Friday, 3 April 2026

मीरा-भाईंदर क्षेत्रातील रिक्षा परवाने पुनर्तपासणीचे आदेश

 मीरा-भाईंदर क्षेत्रातील रिक्षा परवाने पुनर्तपासणीचे आदेश

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

 

मुंबईदि. २ : मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रिक्षा परवाने व बॅच वितरणाची संपूर्ण पुनर्तपासणी करून १ मेपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

 

आमदार नरेंद्र मेहता यांनी दिलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यातील सर्व परिवहन अधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकरअतिरिक्त परिवहन आयुक्त भरत कळसकरउपसचिव चेतन निकम तसेच राज्यभरातील परिवहन अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

दक्षता पथकाच्या माहितीनुसार, जप्त केलेल्या गॅसचा घरगु

 हॉटेल साईयश परिसरात केलेल्या या कारवाईदरम्यान एलपीजी टँकरचे सील तोडून गॅस चोरी करताना दोन व्यक्ती रंगेहात आढळून आल्या. तपासात एचपी कंपनीचे दोन कॅप्सूल टँकर (क्रमांक MH43 K 5921 व MH43 CK 5747) आढळले. या टँकरमध्ये अनुक्रमे १७,५९० किलो व १७,६३० किलो एलपीजी गॅस साठवलेला होता.


याशिवाय घटनास्थळावरून १९.२ किलो क्षमतेचे १७ भरलेले व ६ रिकामे सिलेंडर, १४.२ किलोचा १ भरलेला सिलेंडर तसेच ५ किलोचे २ भरलेले सिलेंडर जप्त करण्यात आले. एकूण ३५,२२० किलो एलपीजी गॅस, २ टँकर आणि २६ सिलेंडर असा सुमारे १ कोटी २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


दक्षता पथकाच्या माहितीनुसार, जप्त केलेल्या गॅसचा घरगुती वापरासाठी उपयोग केला असता सुमारे २४८० कुटुंबांची गरज भागू शकली असती. या प्रकरणी संबंधित आरोपींविरोधात छत्रपती संभाजी नगर,एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे

शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाची मोठी कारवाई ;

 शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाची मोठी कारवाई ;

१.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त

वैजापूर रोडवर एलपीजी चोरी प्रकरण उघड

 

मुंबई: दि.३, शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठी कारवाई करत एलपीजी गॅस चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे.  २ एप्रिल २०२६ रोजी मिळालेल्या माहितीनुसार नियंत्रक शिधावाटप  चंद्रकांत डांगे यांच्या सूचनेवरून व  गणेश बेल्लाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर रोडवरील मौजे खोजेवाडी शिवारात धाड टाकण्यात आली.

हॉटेल साईयश परिसरात केलेल्या या कारवाईदरम्यान एलपीजी टँकरचे सील तोडून गॅस चोरी करताना दोन व्यक्ती रंगेहात आढळून आल्या. तपासात एचपी कंपनीचे दोन कॅप्सूल टँकर (क्रमांक MH43 K 5921 व MH43 CK 5747) आढळले. या टँकरमध्ये अनुक्रमे १७,५९० किलो व १७,६३० किलो एलपीजी गॅस साठवलेला होता.

सुमारे १५,२७५ नोंदणीकृत उमेदवारांमधून जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावरील

 कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागमहाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय,राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ,उद्योग भागीदार व तांत्रिक संस्था यांनी हे यश मिळवण्यासाठी गेल्या वर्षभरापासून विशेष मेहनत घेतली होती. सुमारे १५,२७५ नोंदणीकृत उमेदवारांमधून जिल्हाविभाग आणि राज्य स्तरावरील चाळणी परीक्षेतून ५४ सर्वोत्तम उमेदवारांची राष्ट्रीय स्तरासाठी निवड करण्यात आली होती. स्पर्धेपूर्वी या उमेदवारांना तज्ज्ञांमार्फत विशेष 'बूटकॅम्पप्रशिक्षण आणि मानसिक तयारीसाठी समुपदेशनही देण्यात आले होते. इंडिया स्किल्स स्पर्धेतील या विजयामुळे महाराष्ट्रातील यशस्वी उमेदवारांना आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. २०२६ मध्ये चीनमधील शांघाय येथे सप्टेंबर मध्ये होणाऱ्या 'वर्ल्ड स्किल्सस्पर्धेसाठी आता या विजेत्यांच्या प्रशिक्षणाची पुढील फेरी लवकरच सुरू होणार आहे.

जागतिक स्तरावर भारताचे नेतृत्व करण्याची क्षमता आपल्या तरुणांमध्ये आहे. पदके जिंकणाऱ्या

 मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले कीकेंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभ पार पडला आहे.महाराष्ट्रातील तरुणांमध्ये अफाट कौशल्य आहेहे या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. जागतिक स्तरावर भारताचे नेतृत्व करण्याची क्षमता आपल्या तरुणांमध्ये आहे. पदके जिंकणाऱ्या सर्व उमेदवारांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांचे मी अभिनंदन करतो. आगामी वर्ल्ड स्किल्स स्पर्धेतही महाराष्ट्र अशीच उत्तुंग कामगिरी करेलयाची मला खात्री आहे.महाराष्ट्र २०२७ मध्ये राज्यस्तरीय महिला कौशल्य चॅम्पियन्स ही स्पर्धा सुरू करणार आहे.

इंडिया स्किल्स स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी ! ४ सुवर्ण पदकांसह एकूण १७ पदक केली प्राप्त कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले विजेत्यांचे कौतुक इंडिया स्किल्सची आगामी स्पर्धा होणार मुंबईत

  

इंडिया स्किल्स स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी !

४ सुवर्ण पदकांसह एकूण १७ पदक केली प्राप्त

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले विजेत्यांचे कौतुक

इंडिया स्किल्सची आगामी स्पर्धा होणार मुंबईत

 

मुंबईदि.३ :  'वर्ल्ड स्किल्सस्पर्धेसाठी रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या 'इंडिया स्किल्स २०२५-२६स्पर्धेत महाराष्ट्रातील स्पर्धकांनी ४ सुवर्ण८ रौप्य आणि ५ कांस्य पदकांची  अशी एकूण १७ पदके प्राप्त केली आहेत. उत्तर प्रदेश येथे ग्रेटर नोएडा मधील इंडिया एक्स्पो सेंटर अँड मार्ट येथे ही स्पर्धा पार पडली. आगामी २०२७-२०२८ ची ही स्पर्धा मुंबईत होण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे या यशाबद्दल राज्याचे कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संपूर्ण चमूचे आणि विजेत्या खेळाडूंचे मनापासून अभिनंदन केले आहे.

पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर

 पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणीचा सुधारित कार्यक्रम जाहीर

 

मुंबईदि. ३ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-२०२३ या परीक्षेत शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची चाचणी पूर्वी प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. आता सुधारित कार्यक्रमानुसार ही शारीरिक चाचणी १५ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत घेण्यात येणार आहे.

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा-२०२३ या परीक्षेचा निकाल ९ मे २०२५ रोजी जाहीर करण्यात आला होता.परीक्षेत शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची चाचणी पूर्वी प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती.

आता सुधारित कार्यक्रमानुसार ही शारीरिक चाचणी १५ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत घेण्यात येणार आहे. चाचणी नवी मुंबई येथील पोलीस मुख्यालयरोडपालीसेक्टर १७कळंबोली येथे पार पडणार असून ती डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीद्वारे घेतली जाणार आहे.

उमेदवारांनी शारीरिक चाचणीच्या तयारीच्या दृष्टीने याची नोंद घ्यावीअसे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे. चाचणीचा सविस्तर कार्यक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.

Featured post

Lakshvedhi