Thursday, 5 March 2026

फुले जनआरोग्य योजना मिशन मोडवर कार्यान्वित करावी

 राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना मिशन मोडवर कार्यान्वित करावी

आरोग्य योजनांच्या निधीच्या माध्यमातून सरकारी रुग्णालयांचे सक्षमीकरण व्हावे

- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबई, दि. 5 : राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रेउपजिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालयांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेले उपचार मिशन मोडवर सुरू करावेत, अशा सूचना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. 

मुंबईतील "सुरुची" शासकीय निवासस्थानात महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे अधिकारी व आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी आरोग्य मंत्री म्हणाले सरकारी दवाखान्याच्या माध्यमातून जनआरोग्य योजना राबवल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे शासनाचे पैसे सरकारी रुग्णालयाला मिळतील. या निधीच्या माध्यमातून सरकारी रुग्णालयाचे सक्षमीकरण होण्याबरोबरच डॉक्टरांनाही अधिक चांगला प्रोत्साहन भत्ता मिळेल. यापूर्वी जनआरोग्य योजनेशी संलग्नित झालेल्या रुग्णालयांचा गेल्या सहा महिन्यातील प्रगतीचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

न्यूरोकॅन्सर आणि ऑर्थो (अस्थिरोग) यासारख्या गंभीर आजारांच्या उपचारांसाठी वाढीव पॅकेज देणे बाबत तसेच, PET-Scan सारख्या अत्याधुनिक सुविधांसाठी सामंजस्य करार (MoU) करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi