Thursday, 14 May 2026

रायगड जिल्हा पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्वाचा जिल्हा असून जिल्ह्यातील पर्यटनाला चालना

 मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, रायगड जिल्हा पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्वाचा जिल्हा असून जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनाची कामे गतीने करण्यात यावीत. प्रादेशिक पर्यटन मधील जी प्रलंबित कामे आहेत त्याची सद्यस्थिती काय आहे हे लक्षात घेवून पर्यटन विभागाने वित्त विभागाकडे जिथे निधीची आवश्यकता आहे त्याची मागणी करावी. पर्यटन विभागाची कामे करण्यासाठी उपलब्ध निधीतून कामांची प्राथमिकता लक्षात घेवून निधी देण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल. व स्टार गेझिंगचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेला पाठविण्यात येईल. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे निवासी न्याहारीचे नोंदणीचे कॅम्प आयोजित करण्यासाठी कार्यवाही करावी. स्वदेश दर्शन योजना प्रस्ताव लवकरात लवकर केंद्र शासनाकडे पाठवावा असे निर्देश त्यांनी दिले.

रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील

 वृत्त 1691

रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील

-पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई,दि.१३: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पर्यटन विभागाने कार्यवाही करावी अशा सूचना पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.

           मेघदूत शासकीय निवासस्थान येथे रायगड लोकसभा मतदारसंघातील पर्यटन विभागाच्या कामासंदर्भात आयोजित बैठकीत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते.

यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार सुनिल तटकरे, पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, उपसचिव संतोष रोकडे, उपसचिव विजय पोवार, पर्यटन संचालनालयचे उपसंचालक रविंद्र पवार यासह रायगड जिल्ह्याचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीव्दारे बैठकीला उपस्थित होते.

प्रधानमंत्री पीक विमा योजना ही योजना

 प्रधानमंत्री पीक विमा योजना ही योजना क्षेत्र हा घटक धरून राबविण्यात येत असून, पिकनिहाय अधिसूचित विमा क्षेत्र घटक म्हणजेच मंडळ, मंडळगट किंवा तालुका याप्रमाणे निर्धारित केलेल्या विमा क्षेत्रात राबविण्यात येते. सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या कार्यपद्धतीनुसार विमा संरक्षणाच्या बाबींसाठी योजनेंतर्गत खरीप व रब्बी हंगामाकरिता पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरित परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोग आधारे व तांत्रिक उत्पादनाच्या आधारे, महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देय असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

                                     

खरीप हंगाम २०२५ पासून राज्यात सुधारित पीक विमा

 खरीप हंगाम २०२५ पासून राज्यात सुधारित पीक विमा योजना ही केवळ पीक कापणी प्रयोगावर उत्पादन आधारित राबविण्यात येत आहे. परभणी जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी भारतीय कृषी विमा कंपनी यांचेमार्फत करण्यात येत आहे.तर लातूर जिल्ह्यात  आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड यांच्यामार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात सन २०१६ पासून राबविण्यात येत आहे.

परभणी व लातूर जिल्ह्यातील ‍पीक विम्याचा सुधारित प्रस्ताव पाठवावा

 परभणी व लातूर जिल्ह्यातील ‍पीक विम्याचा सुधारित प्रस्ताव पाठवावा

-कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

 

मुंबई, दि. १३: परभणी व लातूर जिल्ह्यातील ज्या मंडळ परिसरातील पीक विम्याबाबत शेतक-यांच्या तक्रारी प्राप्त आहेत त्यांचा सुधारित प्रस्ताव केंद्राला  पाठवून त्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

            परभणी व लातूर  जिल्ह्यातील  शेतक-यांच्या पीक विमा वाटपातील तक्रारीबाबत आयोजित बैठकीत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी आमदार राजेश विटेकर,आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार संजय बनसोडे, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, कृषि आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक कृषी विनय कुमार आवटे, जिल्हाधिकारी परभणी रघुनाथ गावडे हे व्हीसीव्दारे उपस्थित होते.

            मंत्री श्री.भरणे म्हणाले की, परभणी व लातुर जिल्हयातील जिल्ह्यातील  शेतकऱ्यांवर पीक विमा वाटपातील तक्रारीबाबत सर्व बाबींची तपासणी विमा कंपन्या,स्थानिक क्षेत्रीय अधिकारी तसेच कृषि विभागाने करून केंद्राला सुधारित प्रस्ताव पाठवावा. प्रस्तावात त्रुटी न ठेवता विहित कालावधीत प्रस्ताव सादर करण्याची खबरदारी विभागाने घ्यावी

राज्यात हिमोफिलीया रुग्णांना तातडीने आणि प्रभावी

 राज्यात हिमोफिलीया रुग्णांना तातडीने आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यात डे-केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून, राज्यात एकूण ५ हजार ४९७ हिमोफिलीया रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या आजाराचे कमी तीव्र, मध्यम तीव्र आणि तीव्र असे वर्गीकरण असून, मध्यम व तीव्र स्वरूपाच्या रुग्णांमध्ये अचानक रक्तस्त्राव होण्याचा धोका अधिक असतो. या रुग्णांना तातडीने  निदान, उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी प्रत्येक जिल्ह्यात सामाईक डे-केअर सेंटर अद्यावत करावीत. तसेच रुग्णांचा डाटा एकत्रित करून या आजाराला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.

हिमोफिलीया उपचारासाठी एका महिन्यात तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

 हिमोफिलीया उपचारासाठी एका महिन्यात तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे

मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

·         राज्यात ५ हजार ४९७ रुग्णांची नोंद; प्रत्येक जिल्ह्यात डे-केअर सेंटर कार्यान्वित

 

मुंबई, दि. १३ : हिमोफिलीया रुग्णांचे ऑनलाईन पोर्टल द्वारे ट्रॅकिंग करून त्यांना देण्यात येणाऱ्या उपचाराची  अद्ययावत नोंद ठेवावी तसेच एका महिन्याच्या आत  हिमोफिलीयासाठी राज्यस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. राज्यातील हिमोफिलीया रुग्णांवरील उपचारासंदर्भात आरोग्य सेवा आयुक्तालाय मुंबई येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

 

यावेळी मंत्री आबिटकर यांनी गुजरात, जम्मू काश्मीर, केरळ, कर्नाटक यासह इतर राज्यात हिमोफिलीया संदर्भात राबविण्यात येत असलेल्या धोरणांचा अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) च्या पीआयपी  वार्षिक कार्यक्रम कृती आराखड्यात  हिमोफिलीया आजारासाठी निधी मिळावा यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले.

Featured post

Lakshvedhi