'मित्रा'आणि ‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’ यांच्यात
५६ लाख वृक्षारोपण व उपक्रमांबाबत करार
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र शासनाची धोरणात्मक सल्लागार संस्था आलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA) आणि अर्थ डे नेटवर्क इंडिया यांच्यात राज्यामध्ये पर्यावरणीय उपक्रम राबवण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. या कराराअंतर्गत ५६ लाख वृक्षारोपणासह विविध उपक्रम राबवून राज्यातील हवामान कृतीला (Climate Action) गती देण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment