Wednesday, 11 March 2026

*भारत कधी हारतो?* Pl share

 *भारत कधी हारतो?*


भारताने क्रिकेट सामना जिंकल्यानंतर भरपूर फटाके वाजवून आपण आनंद व्यक्त करतो. परंतु नेहमीच्या आपल्या रोजच्या जीवनात आपण भारताला अनेक वेळा स्वतःहून हरवत असतो. चला जाणून घेऊया आपण भारताला कुठे कुठे आणि कधी कधी हरवतो.


ज्यावेळी कचरा हा कचरा कुंडीत न टाकता कुठेही रस्त्यावर टाकतो तेव्हा भारत हारतो.


जेव्हा आपण बाहेर सार्वजनिक ठिकाणी, रेल्वे मध्ये, बस मध्ये, गाडी चालवत असताना पचापच पिचकाऱ्या मारतो तेव्हा भारत हारतो.


येथे थुंकू नये असा फलक लावलेला असतो तेथेच थुंकतो तेव्हा भारत हारतो.


कोर्ट, कचेरी, सार्वजनिक इमारती मधील सगळे जीने, कोपरे, स्वच्छता गृहे लाल बुंद करतो तेव्हा भारत हारतो.


थुंकू नये म्हणून देवाचे फोटो लावावे लागतात आणि तरीही थुंकतो तेव्हा भारत हारतो.


काढलेल्या कर्जाचे हप्ते वेळेवर न भरता कर्ज कसे बुडीत जाईल असा विचार करतो तेव्हा भारत हारतो.


ग्राहकांकडून वाजवी नफा घेऊन माल न विकता अवास्तव नफा घेतो तेव्हा भारत हारतो.


खरेदीसाठी बाहेर पडताना थैली न घेता जातो आणि भरपूर प्लास्टिक पिशव्या घेऊन घरी येतो तेव्हा भारत हारतो.


गर्दीच्या ठिकाणी रांगेत न जाता मध्येच घुसतो तेव्हा भारत हारतो. 


आंदोलन, मोर्चे काढताना सरकारी, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करतो तेव्हा भारत हारतो.


लोकांशी कठोरपणे अव्यवहाने वागतो तेव्हा भारत हारतो.


शेजारीपाजारी किरकोळ कारणावरून वाद घालतो तेव्हा भारत हारतो.


गरीब भाजीवाल्याकडे हुज्जत घालतो आणि हाॅटेलमध्ये गेल्यावर चार पाच हजारांचे झटक्यात ऑनलाईन पेमेंट करतो तेव्हा भारत हारतो. 


बसमध्ये, रेल्वेमध्ये प्रवास करताना कचरा आणि अस्वच्छता करतो तेव्हा भारत हारतो.


पर्यटनासाठी बाहेर निसर्गात गेल्यावर तेथे कचरा, बाटल्या फेकतो तेव्हा भारत हारतो.


वाहने चालवताना फोनवर बोलत गाडी चालवतो तेव्हा भारत हारतो.


वाहतुकीचे नियम न पाळता अत्यंत बेदरकारपणे वाहने चालवतो व आपल्या बरोबर दुसऱ्यांच्या जीवाला धोका उत्पन्न करतो तेव्हा भारत हारतो.


कायदे, नियम हे दुसऱ्यांनी पाळण्यासाठी आहेत असा विचार करतो व स्वतः बेदरकारपणे वागतो तेव्हा भारत हारतो.


गाडी पार्क करताना मोकळी जागा आहे म्हणून कशीही पार्क करतो तेव्हा भारत हारतो.


प्रत्यक्ष आणि फोनवर बोलताना शिष्टाचाराचे पालन करत नाही तेव्हा भारत हारतो.


आपला धर्म संस्कृती टिकावी वाढावी यासाठी काहीही करत नाही व फक्त मौजमजा करण्यासाठी जगतो तेव्हा भारत हारतो.


घरातील सदस्यांना नातेवाईकांना चांगली, सन्मानाने वागणूक देत नाही तेव्हा भारत हारतो.


दुसऱ्याचं वाईट चिंतन करतो, द्वेष मत्सर करतो तेव्हा भारत हारतो.


गैरमार्गाने भ्रष्टाचार करून घरात पैसा आणतो तेव्हा भारत हारतो.


समाजात वावरताना महिलांकडे वाईट नजरेने पाहतो तेव्हा भारत हारतो.


स्वदेशीचा आग्रह न धरता विदेशी वस्तू व वाहने खरेदी करतो तेव्हा भारत हारतो.


पाण्याचे हवेचे कसलाही विचार न करता प्रदूषण करतो तेव्हा भारत हारतो.


पाणी, वीज, पेट्रोल डिझेल यांचा अंधाधुंद वापर करतो तेव्हा भारत हारतो.


आपल्याला मिळणारा पगार, मानधन, मजुरी याचा योग्य परतावा न देता कामचुकारपणा करतो तेव्हा भारत हारतो.


आपल्याकडे असलेले पद, पैसा आणि प्रतिष्ठा यांचा वापर लोकांच्या मदतीसाठी न करता त्रास देण्यासाठी करतो तेव्हा भारत हारतो.


आपापसातील किरकोळ गोष्टी व वाद विवादावर समझोता न करता पोलीस स्टेशन आणि कोर्ट गाठतो तेव्हा भारत हारतो.


मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी आदर्श नागरिक घडवण्यासाठी प्रयत्न न करता व विचारांना गौण समजून फक्त पद, पैसा आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी शिक्षण देतो तेव्हा भारत हारतो.


जगातून, समाजातुन फक्त घेतो आणि घेतो परंतु आणि सामाजिक जबाबदारी म्हणून काहीच परत देत नाही तेव्हा भारत हारतो.


कामाच्या वेळी मागे आणि श्रेय घेण्यासाठी पुढे पुढे करतो तेव्हा भारत हारतो.


देवाधर्मावर अनाठायी टिका करतो, आपल्या अर्धवट विचारांचे ओंगळवाणे प्रदर्शन करून जातीवाद करतो तेव्हा भारत हारतो.


वेळेवर नगरपालिका कर, घरपट्टी, शेतसारा, आयकर आपण भरत नाही तेव्हा भारत हारतो.


आपली परीस्थिती चांगली असताना आपण सरकारी योजनांचा फायदा घेत असतो तेव्हा भारत हारतो.


आपल्या कुटुंबाच्या, गावाच्या नावाला डाग लागेल असे जेव्हा काम करतो तेव्हा भारत हारतो.


आपण जाणीवपूर्वक शक्य असताना मतदान करत नाही तेव्हा भारत हारतो.


आपण देश हित लक्षात न घेता पैसे घेऊन मतदान करतो तेव्हा भारत हारतो.


छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचा आदर्श न घेता त्यांच्या विचारांची अवहेलना करतो तेव्हा भारत हारतो. 


यातील ज्या गोष्टी करायला नकोत तरी आपण करत असलो आणि ज्या गोष्टी करायला हव्यात परंतु करत नसलो तर भारत जिंकला म्हणून फटाके वाजवण्याला काय अर्थ राहिला? तो ही एक पोरकटपणा, उथळपणा करुन परत भारत हरवला.


यामध्ये भारताची हार तर आहेच तत्पुर्वी अयोग्य, असंस्कारी, अविचारी असा ठप्पा आपण स्वतः आपल्यावर मारून घेतो. यामध्ये प्रथम आपण स्वतः मारतो आणि काही कारण नसताना देशाची मान खाली घालायला लावतो.


अजून अशा बऱ्याच गोष्टी असतील आपल्या वागणुकीने आपण भारताला रोज पराजित करत असतो. त्या गोष्टी आपले वैयक्तिक अनुभव आहेत त्यांचे आत्मपरीक्षण करा आणि भारताचे प्रामाणिक नागरिक म्हणून भारताला हरवणे बंद करा. कारण ते आपल्याच हातात 🫵 आहे.


◆◆◆

कळू धरण प्रकल्पग्रस्तांना योग्य नुकसानभरपाई देणे तसेच पात्र प्रकल्पग्रस्तांना नोकरीच्या संधी उपलब्ध

 प्रकल्पग्रस्तांना योग्य नुकसानभरपाई देणे तसेच पात्र प्रकल्पग्रस्तांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक असून त्याबाबत प्राधान्याने विचार करण्यात येईलअसेही मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या जमीन मोजणीसारख्या महत्त्वाच्या प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

काळू धरण प्रकल्पाला गती देण्याचे मंत्री गिरीश महाजन निर्देश · प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढणार

 काळू धरण प्रकल्पाला गती देण्याचे मंत्री गिरीश महाजन निर्देश

·        प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढणार

 

मुंबईदि. १० : ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी काळू धरण प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त गावांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली. काळू धरण हा ठाणे जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून भविष्यातील वाढत्या पाणीटंचाईवर तो कायमस्वरूपी उपाय ठरणार आहे. त्यामुळे प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रक्रिया गतीने पूर्ण करून कामाला वेग देण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, जलसंपदा मंत्री महाजन यांनी यावेळी दिले.

या बैठकीस आमदार किसन कथोरेआमदार रवींद्र चव्हाणअपर मुख्य सचिव (प्रकल्प व विकास) दीपक कपूरतसेच ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ हे ऑनलाईन उपस्थित होते. या बैठकीत काळू धरण प्रकल्पासाठी झालेल्या ग्रामसभांचा आढावा घेण्यात आला. ११ गावांमध्ये प्रकल्पास विरोध नोंदविण्यात आला होतातर ७ गावांमध्ये ग्रामसभाच झाल्या नव्हत्या. या पार्श्वभूमीवर प्राधान्याने ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांचे मत जाणून घेण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.

२०१७ मध्ये या समस्येवर तोडगा म्हणून प्रत्येक घराला स्वतंत्र सौर ऊर्जा प्रणाली

 २०१७ मध्ये या समस्येवर तोडगा म्हणून प्रत्येक घराला स्वतंत्र सौर ऊर्जा प्रणाली देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २०१८ मध्ये सौभाग्य’ योजनेअंतर्गत अनेक घरांना ऑफ-ग्रीड सोलर प्रणाली देऊन गावांचे विद्युतीकरण करण्यात आले. मात्र दुर्गम भागामुळे वार्षिक देखभाल करार (एएमसीप्रभावीपणे राबविणे शक्य झाले नाही. त्यामुळे अनेक सौर यंत्रणा बंद पडल्या किंवा निकामी झाल्या आणि काही गावांमध्ये पुन्हा अंधाराचे वातावरण निर्माण झाले. ही परिस्थिती लक्षात घेऊन आता सोलर मायक्रो ग्रीडद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

या योजनेंतर्गत दोन गावांमध्ये सोलर मायक्रो ग्रीडचे काम पूर्ण झाले आहे. पाच गावांमध्ये स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या माध्यमातून काम सुरू आहे. चार गावांसाठी टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित गावांसाठी सुमारे २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

या परिसरातील रस्ते सुविधांबाबतही कारवाई सुरू करण्यात आली आहे. सहा गावांमध्ये रस्ते उपलब्ध असले तरी चार गावांमध्ये खडीकरण व दुरुस्तीची आवश्यकता असून ते काम प्राधान्याने हाती घेतले जाईलअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

00000

Tuesday, 10 March 2026

राज्यात कांदा उत्पादनाच्या व्यवस्थापन करण्यासाठी विविध प्रयत्न

 मंत्री. सावकारे म्हणालेराज्यात कांदा उत्पादनाच्या  व्यवस्थापन करण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. नाफेड व एनसीएफडीमार्फत सुमारे २.७७ लाख टन कांद्याची खरेदी करण्यात आली असून ४५० कोटींपैकी ४३० कोटी रुपयांचा परतावा शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. आखाती देशांमध्ये  कांदा निर्यातीला काही अडचणी असल्या तरी अन्य देशात निर्यात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

 

मंत्री संजय सावकारे म्हणाले,  देशातील ज्या राज्यांमध्ये कांद्याचे उत्पादन होत नाही अशा राज्यांमध्ये महाराष्ट्रातील कांदा विक्रीसाठी प्रयत्न सुरू आहेत. बाजार व्यवस्थापन आणि निर्यात वाढविण्याच्या उपाययोजनांमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळेलअसा विश्वासही मंत्री सावकारे यांनी यावेळी व्यक्त केला.

कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनाचे सर्वोतोपरी प्रयत्न

 कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनाचे सर्वोतोपरी प्रयत्न

-         वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे

 

मुंबईदि. १० :- राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे.  कांदा हे नाशवंत पीक असल्यामुळे हमी भाव योजनेत त्याचा समावेश नसला तरी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेत असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी विधान परिषदेत सांगितले.

 

सदस्य सदाभाऊ खोत यांनी याविषयी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सतेज पाटीलप्रवीण दरेकरअमोल मिटकरीहेमंत पाटीलराजेश राठोडशिवाजीराव गर्जे यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.

 

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा हीच शासनाची भूमिका असल्याचे सांगत मंत्री संजय सावकारे म्हणालेकांद्याला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल.

 

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा परिचय

 महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा परिचय

 

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा हे त्रिपुराच्या माणिक्य राजघराण्यातून आलेले एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. माणिक्य राजघराणे हे भारतातील सर्वात प्राचीन राजघराण्यांपैकी एक असून ते प्रगत विचारसरणीसाठी ओळखले जाते. या राजघराण्याने १९४१ मध्ये त्रिपुरासाठी पहिली लिखित राज्यघटना लागू केली होती. नागरिकांमध्ये स्वावलंबनसहकार्य आणि राज्यनिष्ठा यासारख्या मूल्यांना प्रोत्साहन देणे हे राज्यघटनेचे उद्देश होते. या राज्यघटनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अल्पसंख्याकमागासवर्गीय आणि कामगारांसाठी विधानसभेत जागांचे आरक्षण देण्यात आले होते. देशभरात आरक्षणाची संकल्पना रुजण्यापूर्वीच त्रिपुराच्या प्रगती आणि समृद्धीसाठी आधुनिक विचारांचा अवलंब करण्यात आला होता.

राजघराण्याची पार्श्वभूमी असूनही जिष्णु देव वर्मा अत्यंत विनम्रसहज उपलब्ध आणि सर्व स्तरांतील लोकांशी संवाद साधण्यास उत्सुक असलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी १९९३ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली आणि त्रिपुराचे राष्ट्रीय परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यांनी त्रिपुरा प्रदेश भाजपचे सरचिटणीस म्हणूनही कार्य केले आणि पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाची जबाबदारी सांभाळली.

२०१८ मध्ये त्यांनी १९ चारिलाम (अनुसूचित जमाती) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तब्बल  ८९.३३ टक्के मते मिळवत अभूतपूर्व विजय मिळवला.

२०१८ मध्ये त्रिपुरात२५ वर्षांच्या डाव्या आघाडीच्या कारकिर्दीनंतर भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आले आणि  जिष्णु देव वर्मा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. या काळात त्यांनी वित्तग्रामीण विकास आणि ऊर्जा यांसारख्या महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली.

आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध प्रकल्पांची अंमलबजावणीआर्थिक संसाधनांची उपलब्धता आणि ठरलेल्या वेळेत कामे पूर्ण करण्यावर विशेष भर दिला.

त्रिपुरामध्ये यशस्वीपणे राबविण्यात आलेला बायो व्हिलेज 2.0 हा त्यांचा एक अभिनव उपक्रम आहे. कृषीऊर्जा आणि उपजीविकेच्या क्षेत्रात पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करून ग्रामीण भागात शाश्वत विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.

समुदायाच्या सक्रिय सहभागावर आधारित या उपक्रमामुळे स्थानिक शेतकरी आणि कुटुंबांनी हरित तंत्रज्ञान व शाश्वत पद्धती स्वीकारल्या. त्यामुळे शाश्वत ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात त्रिपुराने अग्रस्थान मिळवले. पुढे या उपक्रमाला आंतरराष्ट्रीय स्तरावरही उत्कृष्ट उपक्रम म्हणून मान्यता मिळाली.

ईशान्य भारताच्या विकासासाठी धोरण निर्मितीमध्ये जिष्णु देव वर्मा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. १९८९ ते १९९३ या काळात ते नॉर्थ ईस्टर्न कौन्सिलच्या सल्लागार समितीचे प्रमुख सदस्य होते. त्यांनी इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेजच्या त्रिपुरा विभागाचे संयोजक म्हणून कार्य केले आणि ईशान्य भारतातील उपक्रमांचे समन्वयक म्हणून  केले.

अनेक कलागुणांनी संपन्न असलेले जिष्णु देव वर्मा यांना आधुनिक कलाचित्रकला आणि शिल्पकलेची विशेष आवड आहे. त्यांच्या सर्जनशील कलाकृतींमध्ये विविध कलागुणांची अभिव्यक्ती दिसून येते. संस्कार भारतीच्या सहकार्याने त्यांच्या अनेक कलाकृती विविध पर्यटनस्थळेमंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणी मांडण्यात आल्या आहेत.

ते एक प्रख्यात कवी आणि लेखकही आहेत. बंगाली आणि इंग्रजी भाषेतील त्यांच्या कवितांनी अनेकांच्या मनाला स्पर्श केला आहे. त्यांच्या Children of Water Goddess आणि Master of Time या पुस्तकांमधील साहित्यिक अभिव्यक्ती प्रभावी आणि भावस्पर्शी मानली जाते.

त्यांच्या मते जीवन हा एक गहन प्रवास आहेज्यात प्रत्येक क्षण हा एक पवित्र आहुती आहे आणि प्रत्येक आव्हान हे ज्ञान व धैर्य वाढविण्याची संधी आहे. त्यांच्या कवितेतील शब्दांत ते असे म्हणतात

Let us carry hope in our souls,

Not only for ourselves,

But for those too,

Who look upon us with hope.

 

आदिवासी विकासशिक्षणआरोग्य तसेच कला आणि संस्कृती यांप्रती त्यांची अत्यंत निष्ठा आणि बांधिलकी आहे.

३१ जुलै २०२४ रोजी जिष्णु देव वर्मा यांची  तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर १० मार्च २०२६ रोजी त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली.

आपल्या स्नेहपूर्ण स्वभावामुळे ते सर्व स्तरांतील लोकांशी सहजतेने संवाद साधतात आणि सामान्य नागरिकांसाठी नेहमी उपलब्ध असतात. 

समाजातील उपेक्षित व वंचित घटकांना आधार देऊन त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणे यातच जीवनाचे सार्थक आहे असे ते मानतात. 

००००

Featured post

Lakshvedhi