Friday, 13 March 2026

राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचाच; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार

 राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचाचनियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार

-         शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

 

मुंबईदि.१३ : राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याची अधिसूचना लागू करण्यात आली आहे. ज्या शाळा या नियमाचे उल्लंघन करतीलत्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईलअसे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य हारून खान यांनी या विषयासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री भुसे बोलत होते.

शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे म्हणाले की१ मार्च २०२० च्या अधिसूचनेनुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्यात आला आहे. काही आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय मंडळांच्या अभ्यासक्रमात मराठी ही 'दुसरी भाषाकिंवा 'तिसरी भाषाम्हणून शिकवणे बंधनकारक आहे. कोणत्याही परिस्थितीत मराठी वगळता येणार नाहीअसे त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi