Friday, 3 April 2026

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून युवकांना स्वावलंबनाची संधी

 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून युवकांना स्वावलंबनाची संधी

- उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

·         उद्योग विभागाची उल्लेखनीय कामगिरी

 

मुंबईदि. २ : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना (CMEGP) अंतर्गत आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये युवकांना उद्योजकतेकडे कळविण्यासाठी प्रोत्साहन देत मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती साध्य करण्यात उद्योग विभागाला उल्लेखनीय यश मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती मराठी भाषा व उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांनी दिली.

Thursday, 2 April 2026

राज्यातील एलपीजीच्या पुरवठ्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात

 राज्यातील एलपीजीच्या पुरवठ्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल म्हणालेजागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने आणि शिपिंग कंपन्यांकडून दरवाढ झाल्याने अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या निर्देशानुसार राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एलपीजी पुरवठ्याचे टप्प्याटप्प्याने वितरण सुरू असून प्राधान्य क्षेत्रांना दिलासा देण्यात येत आहे.

उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील

 उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील

-राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबईदि. 2 : महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहेया भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी काळजी घेत आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे एलपीजी गॅसच्या जागतिक तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्वदेशी उद्योगाबरोबर विदेशी गुंतवणुकीच्या उद्योगांना तसेच नागरिकांना गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावायासाठी राज्य शासनामार्फत आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगून या संकटात कोणत्याही उद्योगाला राज्य शासन अडचण येऊ देणार नाहीअशी ठाम भूमिका राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली.

अभियानाच्या प्रगतीचा जिल्हानिहाय आढावा

 अभियानाच्या प्रगतीचा जिल्हानिहाय आढावा

महसूल मंत्री श्री बावनकुळे यांनी अभियानाच्या प्रगतीचा जिल्हानिहाय आढावा देखील घेतला. शिबिरांमध्ये येणाऱ्या प्रत्येक अर्जावर ठराविक वेळेत निर्णय घ्यावा. तसेच नागरिकांना अनावश्यक त्रास होऊ नयेयाची विशेष दक्षता घेण्याचे  निर्देश अधिकाऱ्यांना त्यांनी दिले. लोकांपर्यंत या शिबिरांची माहिती पोहोचावी यासाठी व्यापक जनजागृती करावी. शिबिरांमध्ये जमिनीच्या नोंदीफेरफारवारस नोंद आणि इतर प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यावर यंत्रणेने विशेष भर द्यावाअसे निर्देश मंत्री श्री बावनकुळे यांनी यावेळी दिले.

00000

अभियानाच्या प्रगतीचा जिल्हानिहाय आढावा

 अभियानाच्या प्रगतीचा जिल्हानिहाय आढावा

महसूल मंत्री श्री बावनकुळे यांनी अभियानाच्या प्रगतीचा जिल्हानिहाय आढावा देखील घेतला. शिबिरांमध्ये येणाऱ्या प्रत्येक अर्जावर ठराविक वेळेत निर्णय घ्यावा. तसेच नागरिकांना अनावश्यक त्रास होऊ नयेयाची विशेष दक्षता घेण्याचे  निर्देश अधिकाऱ्यांना त्यांनी दिले. लोकांपर्यंत या शिबिरांची माहिती पोहोचावी यासाठी व्यापक जनजागृती करावी. शिबिरांमध्ये जमिनीच्या नोंदीफेरफारवारस नोंद आणि इतर प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यावर यंत्रणेने विशेष भर द्यावाअसे निर्देश मंत्री श्री बावनकुळे यांनी यावेळी दिले.

डिजिटल सातबारा आणि इतर प्रमाणपत्रे

 डिजिटल सातबारा आणि इतर प्रमाणपत्रे

अभियानात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत १,९०,१६२ डिजिटल सातबारा,२२,७३९ आठअ उतारे आणि २,४६,४५३ प्रमाणपत्रे नागरिकांना वाटप करण्यात आली. यामुळे नागरिकांना संबंधित कार्यालयात जाऊन वेळ खर्ची घालावा लागला नाही. ऑनलाइनडिजिटल दस्तऐवज तत्काळ मिळू शकले. भूसंपादन प्रकरणे आणि अकृषक परवानगीच्या अनुक्रमे २,६९९ आणि १,०४७ प्रकरणांमध्ये कमीजास्त पत्रकांची तयारी करून गाव दप्तर अद्ययावत करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

लाखो नागरिकांची प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली काढण्यात

 मंत्रालयात झालेल्या या बैठकीस राज्यमंत्री योगेश कदमआमदार, अपर मुख्य सचिव विकास खारगेसंबंधित अधिकारी उपस्थित होते. दि ७ आणि १४ मार्च रोजी पार पडलेल्या या अभियानाचा पहिला टप्पा यशस्वी झाला असूनयाद्वारे लाखो नागरिकांची प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली काढण्यात आली आहेत. महसूल विभागाशी संबंधित लोकांची केवळ किरकोळ स्वरूपाची नव्हे तर महत्वाच्या कामांचाही प्राधान्याने निपटारा होईल यादृष्टीने शिबिरांचे नियोजन करण्याचे निर्देश मंत्री डॉ. बावनकुळे यांनी यावेळी दिले.

Featured post

Lakshvedhi