राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम
८ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३८१ हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या. हर्निया, क्लेफ्ट लिप यासह इतर २२,५३९ शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम
८ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३८१ हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या. हर्निया, क्लेफ्ट लिप यासह इतर २२,५३९ शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
अरुणोदय" सिकलसेल अॅनेमिया विशेष अभियान
१५ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या "अरुणोदय" सिकलसेल अभियानांतर्गत गृहभेटीद्वारे ७३ लाख ४५ हजार २६६ व्यक्तींची (वय ० ते ४० वर्षे) नोंद करण्यात आली. यापैकी ५३ लाख ४७ हजार ९३३ व्यक्तींची तपासणी पूर्ण झाली असून १,६४५ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. तसेच २७,११२ नवीन वाहक आढळून आले आहेत.
राज्यात आरोग्य मोहिमांना नागरिकांचा उत्साही प्रतिसाद
मुंबई, दि. ३ : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम अभियान स्वरूपात वेगाने राबविण्यात येत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ३१ मार्च २०२६ पर्यंत निश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या सर्व मोहिमा युद्धपातळीवर सुरू असून २८ फेब्रुवारीपर्यंतची आकडेवारी अत्यंत उत्साहवर्धक आहे.
सक्षम कौशल्य सर्वेक्षण योजनेविषयी
सक्षम कौशल्य सर्वेक्षण योजनेचा उद्देश हा 18-40 वयोगटातील पुरुष व महिला उमेदवारांचा कल (interest) लक्षात घेऊन संबंधित उमेदवारांना प्रशिक्षणाअंती रोजगारक्षम बनविणे हा आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यात सापिओ ॲनालायटीक या संस्थेद्वारे एच पश्चिम वार्डातील जवळपास 55 हजार घरी भेट आणि एआय आधारित सर्वेक्षण करण्यात येईल. सर्वेक्षणांतर्गत प्रत्येक घरातील उमेदवारांची विहित नमुन्यामध्ये माहिती जमा करण्यात येईल.
विशेषत: 18-40 वयोगटातील पुरुष व महिला उमेदवारांचे शिक्षण व रोजगार मिळवण्याकरीता आवश्यक असलेले कौशल्य प्राप्त करण्याचा कल जाणून घेण्यात येईल. संबंधित उमेदवारांना शासनाद्वारे मान्यताप्राप्त अभ्यासक्रमाची माहिती देण्यात येईल व त्या अनुषंगाने उमेदवारांचा कौशल्य प्राप्त करून घेण्याचा कल नोंदविण्यात येईल.
उपलब्ध असलेले अधिकृत कौशल्य प्रशिक्षण संस्था त्याचप्रमाणे नजीकच्या अंतरावर उपलब्ध करुन घेण्यात येईल. उमेदवाराने कौशल्य प्रशिक्षणाकरिता दाखविलेल्या कलानुसार संबंधित अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या प्रशिक्षण संस्थेमध्ये सुरू करण्यात येऊन याठिकाणी उमेदवारांना अभ्यासक्रमनिहाय प्रशिक्षण देण्यात येईल.
सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजनेच्या ‘सक्षम युवक, सक्षम राज्य’ या लोगोचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्याचप्रमाणे विविध उद्योजकांसमवेत प्रशिक्षण आणि रोजगार निर्मितीबाबत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्यातील पश्चिम विभागीय कौशल्य स्पर्धेतील (राष्ट्रीयस्तर) विजेत्या विध्यार्थांचा पालकमंत्र्यांच्
जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी युवकांना मुंबईत विविध क्षेत्रात मोठी संधी असल्याचे सांगून त्यांचा कल जाणून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळाले तर ते रोजगार आणि स्वयंरोजगार क्षेत्रात मोठे योगदान देऊ शकतील, असा विश्वास व्यक्त केला. पुढील दोन ते तीन महिन्यात राबविण्यात येणारे सर्वेक्षण, युवकांच्या कलानुसार प्रशिक्षण आणि रोजगार अथवा स्वयंरोजगाराचे मार्गदर्शन या तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येईल देशातील या पहिल्या सर्वेक्षण योजनेमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आणि कौशल्य विकास विभागाबरोबरच उद्योग, कामगार, महानगरपालिका,
पालकमंत्री ॲड.आशिष शेलार म्हणाले, भारताकडे लोकसंख्येचे सामर्थ्य आहे. युवकांना योग्य दिशा, कौशल्यविकास आणि रोजगारनिर्मितीची संधी मिळत असल्याने भारत जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करू शकतो. ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ हा युवकांच्या क्षमता आणि कौशल्य कल जाणून घेण्यासाठीचा देशातील पहिला उपक्रम आहे. एआय-आधारित आणि पारदर्शक पद्धतीने 18 ते 40 वयोगटातील युवकांचा सर्वेक्षणाद्वारे डेटा संकलित करुन त्याआधारे युवकांची कौशल्ये ओळखून त्यांना प्रशिक्षण संस्थांशी जोडले जाईल. या सर्वेक्षणानंतर 2027 पर्यंत सुमारे 15 हजार युवकांना प्रशिक्षण देण्याचा आणि त्यापैकी पाच हजार युवकांना रोजगार किंवा उद्योजकतेच्या माध्यमातून स्वावलंबी करण्याचा संकल्प आहे. यासाठी उद्योग, विविध कंपन्या आणि कॉर्पोरेट क्षेत्राशी समन्वय साधून रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी साखळी व्यवस्था उभी केली जाईल. यासाठी शासनाबरोबरच महाविद्यालयांनी आणि युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन पालकमंत्री ॲड शेलार यांनी केले.