Tuesday, 10 March 2026

जिष्णू देव वर्मा ने महाराष्ट्र के राज्यपाल पद की शपथ ली

 जिष्णू देव वर्मा ने महाराष्ट्र के राज्यपाल पद की शपथ ली

 

मुंबई, 10 मार्च: महाराष्ट्र के नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा ने राज्यपाल पद की शपथ ली। मुंबई उच्च्‍ा न्यायालय के मुख्य न्यायमूर्ति चंद्रशेखर ने राजभवन के दरबार हॉल में आयोजित शपथग्रहण समारोह में उन्हें पद और गोपनीयता की शपथ दिलाई।

शपथ ग्रहण के बाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ने राज्यपाल जिष्णू देव वर्मा को पुष्पगुच्छ देकर उनका अभिनंदन किया। जिष्णू देव वर्मा महाराष्ट्र के 22वें राज्यपाल बने हैं।

कार्यक्रम की शुरुआत में राज्य के मुख्य सचिव राजेश अग्रवाल ने भारत की राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू द्वारा जारी जिष्णू देव वर्मा की नियुक्ति संबंधी अधिसूचना पढ़कर सुनाई।

समारोह की शुरुआत राष्ट्रगान और राज्यगीत से हुई तथा समापन राष्ट्रगान के साथ हुआ। शपथ ग्रहण के बाद राज्यपाल को इंडियन नेव्ही की ओर से मानवंदना दी गई।

इस अवसर पर विधान परिषद के सभापति प्रा.राम शिंदेविधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकरविधान परिषद की उपसभापति डॉ.नीलम गोऱ्हेपूर्व मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदेउच्च व तंत्र शिक्षा मंत्री चंद्रकांत पाटीलकौशल विकास मंत्री मंगल प्रभात लोढाखाद्य व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळखाद्य व नागरी आपूर्ति मंत्री छगन भुजबळबृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भुषण गगराणीपुलिस महानिदेशक सदानंद दातेमुंबई पुलिस आयुक्त देवेन भारतीमुख्य राज्य शिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे सहित अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।


Jishnu Dev Varma Takes Oath as Governor of Maharashtra

 Jishnu Dev Varma Takes Oath as Governor of Maharashtra

 

Mumbai, March 10: Newly appointed Governor of Maharashtra Jishnu Dev Varma took the oath of office today. The oath was administered by Chandrashekhar, Chief Justice of the Bombay High Court, at a ceremony held in the Durbar Hall of Raj Bhavan.

 

Following the oath ceremony, Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Eknath Shinde, and Deputy Chief Minister Sunetra Ajit Pawar congratulated Governor Jishnu Dev Varma by presenting him with bouquets. With this, Jishnu Dev Varma has become the 22nd Governor of Maharashtra.

 

Earlier, Chief Secretary Rajesh Agarwal read out the official notification issued by the President of India Droupadi Murmu regarding the appointment of Jishnu Dev Varma as the Governor.

 

The ceremony began with the National Anthem and the State Song, while it concluded with the National Anthem. After the oath-taking ceremony, the Governor was accorded a ceremonial guard of honour by the Indian Navy.

 

Among those present at the ceremony were Legislative Council Chairman Ram Shinde, Legislative Assembly Speaker Rahul Narwekar, Legislative Council Deputy Chairperson Neelam Gorhe, former Chief Minister Sushilkumar Shinde, Higher and Technical Education Minister Chandrakant Patil, Skill Development Minister Mangal Prabhat Lodha, Food and Drugs Administration Minister Narahari Zirwal, Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal, Bhushan Gagrani, Director General of Police Sadanand Date, Mumbai Police Commissioner Deven Bharti, Chief State Protocol Officer Rajesh Gavande, and other senior officials.

जिष्णू देव वर्मा यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ

 जिष्णू देव वर्मा यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ

 

मुंबईदि. १०: महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. लोकभवनातील दरबार सभागृह येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली.

 

शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. जिष्णू देव वर्मा  हे महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल आहेत.

 

सुरुवातीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी जिष्णू देव वर्मा यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेली अधिसूचना वाचून दाखवली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर सांगता राष्ट्रगीताने झाली. शपथविधी नंतर राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली.

 

शपथविधी सोहळ्याला विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदेविधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरविधान परिषद उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हेमाजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेउच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलकौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढाअन्न व औषध प्रशासन नरहरी झिरवळअन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळबृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणीपोलीस महासंचालक सदानंद दातेपोलीस आयुक्त देवेन भारतीमुख्य राज्य शिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे व  इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अलाईनमेंट बदलण्याबाबत काही भागांत संरक्षण खात्याची

 अलाईनमेंट बदलण्याबाबत काही भागांत संरक्षण खात्याची जमीन असल्याने त्या मार्गाने रिंग रोड नेणे शक्य नसल्याचे आढळले आहे. मात्र लोकांच्या सोयीसाठी यापूर्वी दोन ठिकाणी अलाईनमेंटमध्ये बदल करण्यात आले असून शक्य तेथे सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसेच डीपी रोड संदर्भात नगरविकास विभाग आणि नाशिक महानगरपालिकेशी आवश्यक समन्वय साधण्यात येईलअसेही मंत्री भोसले यांनी स्पष्ट केले.

00000

भूसंपादनाच्या प्रक्रियेत जमिनींचे मूल्यांकन रेडी रेकनर द

 मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितलेभूसंपादनाच्या प्रक्रियेत जमिनींचे मूल्यांकन रेडी रेकनर दरानुसार तसेच जमिनीची प्रतवारीजिरायती-बागायती स्वरूप आदी बाबी विचारात घेऊन करण्यात येत असल्याने गावनिहाय दरांमध्ये फरक दिसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्रप्रकल्पामुळे कोणावरही अन्याय होऊ नये आणि ज्यांच्या जमिनी किंवा घरे बाधित होत आहेत त्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे रिंग रोडप्रमाणे विशेष पॅकेज देण्याबाबतही शासन सकारात्मक असून आवश्यक असल्यास हा विषय महसूल विभाग आणि मुख्यमंत्री यांच्यासमोर मांडला जाईलअसेही मंत्री भोसले यांनी यावेळी सांगितले

देवळाली रिंग रोडसाठी भूसंपादन; शेतकऱ्यांना योग्य मोबदल्याबाबत शासनाचा सहानुभूतीपूर्वक विचार

 देवळाली रिंग रोडसाठी भूसंपादन;

शेतकऱ्यांना योग्य मोबदल्याबाबत शासनाचा सहानुभूतीपूर्वक विचार

- मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

 

मुंबई दि. १०: नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तसेच शहरातील वाहतूक कोंडी कमी करून आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदारसंघातून प्रस्तावित रिंग रोड अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रस्तावित रिंग रोड प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू असून जमिनी बाधित होणाऱ्या  शेतकऱ्यांच्या मोबदल्याबाबत शासन सहानुभूतीपूर्वक विचार करणार आहेअसे सार्वजनिक बांधकाम (सर्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदारसंघातून प्रस्तावित रिंग रोड प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू असून जमिनी बाधित होणार असल्याने शेतकऱ्यांचा विरोध असल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. पुणे रिंग रोडप्रमाणे विशेष मोबदलापुनर्वसन योजना आणि अलाईनमेंट बदलण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत असल्याबाबत सदस्य सरोज अहिरे यांनी लक्षवेधी सूचना मांडली. या चर्चेत सदस्य सीमा हिरे यांनीही सहभाग घेतला.

या लक्षवेधीला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले कीप्रस्तावित रिंग रोडचे एकूण अंतर सुमारे ६५.६० किलोमीटर असून त्यापैकी १६ किलोमीटरचा मार्ग नाशिक महानगरपालिकेच्या डीपी रोडवरून नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या  रिंग रोडच्या मार्गाच्या आखणीस व त्यासाठीच्या बांधकामासाठी सुमारे ३,६५९ कोटी रुपये रकमेस मान्यता देण्यात आली आहे.

अचलपूरमध्ये अमृत योजनेअंतर्गत क्रॉस लाईन कनेक्शनचे काम सुरू

 अचलपूरमध्ये अमृत योजनेअंतर्गत क्रॉस लाईन कनेक्शनचे काम सुरू

- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

मुंबई : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपालिका क्षेत्रात अमृत योजनेंतर्गत राबविण्यात आलेल्या पाणीपुरवठा प्रकल्पाची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत तपासणी करण्यात आली असून प्रकल्पात कोणतीही अनियमितता आढळलेली नाही. मात्र काही भागात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आवश्यक असलेली क्रॉस लाईन कनेक्शनची कामे नगरपरिषदेकडून सुरू आहेतअशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपालिका क्षेत्रात २०१८-२०१९ मध्ये अमृत योजनेंतर्गत सुमारे २२ कोटी रुपये खर्च करूनही नागरिकांना नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचा मुद्दा सदस्य प्रविण तायडे यांनी विधानसभेत उपस्थित केला होता.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले कीअचलपूर नगरपालिका क्षेत्रात २०१८-२०१९ मध्ये अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा प्रकल्प राबविण्यात आला असून तो २०१९ मध्ये पूर्ण झाला आहे. त्यावेळी झालेल्या सर्वेक्षणात काही ठिकाणी क्रॉस लाईन कनेक्शन राहिले होते. त्यामुळे नगरपरिषद स्वतःच्या खर्चातून ही कामे करत आहे.

आतापर्यंत सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले असून ४७ ठिकाणी क्रॉस लाईन कनेक्शन देण्यात आले आहे. त्यामुळे अनेक भागांतील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. उर्वरित कामही नगरपरिषदेमार्फत सुरू असून संपूर्ण योजनेचे हायड्रॉलिक टेस्टिंग करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर उर्वरित भागातही पाणीपुरवठा सुरळीत होईलअसेही राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi