Sunday, 8 March 2026

फिनलंड देशातील कंपन्यांसोबत सामंजस्य करार

 फिनलंड देशातील कंपन्यांसोबत सामंजस्य करार


ससून मासेमारी बंदराला जगातील सर्वोत्तम बनविणार

-मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे


L

मुंबई, दि. 7: मुंबईस्थित ससून मासेमारी बंदर हे मोठ्या मासेमारी बंदरांपैकी एक आहे. ससून मासेमारी बंदराचा विकास हा राज्य शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. ससून मासेमारी बंदराला जगातील


 सर्वोत्तम बनविण्यासाठी फिनलंड देशाच्या कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे, असे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.


हॉटेल ताज पॅलेस येथे फिनलंड देशातील हेल्वर, मिरासिस आणि रिव्हर रीसायकल कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव एन रामास्वामी, मत्स्य व्यवसाय आयुक्त विजय सूर्यवंशी, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपाले, फिनलंडचे कॉन्सिलेट जनरल एरिक अफ हॅलोस्ट्रॉम, सहाय्यक सजू नायर, फिनलंडच्या परराष्ट्र मंत्रालयाचे राज्य सचिव जुका सोलोवारा आदी उपस्थित होते. 



एक्सएसआयओ बुद्धीमत्ता एकीकृत प्रगत औद्योगिक व निर्मिती पार्क विषयी

 एक्सएसआयओ बुद्धीमत्ता एकीकृत प्रगत औद्योगिक व निर्मिती पार्क विषयी

           महाराष्ट्रातील औद्योगिक पायाभूत सुविधांच्यादृष्टीने महत्वाचा असलेल्या या पार्कच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होणार आहे. ब्लॅकस्टोन समर्थित हे पार्क ७०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीतून साकारले जात आहे. तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे राज्यातील पहिलेच 'इंटेलिजन्स-इंटिग्रेटेडऔद्योगिक संकुल आहे.

          या प्रकल्पामुळे नागपूर आणि परिसरात सुमारे २,५०० प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. हे औद्योगिक संकुल केवळ कारखाना नसून 'स्मार्ट कॅम्पसअसेल. यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित इमारत व्यवस्थापन यंत्रणा आणि 'डिजिटल ट्विनतंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहेज्यामुळे ऊर्जेची बचत आणि कामाचा दर्जा सुधारण्यास मदत होते.

          एक्सएसआयओ मार्फत महाराष्ट्रात एकूण ८,१४२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात असून त्याद्वारे राज्यात ३५,००० हून अधिक रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.

0000

आर्थिक स्थितीत महाराष्ट्र हे जगात ३० व्या क्रमांकावर आहे. येत्या काळात देशातील पहिली

  राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना  महाराष्ट्राची आर्थिक प्रगती राज्यासमोर मांडली. आर्थिक स्थितीत महाराष्ट्र हे जगात ३० व्या क्रमांकावर आहे. येत्या काळात देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने महाराष्ट्र प्रयत्नरत आहे. त्यासाठी शासनाने रोडमॅप तयार केला आहे, यास प्रत्यक्षात आणण्यात या लॉजिस्टिक पार्कची महत्वाची भूमिका आहे. नागपूरला उद्योगाचे आकर्षण बनविताना एक्सएसआयओने गतीने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

           एक्सएसआयओ ने पुढील पिढीसाठी विकसित करण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाबाबत देशात अन्य ठिकाणी लॉजिस्टिक पार्क उभारताना नागपुरलाही प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्‍त  केली.   'एक्सएसआयओ इंडस्ट्रीयल ॲण्ड लॉजिस्टिक पार्क'चे व्यवस्थापकीय संचालक आशिष अग्रवाल यांचे स्वागतपर भाषण झाले.

          तत्पूर्वीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सएसआयओ एडवांस्ड इंडस्ट्रियल पार्कपरिसरात विश्राम गृहाचे उदघाटन व वृक्षारोपण केले.

भारतासारख्या लोकशाही देशाला जागतिक पुरवठा साखळीमध्ये सशक्तपणे उभे

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेभारतासारख्या लोकशाही देशाला जागतिक पुरवठा साखळीमध्ये सशक्तपणे उभे करण्यासाठी निर्मिती क्षेत्र अधिक बळकट करणे गरजेचे आहे. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत  देशाला विकसित करण्याचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण होऊ शकेल. महाराष्ट्र शासनानेही या दिशेने पुढे जाण्यासाठी उद्योगस्नेही धोरण आणले आहे. त्यामुळे राज्यात निर्मिती क्षेत्र नवे वळण घेत असून सकारात्मक बदल घडताना दिसत आहेत. निर्मिती क्षेत्राला ऑटोमेशनएआय व अन्य तंत्रज्ञानाद्वारे गती मिळत आहे. 

          ग्लोबल कॅपिबिलिटी सेंटरमध्ये देशाला, महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी व तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेचे ध्येय गाठण्यासाठी एक्सएसआयओ सारख्या उद्योग समूहाची भूमिका महत्वाची ठरते, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रातील पहिल्या एक्सएसआयओ बुद्धीमत्ता एकीकृत प्रगत औद्योगिक व निर्मिती पार्कचे भूमिपूजन

 उद्योगाचे मॅग्नेट म्हणून नागपूरच्या विकासात  

एक्सएसआयओने महत्वाची भूमिका वठवावी

-      

 

महाराष्ट्रातील पहिल्या एक्सएसआयओ बुद्धीमत्ता एकीकृत

प्रगत औद्योगिक व निर्मिती पार्कचे भूमिपूजन

 

२५०० लोकांना मिळणार रोजगार प्रकल्पामुळे राज्यातील उद्योगाला मिळणार नवी दिशा

 

नागपूरदि.७: राज्यशासनाच्या उद्योग पूरक धोरणामुळे निर्मिती क्षेत्र सकारात्मक दिशेने वळण घेत आहे. उद्योगाला चालना देत विदर्भाच्या विकासासाठी नागपूरला उद्योगाचे मॅग्नेट बनविण्याच्या दिशेने पाऊल टाकले असून त्यात एक्सएसआयओ कंपनीने महत्वाची भूमिका वठवावी असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

          नागपूर-अमरावती महामार्गावर स्थित लिंगा परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते महाराष्ट्रातील पहिल्या एक्सएसआयओ बुद्धीमत्ता एकीकृत प्रगत औद्योगिक व निर्मिती पार्कचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेवित्त व नियोजन राज्यमंत्री  ॲड. आशिष जयस्वालआमदार सर्वश्री  डॉ. आशिष देशमुख, चरणसिंह ठाकूरजिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकरएक्सएसआयओ इंडस्ट्रीयल ॲण्ड लॉजिस्टिक पार्कचे व्यवस्थापकीय संचालक आशिष अग्रवाल आदी उपस्थित होते.

रोबोटिक्स अँड युएव्ही फॅसिलिटीविषयी...

 रोबोटिक्स अँड युएव्ही फॅसिलिटीविषयी...

सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडकडून उभारल्या जाणाऱ्या या युनिटमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित मध्यम उंचीवर आणि लांब पल्ल्याचे उड्डाण करणारे ड्रोनरोबोटयुएव्ही आणि विविध संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह पूर्णपणे स्वदेशी उत्पादनावर भर देणार आहेज्यामुळे मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भर भारत’ अभियानाला बळकटी मिळणार आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतीलअसा अंदाज आहे. या प्रकल्पामुळे नागपूरची 'डिफेंस हबम्हणून ओळख आणखी घट्ट होणार आहे.

सोलर इंडस्ट्रीचे योगदान अभिमानास्पद - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 सोलर इंडस्ट्रीचे योगदान अभिमानास्पद - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

जागतिक स्तरावर संरक्षण सिद्धतेच्या क्षेत्रात होत असलेल्या परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर देश आपली  संरक्षणसिद्धता वाढवित आहे आणि विश्वशांतीसाठी ते अत्यंत आवश्यक आहेअसे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. रोबोटीक इंजिन आणि ड्रोनच्या क्षेत्रात मोठी प्रगती होत असून सध्या जगभरात सुरु असलेल्या संघर्षातून त्याची प्रचीती येत आहे. सोलरचा हा प्रकल्प देखील भविष्यातील तंत्रज्ञानाशी जुळलेला आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खासगी क्षेत्राची क्षमता लक्षात घेता सरकार या क्षेत्राला प्रोत्साहन देत आहेयाकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लक्ष वेधले.

या कार्यक्रमात रोबोटिक्स अँड युएव्ही फॅसिलिटी निर्मिती विषयीची माहिती देणारी ध्वनीचित्रफीत प्रदर्शित करण्यात आली. सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांनी यावेळी बोलताना समूहाच्या आजवरच्या वाटचालीची तसेच भविष्यातील ध्येयधोरणांविषयीची भूमिका मांडली. राघव नुवाल यांनी आभार मानले. या कार्यक्रमास संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञउद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Featured post

Lakshvedhi