वसुधा एआय सेवा आणि सक्रिय पीक सल्ला प्रणाली

 वसुधा एआय सेवा आणि सक्रिय पीक सल्ला प्रणाली

महाविस्तार एआय व वसुधा या आय आधारित व्हॉईस सेवेद्वारे शेतकऱ्यांना टोल-फ्री क्रमांक १५५३१३ वरून थेट कृषी मार्गदर्शन दिले जात आहे. या सेवेमध्ये पीक माहिती, बाजारभाव, हवामान सल्ला, काढणी-पश्चात व्यवस्थापन तसेच शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून दिली जाते. ८२ टक्के सकारात्मक प्रतिसाद नोंदविण्यात आला आहे. तसेच १,००० हून अधिक कॉल गुणवत्ता तपासण्या करण्यात आल्या असून सरासरी संवाद कालावधी ३ मिनिटे इतका आहे.

महाविस्तार 2.0

 महाविस्तार 2.0

महाविस्तार 2.0 या ॲप मध्ये शेतकरी डायरी, पीक सल्ला, हवामान अंदाज, कीड-रोग ओळख, बाजारभाव, योजना व डीबीटी माहिती, तसेच  एआय आधारित चॅटबॉट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय टेलिफोन आधारित सल्ला, डिजिटल पीक नोंदी (डीसीएस) आणि अधिक सुलभ वापरासाठी नवीन यूआय सादर करण्यात आले आहे.

खतांचा संतुलित वापर करण्यावर भर देण्यात यावा

 खतांचा संतुलित वापर करण्यावर भर देण्यात यावा

- राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल

राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल म्हणाले, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी लाभदायक, निर्यातक्षम आणि मूल्यवर्धित पिकांकडे शेतकऱ्यांना वळविण्याच्या दिशेने कृषी विभागाने नियोजनबद्ध पावले उचलली जात आहेत. राज्यातील विविध पिकांचे उत्पादन, बाजारपेठ, निर्यात क्षमता आणि मागणी यांचे मॅपिंग करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी अधिक उत्पन्न देणाऱ्या आणि बाजारपेठेतील संधी असलेल्या पिकांकडे वळू शकतील. सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन विविध स्तरांवर प्रयत्न करत असून रासायनिक खतांचा संतुलित वापर, नैसर्गिक शेती पद्धती आणि पर्यावरणपूरक कृषी व्यवस्थेला चालना देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

             यावेळी कृषि क्षेत्रातील विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे लोकार्पण करण्यात आले.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची विशेष मुलाखत

 जय महाराष्ट्रकार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्रकार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानामुळे निर्माण होणारी नवी आव्हाने, डिजिटल व्यवहारांमधील फसवणूक तसेच ऑनलाइन सुरक्षिततेबाबत नागरिकांनी घ्यावयाची काळजी याविषयी या मुलाखतीत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही विशेष मुलाखत दोन भागांत प्रसारित होणार असून पहिला भाग मंगळवार दि. 26 मे 2026 आणि दुसरा भाग मंगळवार दि. 2 जून 2026 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाज माध्यमांवरही ही मुलाखत उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचेता गरुडे यांनी केले आहे.

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

Facebook: https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube: https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

 

डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे स्वरूप अधिक तांत्रिक आणि गुंतागुंतीचे होत असल्याचे संजय शिंत्रे यांनी मुलाखतीत स्पष्ट केले. डिजिटल अरेस्ट, फिशिंग, बनावट कॉल्स, सोशल मीडियावरील फसवणूक, व्हॉईस क्लोनिंग, डीपफेक व्हिडिओ तसेच AI आधारित फसवणुकीच्या नव्या प्रकारांबाबत नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अल्पवयीनांना लक्ष्य करून होणारे सायबर गुन्हे, वैयक्तिक माहितीची चोरी, ऑनलाइन आर्थिक फसवणूक आणि गोपनीयतेशी संबंधित वाढते धोके याविषयीही या मुलाखतीत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच सायबर गुन्ह्यांची तक्रार कशी आणि कुठे नोंदवावी, तक्रार करताना कोणती खबरदारी घ्यावी आणि सायबर सुरक्षेसाठी राज्य व केंद्र शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती "जय महाराष्ट्र" कार्यक्रमातून देण्यात आली आहे.

0000

पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; भीतीपोटी अनावश्यक खरेदी टाळावी

 पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; भीतीपोटी अनावश्यक खरेदी टाळावी

 –मंत्री छगन भुजबळ

मे महिन्यात नेहमीपेक्षा 20 टक्के अधिक पेट्रोल-डिझेल विक्री झाल्याची माहिती

 

मुंबई, दि. 22 : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात इंधनटंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र, महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले की, राज्यात कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नाही. त्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल-डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत असल्याचे निदर्शनास आले असून, त्यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे 20 टक्के अधिक पेट्रोल-डिझेलची विक्री झाल्याची माहिती त्यांनी दिली.

केंद्र व राज्य शासन प्रत्येक नागरिकाला पुरेशा प्रमाणात इंधन उपलब्ध करून देण्यास सक्षम आहेत. त्यामुळे अफवा किंवा भीतीच्या वातावरणामुळे अतिरिक्त साठा करण्याची आवश्यकता नाही, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

यावेळी त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमधील गेल्या काही दिवसांतील इंधन विक्रीची आकडेवारीही माध्यमांसमोर मांडली. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

00000

जगातील ३० वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. पुढील २ ते ३ वर्षांत महाराष्ट्र

 अर्थव्यवस्थेच्या व्याप्तीबाबत महाराष्ट्र भारतातील इतर कोणत्याही राज्याशी स्पर्धा करत नसून, जगातील ३० वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. पुढील २ ते ३ वर्षांत महाराष्ट्र सिंगापूर आणि युएई च्या अर्थव्यवस्थेलाही मागे टाकणार आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे 'फोर्स मल्टिप्लायर' म्हणून काम करत आहेत. भौगोलिक माहिती प्रणाली, डेटा ट्रॅकिंग आणि डेटा पूलचा प्रभावी वापर यात केला जात आहे. हे उद्दिष्ट केवळ कागदावर नसून, त्यासाठी एक 'आर्थिक सल्लागार समिती' स्थापन करण्यात आली आहे. या समितीने प्रत्येक क्षेत्राच्या विकासाचा आराखडा तयार केला आहे. याशिवाय, 'विकसित महाराष्ट्र २०४७' हे व्हिजन तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये २०३० पर्यंत अल्पकालीन २०३५ पर्यंत मध्यकालीन आणि २०४७ पर्यंत दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यावेळी यांनी सांगितले.

संशोधन, नवोपक्रम व जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राची भरारी

 संशोधन, नवोपक्रम व जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राची भरारी

                                                      -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप, युनिकॉनची राजधानी

पुढील दोन वर्षात महाराष्ट्र सिंगापूर आणि युएई ला मागे टाकणार

 

मुंबई, दि . २२:  कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवतंत्रज्ञानाच्या साह्याने महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये देशात आपला ठसा उमटवित आहे. संशोधन, नवोपक्रम, पायाभूत सुविधा, आर्थिक उत्पन्न या क्षेत्रात महाराष्ट्राच्या जवळपास देशातील कुठलेही राज्य नाही.  नवीन उद्योग,  तंत्रज्ञानातरीत व्यवसाय आणि डाटा सेंटर आधारित उद्योग स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र ही मजबूत परिसंस्था बनत आहे. त्यामुळे संशोधन, नवोपक्रम आणि जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र भरारी घेत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

जिओ वर्ल्ड सेंटर येथे इमॅजिनेक्स २०२६ या कार्यक्रमात रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली.

महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टा बाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप आणि युनिकॉर्नची राजधानी आहे. २०१५ मध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुमारे १४ लाख कोटी रुपयांची होती, जी आज ५४ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या १० वर्षांत आपण अर्थव्यवस्थेचा आकार तिपटीहून अधिक वाढवला आहे.देशातील इतर अनेक राज्ये १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याबाबत बोलत आहेत, परंतु सध्या केवळ महाराष्ट्रच या उद्दिष्टाच्या सर्वात जवळ आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सध्या ६६० बिलियन डॉलरवर आहे. महाराष्ट्राचा सामान्य वृद्धी दर १० टक्के राहिला आहे. याच गतीने प्रगती कायम राहिल्यास, २०२५-२०२६ या वर्षातील 'अल् निनो'सारख्या नैसर्गिक आव्हानांमुळे थोडा फरक पडला तरी, आपण २०३० पर्यंत १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल

Featured post

Lakshvedhi