Wednesday, 11 March 2026

केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट’ या उपक्रमाविषयी

 केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट’ या उपक्रमाविषयी

हा उपक्रम केंब्रिजच्या डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्मद्वारे इंग्रजी आणि मराठी भाषेत राबविण्यात येणार असून राज्यातील शासकीयअनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी तो उपलब्ध असेल. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये हवामान बदलाचे विज्ञानपरिसंस्थासमुदाय आणि अर्थव्यवस्थेवरील परिणाम तसेच नवीकरणीय ऊर्जाजबाबदार उपभोग आणि शाश्वत विकास याविषयीची समज विकसित करण्यात येणार आहे.

केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट’ कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना कृतीआधारित आणि संदर्भाधारित शिक्षण पद्धतीद्वारे पर्यावरणीय आव्हानांवर चिकित्सक विचार करण्यासप्रत्यक्ष जीवनातील परिस्थितींमध्ये ज्ञानाचा उपयोग करण्यास आणि शाश्वततेचा दैनंदिन जीवनाशी तसेच भविष्यातील करिअरशी संबंध समजून घेण्यास प्रोत्साहन दिले जाईल. तसेच जागतिक ग्रीन इकॉनॉमीमध्ये निर्माण होणाऱ्या संधींसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यासही या उपक्रमातून मदत होणार आहे.या उपक्रमाची अंमलबजावणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डीआयईटी) आणि राज्यातील सहभागी शाळांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.


0000

हवामान शिक्षणाला महत्त्व देण्यासाठी हा उपक्रम

 राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणालेहवामान शिक्षणाला महत्त्व देण्यासाठी हा उपक्रम चालू केला आहे. आठवी आणि नवव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांकरिता हा क्लायमेट क्वेस्ट ई-लर्निंग कार्यक्रमाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचं पर्यावरण विषयक ज्ञान देण्याचा प्रयत्न करणार आहे. हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या शाश्वत आणि पर्यावरणपूरक भविष्य घडविण्याच्या दृष्टीने बांधणीचे प्रतीक आहे. केंब्रिज  युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट व महाराष्ट्र शासनाचे संयुक्त प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सध्या हा अभ्यासक्रम इंग्रजी भाषेत सुरू करण्यात येणार असून या अभ्यासक्रमाचा मराठी अनुवाद लवकर उपल्बध करून ग्रामीण भागामधील सर्व विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमात सहभागी करुन घेता येईल.

केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट’ हा ई-लर्निंग उपक्रम

 पर्यावरण व हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट’ हा ई-लर्निंग उपक्रम शालेय शिक्षण विभागाने हाती घेतला आहे. शालेय शिक्षण विभाग व केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया यांच्यासोबत झालेल्या या सामंजस्य करारामुळे पर्यावरण कसे वाचवता येईल याबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्यास मदत होणार आहे.

विद्यार्थ्यांना पर्यावरण, हवामान बदल आणि त्यासंबंधित विषयांवरील सविस्तर अभ्यासक्रम

 शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले कीया उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरणहवामान बदल आणि त्यासंबंधित विषयांवरील सविस्तर अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांपासून या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार असून पुढे तो अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. याशिवाय शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबतही जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत. विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छताशाळा आणि घराच्या परिसरातील स्वच्छता याबाबत प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर दिला जाणार आहे. येत्या जून महिन्यात पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांमध्ये शालेय शिक्षण विभाग सक्रिय सहभाग घेणार असल्याचे त्यांनी सांगितले

हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांना सामोरे

 हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये हवामान साक्षरता विकसित करण्याच्या उद्देशाने राज्यातील शाळांमध्ये केंब्रिज क्लायमेट क्वेस्ट’ हा ई-लर्निंग उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) यांच्या माध्यमातून केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया यांच्या सोबत सामंजस्य करार करण्यात आला.

नवी मुंबईत गुरुवारी ‘हिंद-दी-चादर’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

 नवी मुंबईत गुरुवारी हिंद-दी-चादर’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

 

मुंबईदि. १० : संत परंपरा आणि शीख इतिहासातील महान प्रेरणास्थान असलेल्या गुरुंच्या जीवनकार्यावर आधारित हिंद-दी-चादर’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबई येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार१२ मार्च २०२६ रोजीसायं. ६:३० वाजता सिडको एक्झिबिशन सेंटरवाशीनवी मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे.

 

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात गुरुंच्या त्यागशौर्य आणि मानवतेच्या संदेशावर आधारित संगीतकथन आणि सांस्कृतिक सादरीकरणाच्या माध्यमातून प्रेरणादायी कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

 

विविध कलाकारांच्या सहभागातून हा कार्यक्रम रंगणार असून प्रेक्षकांना आध्यात्मिक व सांस्कृतिक वारशाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विविध मान्यवर उपस्थित राहणार असून समाजातील सर्व नागरिकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

000

शिष्यवृत्ती परीक्षेच्या उत्तरसूचीवर १७ तारखेपर्यंत आक्षेप नोंदविता येणार

 शिष्यवृत्ती परीक्षेच्या उत्तरसूचीवर १७ तारखेपर्यंत आक्षेप नोंदविता येणार

 

मुंबईदि. १० - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार २२ फेब्रुवारी२०२६ रोजी पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) घेण्यात आली. या परीक्षेची इयत्तानिहायपेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थीमार्गदर्शक शिक्षकपालकशाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरुन १० ते १७ मार्च २०२६ या कालावधीत ऑनलाईन स्वरूपात करता येईलअसे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी कळविले आहे.

सदर ऑनलाईन निवेदन पालकांकरिता संकेतस्थळावर व शाळांकरिता त्यांच्या लॉगीनमध्ये ऑब्जेक्शन ऑन क्वेशन पेपर अँड इंटेरिम ॲन्सर की या हेडिंगखाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. उपरोक्त ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपालसमक्ष अथवा ईमेलव्दारे) प्राप्त त्रुटी /आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईलअसेही परीक्षा परिषदेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

Featured post

Lakshvedhi