Friday, 13 March 2026

खासगी पूर्व-प्राथमिक शाळांची नोंदणी, नियमन आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी अधिनियम आणणार

 खासगी पूर्व-प्राथमिक शाळांची नोंदणीनियमन आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी अधिनियम आणणार

– शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 

मुंबई,दि.१३ : राज्यातील तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना दर्जेदार व सुरक्षित पूर्व-प्राथमिक शिक्षण उपलब्ध व्हावेयासाठी खासगी पूर्व-प्राथमिक शाळांची पोर्टलवर अनिवार्य नोंदणीनियमनव गुणवत्ता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने अधिनियम आणण्याची प्रक्रिया सुरू आहेअशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली.

राज्यातील खासगी पूर्व-प्राथमिक शाळांची नोंदणी पोर्टलवर अनिवार्य करण्याबाबत सदस्य मनीषा चौधरी यांनी प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत सदस्य विक्रम पाचपुतेप्रवीण दटकेयोगेश सागर आणि अभिमन्यू पवार यांनी सहभाग घेतला.

मंत्री दादाजी भुसे म्हणाले कीपूर्व-प्राथमिक शिक्षण देणाऱ्या सर्व खासगी केंद्रांची माहिती राज्यजिल्हा प्रशासन आणि पालकांना एकत्रित स्वरूपात उपलब्ध व्हावीया उद्देशाने शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावरील प्री-स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टलवर नोंदणी करणे २४ एप्रिल २०२५ च्या शासन परिपत्रकाद्वारे बंधनकारक करण्यात आले आहे.

या पोर्टलवर शाळेचे स्थानवर्गखोल्यांची संख्याव्यवस्थापनविद्यार्थ्यांची संख्यापायाभूत सुविधाशाळेची इमारतक्रीडांगणस्वच्छतागृहपिण्याच्या पाण्याची व्यवस्थासीसीटीव्ही तसेच शिक्षक व कर्मचारी याबाबतची माहिती देणे अपेक्षित आहे. राज्यात आतापर्यंत १२ हजार ७३३ खाजगी पूर्व-प्राथमिक शिक्षण देणाऱ्या केंद्रांची नोंदणी झालेली असून उर्वरित संस्थांनाही नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहेअसेही मंत्री भुसे यांनी सांगितले.

मराठी शिकवली जात नसेल, तर त्यांना कायद्याची जाणीव करून देऊन आवश्यक कार्यवाही

 आमदार हारून खान यांनी ज्या शाळेबद्दल तक्रार केली आहेत्या शाळेची शिक्षण विभागामार्फत तातडीने तपासणी केली जाईल. तिथे मराठी शिकवली जात नसेलतर त्यांना कायद्याची जाणीव करून देऊन आवश्यक कार्यवाही केली जाईलअसे शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे म्हणालेमराठी विषय शाळेत शिकवणे हा नियम केवळ शासकीय शाळांपुरता मर्यादित नसून खासगीविनाअनुदानित आणि सर्व परकीय मंडळांच्या शाळांनाही लागू आहे. मराठी ही राज्याची अधिकृत भाषा असल्याने तिचे संवर्धन आणि शिक्षण नव्या पिढीला मिळणे आवश्यक असूनयाबाबत राज्य शासन कोणतीही तडजोड करणार नाही. ज्या माध्यमांच्या शाळात मराठी भाषा शिकविली जात नसेल त्यांना समज देऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. या आदेशाला न मानणाऱ्या संस्थाची मान्यता रद्द करण्यात येईलअसे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या प्रश्नाच्या चर्चेत विधानसभा सदस्य अतुल भातखळकरअमित देशमुख यांनी सहभाग घेतला.

                                                                                ००००

राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचाच; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार

 राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचाचनियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार

-         शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

 

मुंबईदि.१३ : राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याची अधिसूचना लागू करण्यात आली आहे. ज्या शाळा या नियमाचे उल्लंघन करतीलत्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईलअसे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य हारून खान यांनी या विषयासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुसे बोलत होते.

शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे म्हणाले की१ मार्च २०२० च्या अधिसूचनेनुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्यात आला आहे. काही आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय मंडळांच्या अभ्यासक्रमात मराठी ही 'दुसरी भाषाकिंवा 'तिसरी भाषाम्हणून शिकवणे बंधनकारक आहे. कोणत्याही परिस्थितीत मराठी वगळता येणार नाहीअसे त्यांनी स्पष्ट केले.

शासन व्याज देईल आणि या संस्था थेट विद्यार्थ्यांचे किंवा महाविद्यालयांचे शुल्क अदा

   उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले कीथकीत देयके वेळेवर अदा करण्यासाठी काही वित्तीय संस्थांशी (उदा. फेडरल बँक) चर्चा सुरू आहे. शासन व्याज देईल आणि या संस्था थेट विद्यार्थ्यांचे किंवा महाविद्यालयांचे शुल्क अदा करतीलजेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.शासकीय योजनांचा लाभ मिळत असूनही जे महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून अवास्तव 'इतर फीआकारतील किंवा प्रवेश प्रक्रियेत अडवणूक करतीलअशा महाविद्यालयांवर कठोर कारवाई केली जाईल. फॉर्म भरताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी राज्यात ४० केंद्रे सुरू केली जात आहेत. ही केंद्रे विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी आणि तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी मदत करतील.

या प्रश्नाच्या अनुषंगाने विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवारकैलास पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांसाठी 'अर्न अँड लर्न' सारख्या नवीन योजनेतून

 उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांसाठी 'अर्न अँड लर्नसारख्या नवीन योजनेतून सुमारे ५ लाख विद्यार्थ्यांना दरमहा दोन हजार रुपये अतिरिक्त मानधन देण्याची योजना राज्य शासन आखत आहे. या योजनेसंदर्भात अजून अधिकृत कोणतीही घोषणा नाही. याअंतर्गत विद्यार्थी विद्यापीठ किंवा महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपणलायब्ररी व्यवस्थापन किंवा सामाजिक कामात मदत करतील. यासाठी शासनमहाविद्यालय आणि सामाजिक संस्था मिळून निधी उभारतील. निर्वाह भत्ता ही योजना शहरांच्या वर्गवारीनुसार विद्यार्थ्यांना १० महिन्यांसाठी वसतिगृह भत्ता दिला जातो. मुंबई-पुण्यासारख्या शहरांसाठी दरमहा ६,००० रुपये (एकूण ६०,००० रुपये)महसूल विभागाच्या ठिकाणी ५,१०० रुपये आणि तालुका स्तरावर ४,८०० रुपये दिले जात आहेत

विद्यार्थ्यांसाठी 'अर्न अँड लर्न' सारख्या नवीन योजनेतून

 उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांसाठी 'अर्न अँड लर्न' सारख्या नवीन योजनेतून सुमारे ५ लाख विद्यार्थ्यांना दरमहा दोन हजार रुपये अतिरिक्त मानधन देण्याची योजना राज्य शासन आखत आहे. या योजनेसंदर्भात अजून अधिकृत कोणतीही घोषणा नाही. याअंतर्गत विद्यार्थी विद्यापीठ किंवा महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण, लायब्ररी व्यवस्थापन किंवा सामाजिक कामात मदत करतील. यासाठी शासन, महाविद्यालय आणि सामाजिक संस्था मिळून निधी उभारतील. निर्वाह भत्ता ही योजना शहरांच्या वर्गवारीनुसार विद्यार्थ्यांना १० महिन्यांसाठी वसतिगृह भत्ता दिला जातो. मुंबई-पुण्यासारख्या शहरांसाठी दरमहा ६,००० रुपये (एकूण ६०,००० रुपये), महसूल विभागाच्या ठिकाणी ५,१०० रुपये आणि तालुका स्तरावर ४,८०० रुपये दिले जात आहेत.

विद्यार्थ्यांसाठी अनेक वेळखाऊ बाबी होत्या त्यांची सुलभता केली. शिष्यवृत्ती अर्जातील माहितीची

 उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांसाठी अनेक वेळखाऊ बाबी होत्या त्यांची सुलभता केली. शिष्यवृत्ती अर्जातील माहितीची संख्या १३८ वरून  ६६  पर्यंत कमी करण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रे १७ वरून ८ वर आणली आहेत. आता सीईटी डेटा थेट वापरला जाणार असल्याने विद्यार्थ्यांना वारंवार जात प्रमाणपत्र किंवा इतर कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत. महाविद्यालयाची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन पहिल्या हप्त्याचे वितरण लवकर केले जाईल. शिष्यवृत्तीच्या वितरणाला पगारापेक्षाही अधिक प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. जून महिन्यापासून याची अंमलबजावणी होईल.

Featured post

Lakshvedhi