अहिल्यानगर जिल्ह्यातील रस्तेकामांना गती द्यावी
- सभापती प्रा. राम शिंदे
• १५ दिवसांत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश
मुंबई, दि.५ : ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ व्हावे आणि नागरिकांना दर्जेदार रस्ते सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रलंबित रस्ते कामांना गती देण्यात यावी. या अनुषंगाने कर्जत-जामखेड, जि. अहिल्यानगर परिसरातील विविध रस्ते कामांचा पुढील १५ दिवसांत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड तालुका व परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि वन विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्ते कामांबाबत आज विधान भवन, येथे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.
बैठकीत काष्टी, श्रीगोंदा, देऊळगाव, मांडवगण, डिकसळ, म्हाळसुंदा–निंबे, आळसुना–निंबे–आंबेजळगाव तसेच कोंभळी फाटा ते कोंभळी या प्रमुख मार्गांसह सर्व प्रलंबित रस्त्यांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकासकामांना गती द्यावी असे निर्देश सभापती प्रा.शिंदे यांनी दिले.
No comments:
Post a Comment