Wednesday, 11 March 2026

मोजणी प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी खासगी परवानाधारक भूमापकांची नियुक्ती

 मोजणी प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी

खासगी परवानाधारक भूमापकांची नियुक्ती

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबई,दि.१०: राज्यातील मोजणी प्रकरणांचा जलदपारदर्शक व गुणवत्तापूर्ण निपटारा करण्यासाठी खासगी परवानाधारक भूमापक व भूमापन अभिकरणांची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत नियम ४७ अन्वये निवेदनाद्वारे सांगितले.

 

राज्यात गेल्या काही वर्षांत मोजणी प्रकरणांच्या आवक संख्येत सातत्याने वाढ होत आहे. पोटहिस्साहद्द कायमबिनशेतीगुंठेवारीवनहक्क दावेनगर व गावठाण भूमापनसंयुक्त भूसंपादन व सिमांकन यांसारख्या विविध मोजणी प्रकरणांचा वेळेत निपटारा न झाल्यास नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होतो तसेच महसूल अभिलेख अद्ययावत करण्यात विलंब होतो. विद्यमान शासकीय मनुष्यबळ मर्यादित असल्याने सर्व प्रकरणांचा विहित कालावधीत निपटारा करणे आव्हानात्मक ठरत असल्याचे महसूल मंत्री  बावनकुळे यांनी नमूद केले.

 

ही परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने मोजणीचे काम खासगी परवानाधारक भूमापकांकडून करून घेण्याची तरतूद केली आहे. १३ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या अधिसूचनेद्वारे हद्द कायम मोजणीसाठीही परवानाधारक भूमापकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहेअसे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम

 महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम

-    राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई दि.१० : महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांना आळा घालून गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी शासन ‍ ठोस पावले उचलत आहे.  कायदा आणि सुरक्षेसाठी  शासनातर्फे शाळामहाविद्यालये ग्रामीण व शहरी भागात व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. असे राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत सांगितले.

            राज्यातील बालकांवरील अत्याचारामध्ये वाढ झाल्याबाबत आमदार सुहास बाबर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, राज्यात बालकांवरील अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी करण्यात आलेली सर्व कार्यवाही लोकप्रतिनिधींना उपलब्ध करून देण्यात येईल. मुंबईपुणे यांसारख्या महानगरपालिका क्षेत्रातील शाळा-महाविद्यालयांसह ग्रामीण भागातही मुला-मुलींसाठी 'गुड टच-बॅड टचविषयी विशेष अभियान राबवले जात आहे. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या अंतर्गत आतापर्यंत सुमारे ६१ हजार शाळांना भेटी देवून जनजागृती करण्यात येत आहे. मारहाणींच्या प्रकरणांमध्ये एकमेकांवर दबाव आणण्यासाठी महिला अत्याचार कायद्याचा वापर केला जातो याला देखील आळा घालण्यासाठी गृह विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत असेही ते म्हणाले.

राज्यात ११ नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय

 राज्यात ११ नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबई दि.१० : राज्यातील शासकीय कामकाजाचा वाढता व्यापजिल्ह्यांतील वाढती लोकसंख्या तसेच दुर्गम भागातील नागरिकांना प्रशासनिक सेवा अधिक सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात ११ नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत नियम ४७ अंतर्गत निवेदनाद्वारे दिली.

महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले कीराज्यातील लोकप्रतिनिधींकडून प्राप्त निवेदनेजिल्ह्यांची लोकसंख्याभौगोलिक क्षेत्रफळजिल्ह्यातील दुर्गम भागतालुक्यांची संख्याप्रशासकीय सोयीसुविधा आणि स्थानिक परिस्थिती या सर्व बाबींचा विचार करून अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. यासंदर्भात सर्व विभागीय आयुक्तांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते.

या प्रस्तावांची सखोल तपासणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय सचिव समितीच्या ९ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या बैठकीत राज्यात ११ नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली. तसेच प्रत्येक कार्यालयासाठी आवश्यक पदनिर्मितीसही मान्यता देण्यात आली. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या १० फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या बैठकीत अपर जिल्हाधिकारी संवर्गातील एस-२५ वेतनश्रेणीतील ११ नवीन पदे  व  प्रत्येक कार्यालयात एकूण १३ पदे या प्रमाणे १४३ पदे निर्माण करण्यास अंतिम मंजुरी देण्यात आली आहे.    

या निर्णयानुसार  ठाणेरत्नागिरीपुणेसातारासोलापूरजळगावनांदेडअमरावतीयवतमाळबुलढाणा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्यात येणार आहेत.या निर्णयामुळे प्रशासन अधिक सक्षम होऊन नागरिकांना शासकीय सेवा जलद आणि प्रभावीपणे उपलब्ध होण्यास मदत होईलअसे मंत्री महसूल चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही शासनाची धोरणात्मक योजना आहे या योजनेत

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीमुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही शासनाची धोरणात्मक योजना आहे या योजनेत ४००० मेगावॅटचे काम पूर्ण झाले आहे. यातून सध्या ८ लाख शेतक-यांना  निरंतर वीज देत आहोत या वर्षाच्या अखेरीर्यंत अतिरिक्त १० हजार मेगावॅटचे काम पूर्ण होईल ७५ टक्के शेतक-यांना आपण दिवसा वीज देऊ शकू. मागेल त्याला सौर कृषि पंप योजनेची खूप लोकप्रियता आहे. या योजनेची दखल आता जागतिक स्तरावर घेतली जात आहे. 'इंटरनॅशनल सोलर अलायन्स'ने (आयएसए) महाराष्ट्राच्या या योजनेला 'फ्लॅगशिप योजनाम्हणून मान्यता दिली असूनया कार्यासाठी राज्याला सात ते आठ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. केंद्र सरकारने देखील इतर राज्यांना महाराष्ट्राच्या या मॉडेलचे अनुकरण करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांना दिवसा १० तास अखंडित वीज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. या योजनेचा पुढचा टप्पा म्हणून आता 'बॅटरी स्टोरेज'वर भर दिला जाणार आहे असेही ते म्हणाले.

या प्रश्नाच्या चर्चेत आमदार नाना पटोले यांनी सहभाग घेतला.        

सौर तासांमध्ये निर्माण होणारी वीज साठवून ती चोवीस तास कशी वापरता

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सौर तासांमध्ये निर्माण होणारी वीज साठवून ती चोवीस तास कशी वापरता येईलयादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. बॅटरी स्टोरेजच्या माध्यमातून ही वीज ग्रीडसाठी देखील उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. भविष्यात कोल्ड स्टोरेजसाठी वीजदर कमी करणे आणि सौर ऊर्जेवर आधारित 'हायब्रिड कोल्ड स्टोरेजउभारण्याबाबतही शासन स्तरावर प्रयत्न करून यासंदर्भात निर्णय घेऊ असे ते म्हणाले.

सांधेदुखी म्हणजे नक्की काय?

 आजकाल आपण पाहतो की, वयाची चाळीशी ओलांडली की घराघरात गुडघेदुखी, कंबरदुखी आणि सांधेदुखीचे रुग्ण आढळतात. पूर्वी हा त्रास ६०-७० वर्षांनंतर व्हायचा, पण आता तरुणांनाही 'कॅल्शियम'च्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होण्याचा त्रास होत आहे. याचे मुख्य कारण काय? तर आपल्या शरीरातील हाडांना वंगण (Lubrication) पुरवणारा 'ग्रीस' सारखा द्रव पदार्थ सुकणे. आपल्या शरीरातील सांधे म्हणजे एखाद्या मशीनच्या बेरिंगसारखे असतात. जर त्यातील ऑईल संपले, तर दोन हाडे एकमेकांवर घासली जातात आणि प्रचंड वेदना होतात. पण काळजी करू नका! ऑपरेशनची वेळ येऊ नये यासाठी आपल्या स्वयंपाकघरात एक असा 'हाडांचा खुराक' तयार करता येतो, जो नैसर्गिकरित्या वंगण वाढवतो.


सांधेदुखी म्हणजे नक्की काय? 


साध्या भाषेत सांगायचे तर, दोन हाडांच्या मध्ये 'कार्टिलेज' नावाचा एक मऊ थर असतो. जेव्हा आपण चुकीचा आहार घेतो किंवा शरीरात पोषक घटक कमी होतात, तेव्हा हा थर झिजतो. यामुळे हाडे एकमेकांवर आदळतात, सूज येते आणि चालताना 'कट-कट' असा आवाज येतो. यालाच 'संधिवात' किंवा 'ओस्टियोआर्थराइटिस' म्हणतात.


जालीम उपाय: 


५ वस्तूंचा 'शक्तीसंगम' हा उपाय इतका प्रभावी आहे की, याला आयुर्वेदात 'अस्थि वज्र' (Bone Strengthener) म्हटले जाते. यासाठी तुम्हाला ५ गोष्टी लागतील:


१. मेथी दाणे (Fenugreek Seeds): ५० ग्रॅम

का? मेथी दाणे हे हाडांमधील सूज आणि युरिक ॲसिड कमी करण्याचे काम करतात.

२. बाभळीचा डिंक (Edible Gum/Gond): ५० ग्रॅम

का? डिंक हा हाडांमधील 'ग्रीस' म्हणजेच नैसर्गिक वंगण वाढवण्यासाठी जगातील सर्वोत्तम पदार्थ आहे.

३. अळशी (Flax Seeds): ५० ग्रॅम

का? अळशीमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स असतात, जे हाडांना लवचिकता देतात.

४. सुंठ पावडर (Dry Ginger Powder): २ चमचे

का? सुंठ ही नैसर्गिक 'Painkiller' आहे, जी शरीरातील कुठल्याही भागातील वेदना खेचून घेते.

५. खारीक पावडर (Dry Dates Powder): १ कप

का? हाडांना मजबुती देण्यासाठी आणि नैसर्गिक कॅल्शियमचा पुरवठा करण्यासाठी.


मिश्रण कसे बनवाल? (कृती) 


स्टेप १: मेथी दाणे, अळशी आणि डिंक वेगवेगळे मंद आचेवर थोडे भाजून घ्या.

स्टेप २: भाजलेले घटक थंड झाल्यावर मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर करून घ्या.

स्टेप ३: या पावडरमध्ये सुंठ पावडर आणि खारीक पावडर नीट एकत्र करा.

स्टेप ४: हे मिश्रण एका कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवा.

स्टेप ५: चवीसाठी हवे असल्यास तुम्ही यात थोडा सेंद्रिय गूळ किंवा साजूक तूप वापरून लाडूही वळू शकता.


कसे आणि कधी घ्यायचे? 


* रोज सकाळी उठल्यावर कोमट पाण्यासोबत किंवा कोमट दुधासोबत १ मोठा चमचा हे मिश्रण घ्या.

 * यानंतर १ तास चहा किंवा कॉफी पिणे टाळा जेणेकरून शरीराला पूर्ण पोषण मिळेल.

याचे फायदे (Magic Results): * वंगण वाढेल: २१ दिवसात गुडघ्यातील 'कट-कट' आवाज बंद होऊन नैसर्गिक ग्रीस वाढू लागेल.

 * कॅल्शियमचा साठा: तुमची हाडे आतून लोखंडासारखी मजबूत होतील आणि थकवा जाणवणार नाही.

 * सूज गायब: सांध्यांवरील सूज उतरून तुम्ही पुन्हा पूर्वीसारखे चालू-फिरू शकाल.

 * कंबरदुखीवर रामबाण: फक्त गुडघेच नाही, तर मान आणि कंबरदुखीमध्येही त्वरित आराम मिळेल.


कोणी घ्यावे? 


ज्यांना सांधेदुखीचा जुनाट त्रास आहे, ज्यांना जिने चढताना त्रास होतो किंवा ज्यांची हाडे कमकुवत आहेत, त्यांनी हा उपाय किमान २ महिने करावा.


डॉक्टरांचा सल्ला: हा एक घरगुती आयुर्वेदिक उपाय आहे. जर तुमचे आधीच काही गंभीर उपचार सुरू असतील, तर तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.


आपले शरीर हीच आपली खरी संपत्ती आहे. हा साधा पण प्रभावी उपाय करा आणि महागड्या शस्त्रक्रिया टाळून स्वतःच्या पायावर पुन्हा उभे राहा. ही माहिती गरजू लोकांपर्यंत नक्की पोहोचवा, कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी दुखणे कायमचे दूर होईल!

सौर तासांमध्ये निर्माण होणारी वीज साठवून ती चोवीस तास कशी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "सौर तासांमध्ये निर्माण होणारी वीज साठवून ती चोवीस तास कशी वापरता येईलयादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. बॅटरी स्टोरेजच्या माध्यमातून ही वीज ग्रीडसाठी देखील उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. भविष्यात कोल्ड स्टोरेजसाठी वीजदर कमी करणे आणि सौर ऊर्जेवर आधारित 'हायब्रिड कोल्ड स्टोरेजउभारण्याबाबतही शासन स्तरावर प्रयत्न करून यासंदर्भात निर्णय घेऊ असे ते म्हणाले.

Featured post

Lakshvedhi