Friday, 6 March 2026

दिघी बंदराचे आतापर्यंतचे काम अत्यंत शिस्तबद्ध आणि पूर्वनियोजित आराखड्यानुसार सुरू

  दिघी बंदराचे आतापर्यंतचे काम अत्यंत शिस्तबद्ध आणि पूर्वनियोजित आराखड्यानुसार सुरू असल्याचे मंत्री राणे यांनी नमूद केले. राज्यातील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी आगामी काळात जलवाहतूक हा उत्तम पर्याय ठरणार आहे. यावर सरकार विशेष भर देत तसेच दिघी बंदर हे केवळ मालाची ने-आण करण्याचे केंद्र न राहताते जागतिक स्तरावरील एक लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करण्याचा सरकारचा मानस असल्याचे बंदरे मंत्री राणे यांनी सांगितले.

 

राज्याच्या किनारपट्टीचा वापर करून दळणवळण अधिक वेगवान करण्यासाठी जलवाहतूक व्यवस्था सुधारण्यावर प्राधान्य दिले जाईल. यामुळे इंधनाची बचत होण्यासोबतच पर्यावरणाचे रक्षण होण्यासही मदत होईल. या विकास प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्यातील स्थानिक रोजगार वाढण्यास आणि राज्याच्या महसुलात भर पडण्यास मोठी मदत होणार असल्याचे बंदरे मंत्री राणे यांनी सांगितले.

जलवाहतूक क्षेत्रात जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करणार

 जलवाहतूक क्षेत्रात जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करणार

- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

-         दिघी बंदर विकासाचे सादरीकरण

 

मुंबईदि.५ : रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराचा कायापालट करून तेथे जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यावर राज्य सरकारचा भर असल्याचे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले.

मंत्रालयात आयोजित बैठकीत अदानी पोर्ट्सकडून दिघी बंदराच्या विकास आराखड्याबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते.

बैठकीत बंदराच्या प्रगतीचा आणि सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

राज्यातील विद्यापीठांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रमवारीत (रँकिंग) वाढविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभा

 मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले कीराज्यातील विद्यापीठांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रमवारीत (रँकिंग) वाढविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. विद्यापीठांनी कालबद्ध नियोजन करून शैक्षणिक गुणवत्तासंशोधनवृद्धीअध्यापनातील नावीन्य आणि प्रशासकीय कार्यक्षमता यांना प्राधान्य द्यावे. गुणवत्ता वृद्धीसाठी ठोस कृती आराखडा तयार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावीअशा सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीत प्राध्यापक भरती प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांमधील रिक्त पदांची माहिती संकलित करून नियमानुसार भरती प्रक्रिया राबवावीअसे निर्देश देण्यात आले. सर्व संबंधित संस्थांनी प्राध्यापक भरती प्रक्रिया जून २०२६ पर्यंत पूर्ण करावीअसेही स्पष्ट करण्यात आले.

निर्धारित मुदतीपर्यंत प्राध्यापक भरती प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित विद्यापीठे व महाविद्यालयांतील पदसंख्या कमी करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईलअसा इशाराही मंत्री पाटील यांनी दिला.

विद्यार्थी हितासाठी प्राध्यापक भरती प्रक्रियेचे कालबद्ध नियोजन करा

 विद्यार्थी हितासाठी प्राध्यापक भरती प्रक्रियेचे कालबद्ध नियोजन करा

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबईदि. ५ : राज्यातील विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांमधील प्राध्यापक पदांच्या भरतीला शासनाने मान्यता दिली असून ही भरती प्रक्रिया कालबद्ध नियोजन करून पूर्ण करावीअसे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

होमी भाभा राज्य विद्यापीठ येथे मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरू व प्र-कुलगुरूंची राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (एनईपी २०२०अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डीउच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकरतंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकरमहाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईकउच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडेउपसचिव प्रताप लुबाळसहसचिव संतोष खोरगडे तसेच अकृषी विद्यापीठांचे सर्व कुलगुरूप्र-कुलगुरू व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अहिल्यानगर जिल्ह्यातील रस्तेकामांना गती द्यावी

 अहिल्यानगर जिल्ह्यातील रस्तेकामांना गती द्यावी

- सभापती प्रा. राम शिंदे

• १५ दिवसांत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश

मुंबईदि.५ : ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ व्हावे आणि नागरिकांना दर्जेदार रस्ते सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रलंबित रस्ते कामांना गती देण्यात यावी. या अनुषंगाने कर्जत-जामखेडजि. अहिल्यानगर परिसरातील विविध रस्ते कामांचा पुढील १५ दिवसांत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश  विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड तालुका व परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागराष्ट्रीय महामार्ग विभागप्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि वन विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्ते कामांबाबत आज विधान भवन,  येथे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.

बैठकीत काष्टीश्रीगोंदादेऊळगावमांडवगणडिकसळम्हाळसुंदानिंबेआळसुनानिंबेआंबेजळगाव तसेच कोंभळी फाटा ते कोंभळी या प्रमुख मार्गांसह सर्व प्रलंबित रस्त्यांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकासकामांना गती द्यावी असे निर्देश सभापती प्रा.शिंदे यांनी दिले.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी जनजागृती उपक्र म महत्त्वाचे -

 महिलांच्या सक्षमीकरणासाठी जनजागृती उपक्रम महत्त्वाचे - नंदिनी आवडे

 महिलांच्या तक्रारींची संख्या वाढत असताना त्यांच्या समस्यांवर केवळ कायदेशीर मार्ग पुरेसा नसून महिलांमध्ये आत्मविश्वास व सक्षमीकरणाची भावना निर्माण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी केले.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमांमधून महिलांच्या संघर्ष आणि प्रेरणादायी बाबी समाजासमोर मांडल्या जात असून या माध्यमातून महिलांमध्ये सजगता आणि आत्मविश्वास वाढेलअसा विश्वास आवडे यांनी व्यक्त केला.

पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात महिला कला महोत्सव २०२६ कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. ७ मार्च २०२६ पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे त्यांनी आवाहन केले.

महिलांचे हक्क, समानता आणि सबलीकरण या आंतरराष्ट्रीय

 महिलांचे हक्कसमानता आणि सबलीकरण या आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२६ च्या संकल्पनेचा उल्लेख करताना मंत्री ॲड.शेलार म्हणाले कीमहिलांच्या सक्षमीकरणासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे आवश्यक आहे.

Featured post

Lakshvedhi