मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे नूतनीकरण झाल्यानंतर अवघ्या एका वर्षात येथे सुमारे एक हजाराहून अधिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. हे प्रांगण कलाकारांसाठी कला आविष्काराचा महायज्ञ ठरले असून येथे प्रत्येकाला आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची संधी मिळत आहे.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 6 March 2026
महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ देण्याची गरज
महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ देण्याची गरज
- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार
महिला कला महोत्सव २०२६ चे उद्घाटन
मुंबई, दि. ५ : महिलांच्या कला, सृजनशीलता आणि कर्तृत्वाला योग्य व्यासपीठ मिळणे आवश्यक असून महिलांच्या प्रतिभेला सजगतेने ओळख देणे गरजेचे आहे, असे मत सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी व्यक्त केले.
मुंबईतील पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे आयोजित महिला कला महोत्सव २०२६ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य महिला आयोगच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, ज्येष्ठ गायिका पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे, राजश्री कुलकर्णी, नृत्यांगना सोनिया परचुरे, पुढारी मल्टीमीडियाच्या संपादक मृणालिनी नानिवडेकर, पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, विविध क्षेत्रातील कलाकार, साहित्यिक आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अन्न व औषध प्रशासन विभागांतर्गत असलेले कायदे केंद्र शासनाचे
मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले, अन्न व औषध प्रशासन विभागांतर्गत असलेले कायदे केंद्र शासनाचे आहेत. या कायद्यांमध्ये आवश्यक बदल करुन खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाणारे घातक रंग आणि त्यातील घटक यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रधानमंत्री यांना राज्य शासनाच्या वतीने पत्र पाठवून विनंती करण्यात येईल. त्याचबरोबर राज्य शासनाच्या वतीने खाद्य रंगांबाबतचे धोरण ठरविण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत चर्चा करण्यात येईल. राज्य शासनाच्या वतीने सर्व हॉटेल्सना खाद्यपदार्थांच्या मेन्युमध्ये त्यात वापरल्या जाणाऱ्या घटकांचा स्पष्ट उल्लेख करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल.
खाद्य पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगांमधील घातक घटकांच्या नियंत्रणासाठी धोरण ठरविणार
खाद्य पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगांमधील
घातक घटकांच्या नियंत्रणासाठी धोरण ठरविणार
- अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ
मुंबई, दि. ५ : विक्री होणाऱ्या खाद्य पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध रंगांमध्ये असलेल्या घातक घटकांबाबत चर्चा करुन खाद्यरंगांबाबतचे धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल. या बैठकीस विधानसभेतील या क्षेत्रातील जाणकार सदस्यांना निमंत्रित केले जाईल. त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या कायद्यांमध्ये आवश्यक बदल करण्यासंदर्भात प्रधानमंत्री मोदी यांना विनंती करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य महेश शिंदे यांनी खाद्यपदार्थांमध्ये रासायनिक प्रक्रियेद्वारे तयार केले जाणारे घातक कृत्रिम रंग वापरले जात असल्याबाबत अर्धा तास चर्चा उपस्थित केली. सदस्य विक्रम पाचपुते, सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दटके, राजेश पवार, हिरामन खोसकर यांनी सहभाग घेतला.
पाणंद रस्त्यांना गती
पाणंद रस्त्यांना गती
‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते’ योजनेअंतर्गत मंजूर कामांना गती देण्यात येईल. मजुरांना न्याय मिळावा, कोणावरही अन्याय होऊ नये आणि मंजूर कामे पूर्णत्वास जावीत, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मंत्री गोगावले यांनी सांगितले.
या चर्चेत सदस्य हिरामण खोसकर, राजेश पवार आदींनी सहभाग घेतला.
ग्रामरोजगार सेवकांचे मानधन
ग्रामरोजगार सेवकांचे मानधन
ग्रामरोजगार सेवकांना दरमहा ८ हजार रुपये मानधन देण्यासाठी नव्या लेखाशीर्ष उघडण्यात आले असून निधी उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरू आहे. डिसेंबर २०२५ पर्यंतच्या मानधनासाठी सुमारे २७५ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित मानधन अधिवेशन संपण्यापूर्वी देण्याचा प्रयत्न राहील. तसेच कुशल मजुरांचे पैसेही लवकरच पूर्णपणे देण्यात येईल, असे मंत्री गोगावले यांनी स्पष्ट केले.
ऑनलाइन हजेरीसाठी पर्यायी व्यवस्था
ऑनलाइन हजेरीसाठी पर्यायी व्यवस्था
ग्रामीण व डोंगराळ भागात नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाइन हजेरी घेण्यास अडथळे येत असल्याची बाब लक्षात घेऊन ‘एसएमएस’ आधारित प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. नेटवर्क उपलब्ध नसतानाही मजुरांचे छायाचित्र घेऊन नंतर २४ तासांत नोंद करता येते. अपवादात्मक परिस्थितीत हजेरी नोंदविण्याचे विशेष अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे मंत्री गोगावले यांनी सांगितले.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...