कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनाचे सर्वोतोपरी प्रयत्न
- वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे
मुंबई, दि. १० :- राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे. कांदा हे नाशवंत पीक असल्यामुळे हमी भाव योजनेत त्याचा समावेश नसला तरी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेत असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य सदाभाऊ खोत यांनी याविषयी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य सतेज पाटील, प्रवीण दरेकर, अमोल मिटकरी, हेमंत पाटील, राजेश राठोड, शिवाजीराव गर्जे यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा हीच शासनाची भूमिका असल्याचे सांगत मंत्री संजय सावकारे म्हणाले, कांद्याला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल.
No comments:
Post a Comment