Thursday, 5 March 2026

सुप्रसिध्द संगीतकार सी रामचंद्र यांना सांस्कृतिक कार्य विभागाचा मानाचा मुजरा

 सुप्रसिध्द संगीतकार सी रामचंद्र यांना सांस्कृतिक कार्य विभागाचा मानाचा मुजरा

सुप्रसिध्द संगीतकार सी रामचंद्र यांच्या अविस्मरणीय गाण्यांची सुरेलसुमधुर मैफल

 ये जिंदगी उसी की है या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

 

मुंबईदि. 5: महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने सुप्रसिध्द संगीतकार सी रामचंद्र यांच्या अविस्मरणीय गाण्यांची सुरेलसुमधुर मैफल ये जिंदगी उसी की है या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार6 मार्च2026 रोजीरात्री 8:30 वाजता मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहृ विलेपार्ले येथे करण्यात आले आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात संगीतकार सी रामचंद्र यांच्या अविस्मरणीय गाण्यांचा समावेश आहे. यामध्ये गायक म्हणून प्राजक्ता सातर्डेकरजय आजगावकरसौम्या वर्मासुधाकर शानभाग आहेत. कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रशांत लळित यांचे असून निवेदक म्हणून मंदार खराडे काम पाहत आहेत. हा कार्यक्रम रसिकांसाठी पूर्णपणे विनामूल्य असून विलेपार्ले परिसरातील रसिक प्रेक्षकांनी या सांस्कृतिक सुमधुर मैफलीचा लाभ घ्यावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

रुग्णालयातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी, औषध खरेदीसाठी आणि डॉक्टरांच्या प्रशिक्षणासाठी खर्च

 महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा समन्वयकांनी (District Coordinators) अधिक सक्रिय होऊन काम करावे. स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदारखासदार तसेच जिल्हा शल्य चिकित्सकजिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी सतत संपर्कात राहून योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी क्षेत्रीय भेटी देऊन योग्य सनियंत्रण करावे. रुग्णालयांना मिळणाऱ्या कॉर्पस फंडचा विनियोग रुग्णालयातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठीऔषध खरेदीसाठी आणि डॉक्टरांच्या प्रशिक्षणासाठी खर्च कराव्यात. त्यासाठी एक समिती स्थापन करूनएसओपी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शासकीय रुग्णालयांनी स्वतःच्या पायावर उभे राहून दर्जेदार आरोग्य सेवा देणे अपेक्षित असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व्यापक प्रसिद्धी करावी योजनेच्या माहिती देणाऱ्या टोल फ्री नंबर सर्वत्र प्रदर्शित करावेत, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

बैठकीस महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अण्णासाहेब चव्हाण, आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकरसंचालक पुणे डॉ. विजय कंदेवाड यांचेसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

न्यूरो, कॅन्सर आणि ऑर्थो (अस्थिरोग) यासारख्या गंभीर

 न्यूरोकॅन्सर आणि ऑर्थो (अस्थिरोग) यासारख्या गंभीर आजारांच्या उपचारांसाठी वाढीव पॅकेज देणे बाबत तसेच, PET-Scan सारख्या अत्याधुनिक सुविधांसाठी सामंजस्य करार (MoU) करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहे.

फुले जनआरोग्य योजना मिशन मोडवर कार्यान्वित करावी

 राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना मिशन मोडवर कार्यान्वित करावी

आरोग्य योजनांच्या निधीच्या माध्यमातून सरकारी रुग्णालयांचे सक्षमीकरण व्हावे

- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबई, दि. 5 : राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रेउपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालयांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेले उपचार मिशन मोडवर सुरू करावेत, अशा सूचना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. 

मुंबईतील "सुरुची" शासकीय निवासस्थानात महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे अधिकारी व आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी आरोग्य मंत्री म्हणाले सरकारी दवाखान्याच्या माध्यमातून जनआरोग्य योजना राबवल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे शासनाचे पैसे सरकारी रुग्णालयाला मिळतील. या निधीच्या माध्यमातून सरकारी रुग्णालयाचे सक्षमीकरण होण्याबरोबरच डॉक्टरांनाही अधिक चांगला प्रोत्साहन भत्ता मिळेल. यापूर्वी जनआरोग्य योजनेशी संलग्नित झालेल्या रुग्णालयांचा गेल्या सहा महिन्यातील प्रगतीचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

न्यूरोकॅन्सर आणि ऑर्थो (अस्थिरोग) यासारख्या गंभीर आजारांच्या उपचारांसाठी वाढीव पॅकेज देणे बाबत तसेच, PET-Scan सारख्या अत्याधुनिक सुविधांसाठी सामंजस्य करार (MoU) करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहे.

टोयाटोसोबत टीएनएस इंडियाचे सहकार्य

 टोयाटोसोबत टीएनएस इंडियाचे सहकार्य

टीएनएस इंडिया कंपनीच्या सहकार्याने इलेक्ट्रिक व्हेईकल आणि सोलर टेक्निशियन कार्यशाळेचे उद्घाटन झाले. टीएनएस इंडिया फाऊंडेशनतर्फे आयटीआयमध्ये ईव्ही आणि सौर उर्जा क्षेत्रातील अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कॅम्पस इंडस्ट्रीयल करिअर्स कार्यक्रमांतर्गत सॉफ्ट स्किल्समध्ये उद्योगातील अपेक्षानोकरी मिळवण्यासाठी आवश्यक कौशल्येग्रीन स्किल्समध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) आणि सौर ऊर्जा तंत्रज्ञानातील विशेष प्रशिक्षण आणि तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

0000

शासकीय आणि सार्वजनिक भागीदारीतून 2030 पर्यंत टप्प्याटप्प्याने आयटीआयचे आधुनिकीकरण

 शासकीय आणि सार्वजनिक भागीदारीतून 2030 पर्यंत टप्प्याटप्प्याने आयटीआयचे आधुनिकीकरण

छत्रपती संभाजीनगर हा केवळ पहिला टप्पा असून शासकीय आणि सार्वजनिक भागीदारीतून दुसऱ्या टप्प्यात (२०२६-२८) अमरावतीनागपूर आणि नाशिक येथे १८ तर पुढच्या टप्प्यात (२०२९-३०) मुंबई आणि पुण्यात १४ अशा ३२ आयटीआयमध्ये जागतिक रोजगाराच्या संधीचे उद्दिष्ठ ठेवले आहे.पहिल्या टप्प्यात १५ हजार विद्यार्थ्यांना आवश्यक कामाचे प्रशिक्षण देवून रोजगारक्षम करण्यात येणार आहे. राज्यातील औद्योगिक विकासासाठी हा अतिशय महत्वाचा टप्पा असून पुढील काळात विविध कंपन्यांसोबत करार करण्यात येत आहेत. यापुढच्या काळात महाराष्ट्रात कानाकोपऱ्यातील तरुणांना आवश्यक कौशल्य प्रशिक्षणाचे बळ मिळून जागतिक स्तरावर औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्राची विजयी पताका फडकणार असल्याचे मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

राज्यातील आयटीआय संस्थांचे आधुनिकीकरण करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना

 मंत्री श्री. लोढा म्हणालेराज्यातील आयटीआय संस्थांचे आधुनिकीकरण करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देवून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे. आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी हे महत्वाचे पाऊल असून हा सीएसआर निधीचा आगळावेगळा कार्यक्रम आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासात कौशल्य विकासाचे अनन्यसाधारण महत्व अधोरेखित केले असून त्यानुसार देशभरात आधुनिकीकरण केले जात आहे. राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षणात नाविन्य आणले जात आहे. यातून सर्व आयटीआयमधील विद्यार्थ्यांची कार्यक्षमता जनतेसमोर आणणार आहे. या उपक्रमामध्ये औद्योगिक व्यवस्थापनआधुनिक कौशल्य आणि औद्योगिक सुरक्षा समाविष्ट करण्यात आली आहे. उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ तयार करणेकार्यशाळा व उपकरणांचे आधुनिकीकरणसंबंधित कंपन्यांची औद्योगिक कार्य संस्कृतीकौशल्य ज्ञानऔद्योगिक संस्कारशरीर व मन यांची क्रयशक्ती यांचा सर्वागीण विकास या प्रयोगशाळांच्या माध्यमाने साधले जाणार आहे.

Featured post

Lakshvedhi