Saturday, 14 March 2026

मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत सहभाग घ्यावा :

 वृत्त क्र 859

मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत सहभाग घ्यावा :

·         सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

 

मुंबई दि.13 : मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत अधिक सक्रियपणे सहभागी व्हावेअसे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत सहभाग घ्यावा यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरआमदार ज्ञानेश्वर म्हात्रेआमदार शांताराम मोरेआमदार सुलभा गायकवाडआमदार चंद्रकांत पाटीलआमदार अभिजित पाटीलआमदार मनिषा चौधरीआमदार दिलीप लांडेआमदार संजय उपाध्याय,  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे प्रधान सचिव डॉ.निपुण विनायकसार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे सचिव  ई. रवींद्रन, आयुष्मान भारत - मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटेराज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारीअण्णासाहेब चव्हाण व मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शिधावाटप विभागाच्या धडक कारवाईत वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड · मोठा साठा जप्त

 शिधावाटप विभागाच्या धडक कारवाईत

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड

·        मोठा साठा जप्त

 

मुंबई१३ मार्च : वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर शिधावाटप विभागाने धडक कारवाई करत मोठा साठा जप्त केला.

रहिवासी भागात धोकादायक पद्धतीने सिलिंडर साठवून काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा प्रकार या कारवाईत उघडकीस आला.

नियंत्रक शिधावाटप कार्यालयाच्या फिरत्या पथकाने आणि कार्यालय क्रमांक २१ च्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. वरळी नाका येथील गणपतराव कदम मार्गावरील सूरज वल्लभदास चाळ’ परिसरात गॅस सिलिंडरची अवैध साठेबाजी करून चढ्या दराने विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने तातडीने छापा टाकत अवैधरित्या साठवलेले सिलिंडर जप्त केले.

या कारवाईत एचपी गॅस कंपनीचे पाच किलोचे सहा भरलेले आणि ५८ रिकामे सिलिंडर हस्तगत करण्यात आले. तसेच सुपर गॅस कंपनीचे चार किलोचे ६४ भरलेले आणि १२ किलोचे १९ भरलेले सिलिंडर जप्त करण्यात आले. याशिवाय १२चार आणि दोन किलोचे विविध आकाराचे २५ रिकामे सिलिंडरही सापडले.

हे सिलिंडर बेकायदेशीररीत्या रिफिलिंग करून काळ्या बाजारात विकण्यासाठी ठेवण्यात आले होतेअशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जप्त करण्यात आलेला सर्व मुद्देमाल पुढील फौजदारी कारवाईसाठी वरळी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आला आहे. रहिवासी भागात अशा प्रकारे सिलिंडर साठवणे आणि त्यांची बेकायदेशीर विक्री करणे अत्यंत धोकादायक असून त्यामुळे नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होऊ शकतोअसे प्रशासनाने स्पष्ट केले.

ही कारवाई नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी विभागाची पथके २४ तास सतर्क असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

"प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य मिळावे

 

"प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी पारदर्शक आणि सक्षम व्यवस्था उभारली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा केली जात असल्याने त्यांना शेतीच्या हंगामी कामांसाठी आधार मिळत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता वेळेत वितरित केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

        "राज्यातील ९१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹१,८३७ कोटी थेट जमा होणार असून यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी मोठी मदत मिळणार आहे.

महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना ₹१,८३७ कोटी

 महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना ₹१,८३७ कोटी

राज्यातील सुमारे ९१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ₹१,८३७ कोटींची रक्कम थेट जमा होणार असून या निधीमुळे शेतकऱ्यांना बियाणेखतेऔषधे तसेच इतर शेतीच्या आवश्यक खर्चांसाठी वेळेवर आर्थिक मदत उपलब्ध होईल. शेतीच्या उत्पादनक्षमतेत वाढ होण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे आर्थिक बळकटीकरण करण्यासाठी ही योजना अत्यंत महत्वाची ठरत आहे. थेट लाभ हस्तांतरणाच्या ई- वितरण पद्धतीमुळे (डीबीटीमाध्यमातून ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे.

२०१९ मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत ४.२७ लाख कोटी रुपयांपेक्षा

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की२०१९ मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत ४.२७ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आली आहे. दरवर्षी पात्र शेतकरी कुटुंबांना ६,००० रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते.

       या २२ व्या हप्त्यात २.१५ कोटीहून अधिक महिला शेतकरी लाभार्थ्यांनाही आर्थिक मदत मिळाली असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

      यावेळी आसाममधील गुवाहाटी कोकराझार येथे पंतप्रधानांच्या हस्ते १९,४८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी" चा २२ वा हप्त्याचे डीबीटी हस्तांतरण प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते

    गुवाहाटी येथील समारंभात "प्रधानमंत्री किसान सन्मान निधी" चा २२ वा हप्त्याचे डीबीटी हस्तांतरण प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात मुंबई येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

          या कार्यक्रमाद्वारे देशभरातील सुमारे ९.३२ कोटी शेतकरी कुटुंबांच्या खात्यात १८,६४० कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट डीबीटी पद्धतीने जमा करण्यात आली. प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात २,००० रुपयांचा हप्ता जमा झाला.

किसान सन्मान निधी शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना

 किसान सन्मान निधी शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना

- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

·         प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित

·         मुंबई येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्यप्रणाली द्वारे सहभागी

·        महाराष्ट्रातील ९१ लाख शेतकऱ्यांना ₹१,८३७ कोटींचे वितरण

 

मुंबईदि. १३ : सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना ठरली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना बियाणेखत आणि इतर शेतीसंबंधित खर्च भागविण्यास मदत होत आहे असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले

Featured post

Lakshvedhi