Sunday, 19 April 2026

डेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी

 डेटा सेंटर कंपन्यांना आवश्यक जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

·         मध्य पूर्व आशियातील अनेक नामांकित कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूकीसाठी उत्सुक

·         संबंधित कंपन्यांना वीज उपलब्धताही प्राधान्याने करुन देण्याचे निर्देश

 

मुंबई दि 18:- जगभरातून तसेच प्रामुख्याने मध्य पूर्व आशियातील डेटा सेंटर क्षेत्रातील अनेक नामांकित कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूकीसाठी उत्सुक आहेत. या पार्श्वभूमीवर करार झाल्यानंतर संबंधित कंपन्यांना त्वरित जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे डेटा सेंटर्स संदर्भात सादरीकरण आणि बैठक झाली. यावेळी उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी महानगर आयुक्त डॉ संजय मुखर्जीऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्लामुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्राप्रधान सचिव डॉ श्रीकर परदेशीउद्योग विभागाचे प्रधान सचिव पी.अन्बळगनसिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघलमुख्यमंत्री यांचे गुंतवणूक व धोरण विषयक सल्लागार कौस्तुभ धवसे उपस्थित होते.

आवश्यक वीजनिर्मिती व सुरळीत वीजपुरवठ्यासाठी यंत्रणा सज्ज

 आवश्यक वीजनिर्मिती व सुरळीत वीजपुरवठ्यासाठी यंत्रणा सज्ज

रुफटॉप सौर ऊर्जेमुळे फायदा होत आहे. वीज निर्मितीसाठी पुरेसा कोळसा व पाण्याची उपलब्धताही आहे. वीजनिर्मिती व पुरवठा सुरळीत रहावा यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात मॉन्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामेही करण्यात येत आहेत. आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती यावेळी ऊर्जा विभागामार्फत देण्यात आली‌.

           

·         कोयना जलविद्युत प्रकल्प: गरजेनुसार १८०० मेगावॅट पर्यंत पूर्ण क्षमतेने वापर

·         आपत्कालीन परिस्थितीत: आवश्यकतेनुसार अतिरिक्त वीज खरेदी

·         एमएमआरमधील प्रसारण प्रणालीचे मजबूतीकरण

पुरेशा वीज खरेदीची व्यवस्था

·         मुंबई आयलँडिंग योजना कार्यरत ही एक महत्त्वाची सुरक्षा यंत्रणा असूनग्रीडमध्ये बिघाड झाल्यास मुंबईला स्वतंत्रपणे चालवण्याची क्षमता.

·         मोठ्या प्रमाणातील वीज खंडित होण्यापासून संरक्षण

·         भिरा पंप्ड स्टोरेज प्रकल्प कार्यरत

·         सर्व ब्लॅक स्टार्ट ड्रिल्स यशस्वीरीत्या पूर्ण

·         राज्य लोड डिस्पॅच केंद्र (SLDC) च्या बॅकअप कंट्रोल ड्रिल पूर्ण ज्यामुळे मुख्य नियंत्रण केंद्रात अडचण आल्यास कामकाज सुरळीत चालू राहू शकते.

वीजनिर्मिती व पुरवठा सुरळीत राहण्यासाठी 'एआय'चा वापर करावा

 वीजनिर्मिती व पुरवठा सुरळीत राहण्यासाठी 'एआय'चा वापर करावा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·                     आवश्यक वीजनिर्मिती व सुरळीत वीजपुरवठ्यासाठी यंत्रणा सज्ज

·                     उन्हाळ्याच्या काळातील 'पीक डिमांडसंदर्भात वीज वितरण आढावा बैठक

 

मुंबईदि १८: वीजनिर्मिती व वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ऊर्जा विभाग व संबंधित यंत्रणांनी 'एआय'चा वापर करून यासंदर्भातील व्यवस्थापन करण्यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उन्हाळ्याच्या काळातील 'पीक डिमांडसंदर्भात वीज वितरण आढावा बैठक झाली. यावेळी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्लामुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्राप्रधान सचिव डॉ श्रीकर परदेशीटाटा पॉवरअदाणी पॉवरचे व 'बेस्ट'चे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीउन्हाळा व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा विभाग व संबंधित यंत्रणांनी वीजनिर्मिती व पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर कराव्यात. यासाठीच्या व्यवस्थापनासाठी तसेच देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी 'एआय'चा वापर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की उपस्थिति में एमएमआरडीए और रायगढ़–पेण ग्रोथ सेंटर के बीच शेयरधारक समझौता

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की उपस्थिति में एमएमआरडीए और रायगढ़पेण ग्रोथ सेंटर के बीच शेयरधारक समझौता

 

मुंबई, 18 अप्रैल: MMRDA और रायगढ़पेण ग्रोथ सेंटर के बीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की उपस्थिति में शेयरधारक समझौता संपन्न हुआ।

 

यह कार्यक्रम सह्याद्री राज्य अतिथि गृह में आयोजित किया गया। इसमें महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जीऊर्जा विभाग की अपर मुख्य सचिव आभा शुक्लामुख्यमंत्री के अपर मुख्य सचिव लोकेश चंद्राप्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशीउद्योग विभाग के प्रधान सचिव पी. अन्बलगनप्रबंध निदेशक विजय सिंघलमुख्यमंत्री के निवेश एवं नीति सलाहकार कौस्तुभ धवसे तथा ऑरेंज सिटी ग्रुप के निखिल गांधी उपस्थित थे।

समझौते के अंतर्गत मुख्य बिंदु:

·         रायगढ़पेण ग्रोथ सेंटर लिमिटेड का विकास

·         एकीकृत टाउनशिप नीति का प्रस्ताव

·         स्मार्ट सिटी के रूप में विकास

·         रायगढ़ जिले के पेण तालुका में विस्तार

·         प्रमुख बंदरगाह क्षेत्रों से कनेक्टिविटी

·         आत्मनिर्भर (स्व-निर्भर) टाउनशिप

'मित्रा'आणि ‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’ यांच्यात ५६ लाख वृक्षारोपण व उपक्रमांबाबत करार

 'मित्रा'आणि अर्थ डे नेटवर्क इंडिया’ यांच्यात

५६ लाख वृक्षारोपण व उपक्रमांबाबत करार

 

मुंबईदि. १८ : महाराष्ट्र शासनाची धोरणात्मक सल्लागार संस्था आलेल्या  महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA) आणि अर्थ डे नेटवर्क इंडिया यांच्यात राज्यामध्ये पर्यावरणीय उपक्रम राबवण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत ५६ लाख वृक्षारोपणासह विविध उपक्रम राबवून  राज्यातील हवामान कृतीला (Climate Action) गती देण्यात येणार आहे.


नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एज्युसिटीस्टार्टअप आणि संशोधनला चालना मिळणार

 प्रकल्प आराखडा तयार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एज्युसिटी व मेडिसिटी आकारास येईल. यासंदर्भातील प्रक्रिया सुरु झाली असून प्रकल्पासाठी जागा संपादित करण्यात येत असल्याची माहिती सिडकोच्या वतीने देण्यात आली. मेडीसीटीसाठीही आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.

स्टार्टअप आणि संशोधनला चालना मिळणार

जगातील नामांकित आणि अग्रगण्य विद्यापीठे देशात तसेच महाराष्ट्रात आपले कॅम्पस सुरु करत आहेत. या माध्यमातून विविध क्षेत्रातील दर्जेदार उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. तसेच स्टार्ट अप्सची संख्याही वाढेल. या विद्यापीठांच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

एज्युसिटी व मेडिसिटीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीएज्युसिटी व मेडिसिटीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या विद्यापीठांतून उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. जागतिक पातळीवरील अनेक नामांकित विद्यापीठांनी यासंदर्भात उत्सुकता दर्शवली असल्याने या नामांकित विद्यापीठांनी येथे त्यांचे कॅम्पस सुरु करण्यासाठी संबंधित विभाग व यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

Featured post

Lakshvedhi