Friday, 27 February 2026

दावोस करार : अंमलबजावणीतही अग्रेसर

 दावोस करार : अंमलबजावणीतही अग्रेसर

दावोस येथे जागतिक अर्थव्यवस्था एकत्र येतेत्यामुळे तेथील करारांना विशेष महत्त्व असते. महाराष्ट्राचे महत्त्व तेथे वाढले आहे. थेट परकीय कंपन्या येत नसल्या तरी भारतीय कंपन्यांमध्ये परकीय भांडवल गुंतलेले असते आणि अशा कंपन्यांशी करार होतातअसे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

गुंतवणुकीच्या सायकलमध्ये करारापासून उत्पादनापर्यंत दोन ते सात वर्षे लागतात. २०२२ मधील ९८ टक्के२०२३ मधील ८० टक्के२०२४ मधील ७० टक्के आणि २०२५ मधील ८८ टक्के करार विविध टप्प्यांवर अंमलबजावणीत आहेत. २०२६ साठी ३१ लाख कोटींचे करार झाले असून त्यातील ६७ टक्के उद्योग विभागाचेतर काही एमएमआरडीएचे आहेत. याशिवाय १० लाख कोटींचे करार प्रक्रियेत असून त्याबाबत लवकरच निर्णय होईल. १८ देशांतील कंपन्यांचा सहभाग असलेल्या या करारांमध्ये ८३ टक्के परकीय गुंतवणूक आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे तसेच राज्यातील सर्व भागांमध्ये गुंतवणूक आली आहे. थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून देशातील ३९ टक्के एफडीआय राज्यात येते. हे केवळ इरादे नसून आरबीआयच्या आकडेवारीनुसार प्रत्यक्ष गुंतवणूक आहे. दावोसमध्ये करार केलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जेएसडब्ल्यूचा इलेक्ट्रिकल वाहन उत्पादन प्रकल्पासंदर्भातील करार वेगाने अंमलात येत असून जूनमध्ये काम सुरू होईल. दावोसमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ताडाटा सेंटरचक्रिय अर्थव्यवस्थाशाश्वत विकासकृषी तंत्रज्ञानहरित ऊर्जा यासह अनेक क्षेत्रात गुंतवणूक आली आहे. मायक्रोसॉफ्टगुगलयासारखे अनेक जागतिक पातळीवर कंपन्या गुंतवणूक करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विकसित महाराष्ट्र : केवळ दस्तऐवज नव्हे, कृती आराखडा

 विकसित महाराष्ट्र : केवळ दस्तऐवज नव्हेकृती आराखडा

विकसित महाराष्ट्र’ हे केवळ पुस्तक नसून त्यावर मोठे काम झाले आहे. संसाधनांचे कार्यक्षम नियोजन करण्यासाठी व्हिजन मॅनेजमेंट यूनिट’ स्थापन करण्यात आले आहे. राज्याच्या अमृत महोत्सवी वर्ष २०२९२०३४ आणि २०४७ या टप्प्यांनुसार विकासाचे नियोजन केले आहे. अर्थव्यवस्थेची दिशा त्या दिशेने नेण्यासाठी रोडमॅप तयार केला आहे. हा रोडमॅप तयार करताना ३ लाख ८० हजार नागरिकांनी सहभाग घेतला आणि ७ लाखाहून अधिक नागरिकांनी सूचना केल्या. सर्वच क्षेत्रांना सामोरे ठेवून विकसित महाराष्ट्राचे चित्र तयार केले आहे. विकसित महाराष्ट्रासाठी प्रगतीशीलशाश्वततासर्वसमावेशकता आणि सुशासन ही चार उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील १३ वी अर्थव्यवस्था होईल

 पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील १३ वी अर्थव्यवस्था होईल

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         राज्यपालाच्या अभिभाषणावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर

·         ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थादरवर्षी १० लाख रोजगार‍ निर्मिती १३-१४ अब्ज डॉलर्स गुंतवणूक आणि वित्तीय शिस्तीचे लक्ष्य गाठण्याचा निर्धार

 

मुंबईदि. २६ : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर करण्याचे लक्ष्यदरवर्षी १० लाख रोजगारनिर्मिती१३ ते १४ अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचे उद्दिष्ट आणि वित्तीय तूट अडीच टक्क्यांच्या खाली आणण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना व्यक्त केला.

 

राज्यपालांच्या अभिभाषणावर सदस्यांनी मांडलेल्या मुद्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले. भाषणाच्या सुरूवातीलाच मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीछत्रपती शिवरायांनी आपल्याला जो महाराष्ट्र धर्म सांगितला तो आपण सगळे जाणतोचमराठा तितुका मेळवावामहाराष्ट्र धर्म वाढवावाआहे तितुके जतन करावेपुढे आणिक मेळवावेमहाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडेअशा पद्धतीने सगळ्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राने जीडीपीच्या तुलनेत कर्जाचे प्रमाण देशात सर्वोत्तम पातळीवर ठेवले आहे. देशाच्या जीडीपीमध्ये २०२४-२५ मध्ये राज्याचा वाटा १३.८ टक्के झाला असून आता ती १४ टक्क्यांच्या जवळ जाईलअसा प्राथमिक अंदाज आहे. राज्याचे बजेट नव्हेतर अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरची करायची आहे. सध्या राज्याची अर्थव्यवस्था सुमारे ५१ लाख कोटी रुपयांची असून २०१२-१३ मध्ये ती १३ लाख कोटी होती. अवघ्या दहा वर्षांत ती तीनपट वाढली आहे. ६६० बिलियन अर्थ व्यवस्था असलेले महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. देशातील कोणतेही राज्य महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या बरोबरीचे नसल्याचा दावा करत पुढील चार-पाच वर्षांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली नाहीतर महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनेल आणि जगातील १३वी अर्थव्यवस्था ठरेलसध्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बेल्जियमच्या तोडीस तोड आहे,असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दौंड तालुक्यातील तीन देवस्थानांना ‘ब’ वर्ग दर्जा देण्यात येईल

 दौंड तालुक्यातील तीन देवस्थानांना ‘ब’ वर्ग दर्जा देण्यात येईल

- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

मुंबईदि. २६ : दौंड तालुक्यातील श्री शंभो महादेव मंदिर देवस्थानराहू व श्री भानोबा मंदिर देवस्थान कुसेगाव आणि नारायण महाराज देवस्थान या तीनही देवस्थानांना ब वर्ग दर्जा देण्यात येईल. तसेच या तीनही देवस्थांनाना प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

दौंड तालुक्यातील श्री शंभो महादेव मंदिर देवस्थानराहू व श्री. भानोबा मंदिर देवस्थान कुसेगाव यांना ‘ब’ वर्ग दर्जा मिळणेबाबत विधानसभा सदस्य राहूल कुल यांनी उपस्थित केलेल्या अर्धातास चर्चेला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे बोलत होते.

श्री. गोरे म्हणाले कीराज्यातील प्रमुख यात्रास्थळांच्या पायाभूत सुविधांच्या मजबुतीकरणासाठी शासन कटिबद्ध असून पात्र देवस्थानांना ’ व ’ वर्गाचा दर्जा देण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यात येईल. १२ ऑक्टोबर २०११ रोजीच्या शासन निर्णयानुसार ज्या यात्रास्थळांवर भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होतेअशा ठिकाणांना ’ वर्ग देवस्थानाचा दर्जा देऊन पायाभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात्रास्थळांच्या विकासासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात अकरा यात्रास्थळांच्या मजबुतीकरणासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

दौंड तालुक्यातील राहू येथील श्री शंभो देवस्थानपुसेगाव येथील भानोबा देवस्थान आणि मौजे नारायण (ता. दौंड) येथील नारायण महाराज देवस्थान या यात्रास्थळांच्या विकासासाठी प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून मागविण्यात आले आहेत. भाविकांची संख्या दर्शविणारा अधिकृत दाखला याबाबत तातडीने पाठपुरावा करून आवश्यक दाखले सादर करण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत. पात्रता निकष पूर्ण झाल्यानंतर तिन्ही देवस्थानांना तातडीने ’ वर्ग दर्जा देण्यात येईल आणि प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून विकासकामे हाती घेतली जातीलअसे मंत्री गोरे यांनी सांगितले.

याशिवाय पद्मावती देवस्थान तसेच विठ्ठल व राजेश्वरी देवस्थान ही सध्या ’ वर्गात आहेत. या तिन्ही देवस्थानांना उच्च दर्जा देण्यासंदर्भातही जिल्हा परिषदेला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात येतील. निकष पूर्ण झाल्यास त्यांनाही दर्जा वाढवून विकासासाठी निधी देण्यात येईलअसेही त्यांनी सांगितले.

राज्यातील प्रत्येक मोठे यात्रास्थळ पायाभूत सुविधांनी सक्षम व्हावेभाविकांना स्वच्छतापाणीरस्तेनिवास या सोयी उपलब्ध व्हाव्यातया उद्देशाने शासन काम करत आहे. केवळ दर्जा देऊन न थांबता त्या-त्या देवस्थानांचा प्रत्यक्ष विकास साधण्याची भूमिका शासनाने घेतली आहे.

०००

बल्लारपूर टिंबर डेपो येथे म्युझियम व झायलरियम स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक

 बल्लारपूर टिंबर डेपो येथे म्युझियम व झायलरियम स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक

– वनमंत्री गणेश नाईक

मुंबईदि. २६ – चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर टिंबर डेपो येथे म्युझियम व झायलरियम स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने म्युझियम निर्मिती करण्यात येईलअशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिली.

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील बल्लारपूर टिंबर डेपो येथे टिंबर म्युझियम व झायलरियम स्थापन करणेसंदर्भात विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या अर्धातास चर्चेला उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक बोलत होते.

वनमंत्री नाईक म्हणाले कीबल्लारपूर येथील सागवान लाकूड हे संसदश्रीराम मंदिर येथे वापरले जात आहे. त्यामुळे या लाकडाची माहिती जनतेला व्हावीयासाठी हे म्युझियम स्थापन करण्यात येईल व त्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल.


संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार

 संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार

– वनमंत्री गणेश नाईक

मुंबईदि. २६ – बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा पर्यावरणीय समतोल राखत आणि आदिवासी व पात्र रहिवाशांना न्याय देत पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. महिन्याभरात ठोस निर्णय घेऊन प्रक्रिया गतीमान करण्यात येईल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिली.

       बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील आदिवासी पाडे व अतिक्रमित झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासंदर्भात सदस्य सुनील प्रभू यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी यासंदर्भात लवकरच ठोस निर्णय घेऊन पुनर्वसन प्रक्रिया गतीमान करण्यात येईल, असे सांगितले. सात हजार रुपये अनामत भरलेल्या पात्र कुटुंबांना घरे देण्यासाठी स्वतंत्र योजना राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वनमंत्री नाईक म्हणाले कीअतिक्रमित झोपडपट्टीतील सात हजार रुपये भरलेल्या पात्र झोपडपट्टीधारकांसाठी खासगी ३० एकर जागेवर टीडीआरच्या माध्यमातून पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच उद्यानातील मूळ रहिवाशांचे ९० एकर जागेवर ग्राउंड प्लस वन’ स्वरूपातील बांधकाम करून पुनर्वसन करण्याची शासनाची तयारी आहे. आरे कॉलनी परिसरातील उपलब्ध जागेबाबत झोनल मास्टर प्लॅन तयार केला जात असून महिन्याभरात निर्णय होईल. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन विषय निकाली काढण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

उद्यानातील आतील पाड्यांना सुविधा देण्यास न्यायालयाने नेमलेल्या समितीने मनाई केली आहे. मात्र उद्यानाबाहेरील वस्तींसाठी, उद्यानातून गेलेल्या पाणीपुरवठा पाइपलाइनच्या दुरुस्तीला मान्यता दिली जाईल, असे वनमंत्र्यांनी स्पष्ट केले.

०००

चांदोली अभयारण्यातील ३२ गावांच्या पुनर्वसनासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव

 चांदोली अभयारण्यातील ३२ गावांच्या पुनर्वसनासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव

- वनमंत्री गणेश नाईक

 

मुंबईदि. २६ : चांदोली वन्यजीव अभयारण्य परिसरातील गावांच्या पुनर्वसनाबाबत शासन सकारात्मक असून याबाबत मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवला जाईलअसे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चेला उत्तर देताना सांगितले.

सदस्य सत्यजित देशमुख यांनी चांदोली धरण परिक्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना नागरी सोयी सुविधा उपलब्ध न झाल्याबाबत उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना मंत्री गणेश नाईक बोलत होते.

वनमंत्री गणेश नाईक म्हणाले कीचांदोली वन्यजीव अभयारण्य परिसरातील जमीन मुळात चांदोली धरणासाठी संपादित करण्यात आली होती. त्या ठिकाणी असलेली बाजारपेठ नष्ट झाल्याने अनेक ग्रामस्थांनी येथे राहण्याची इच्छा नसल्याचे सांगितले. सांगलीसाताराकोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांतील एकूण ३२ गावांचा यामध्ये समावेश आहे. या प्रकरणी १९९९ च्या मूल्यांकनानुसार पुनर्वसनाचा मोबदला निश्चित करण्यात आला आहे. तथापिसध्याच्या बाजारभावानुसार मोबदला वाढवायचा असल्यास मंत्रिमंडळाची संमती आवश्यक असल्याने याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येईल. पर्यायी जमीन देणे किंवा आर्थिक मोबदला देणे याबाबत निर्णय घेताना आजच्या बाजारभावाचा विचार केला जाईलअसे वनमंत्री नाईक यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi