Friday, 27 February 2026

उद्योगांमध्ये ‘कंटीन्युअस एम्बियंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम’ (सीएएक्यूएमएस) आणि ‘ऑनलाइन कंटीन्युअस एमिशन मॉनिटरिंग सिस्टीम

 उद्योगांमध्ये कंटीन्युअस एम्बियंट एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम’ (सीएएक्यूएमएसआणि ऑनलाइन कंटीन्युअस एमिशन मॉनिटरिंग सिस्टीम’ (ओसीईएमएसबसविण्यात आल्याची माहिती देतत्याद्वारे सल्फर डायऑक्साइडनायट्रोजन ऑक्साइड आदींचे प्रमाण तपासले जात असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना नुकसानभरपाईरोजगार आणि सीएसआरमधून विकासकामे करण्याबाबत संबंधित विभागांशी समन्वय साधणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचे अहवाल व स्थानिक जनतेच्या तक्रारींतील तफावत दूर करण्यासाठी स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन तपास करणार असल्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

बेरोजगारी दर घटला; १.५ लाख सरकारी नियुक्त्यांचा टप्पा

 बेरोजगारी दर घटला१.५ लाख सरकारी नियुक्त्यांचा टप्पा

राज्यात बेरोजगारीचा दर ११ टक्क्यांपेक्षा जास्त कधीच नव्हताअसे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले कीराज्यातील बेरोजगारी दर २०२१-२२ मध्ये ४ टक्के२०२२-२३ मध्ये ३.३ टक्के आणि २०२३-२४ मध्ये ३.१ टक्क्यांवर आला आहे. महायुती सरकार आल्यानंतर १,२०,४४९ जणांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या असून पुढील दोन महिन्यांत हा आकडा दीड लाखांपर्यंत जाईल. दरवर्षी १० लाख रोजगारनिर्मितीचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

रोजगार निर्मितीसाठी राज्याने स्टार्टअपउद्योजकता आणि नावीन्य धोरणाला मान्यता दिली असून १४६ हून अधिक उपक्रमांना चालना देण्यात आली आहे.

दावोस करार : अंमलबजावणीतही अग्रेसर

 दावोस करार : अंमलबजावणीतही अग्रेसर

दावोस येथे जागतिक अर्थव्यवस्था एकत्र येतेत्यामुळे तेथील करारांना विशेष महत्त्व असते. महाराष्ट्राचे महत्त्व तेथे वाढले आहे. थेट परकीय कंपन्या येत नसल्या तरी भारतीय कंपन्यांमध्ये परकीय भांडवल गुंतलेले असते आणि अशा कंपन्यांशी करार होतातअसे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

गुंतवणुकीच्या सायकलमध्ये करारापासून उत्पादनापर्यंत दोन ते सात वर्षे लागतात. २०२२ मधील ९८ टक्के२०२३ मधील ८० टक्के२०२४ मधील ७० टक्के आणि २०२५ मधील ८८ टक्के करार विविध टप्प्यांवर अंमलबजावणीत आहेत. २०२६ साठी ३१ लाख कोटींचे करार झाले असून त्यातील ६७ टक्के उद्योग विभागाचेतर काही एमएमआरडीएचे आहेत. याशिवाय १० लाख कोटींचे करार प्रक्रियेत असून त्याबाबत लवकरच निर्णय होईल. १८ देशांतील कंपन्यांचा सहभाग असलेल्या या करारांमध्ये ८३ टक्के परकीय गुंतवणूक आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे तसेच राज्यातील सर्व भागांमध्ये गुंतवणूक आली आहे. थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून देशातील ३९ टक्के एफडीआय राज्यात येते. हे केवळ इरादे नसून आरबीआयच्या आकडेवारीनुसार प्रत्यक्ष गुंतवणूक आहे. दावोसमध्ये करार केलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जेएसडब्ल्यूचा इलेक्ट्रिकल वाहन उत्पादन प्रकल्पासंदर्भातील करार वेगाने अंमलात येत असून जूनमध्ये काम सुरू होईल. दावोसमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ताडाटा सेंटरचक्रिय अर्थव्यवस्थाशाश्वत विकासकृषी तंत्रज्ञानहरित ऊर्जा यासह अनेक क्षेत्रात गुंतवणूक आली आहे. मायक्रोसॉफ्टगुगलयासारखे अनेक जागतिक पातळीवर कंपन्या गुंतवणूक करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विकसित महाराष्ट्र : केवळ दस्तऐवज नव्हे, कृती आराखडा

 विकसित महाराष्ट्र : केवळ दस्तऐवज नव्हेकृती आराखडा

विकसित महाराष्ट्र’ हे केवळ पुस्तक नसून त्यावर मोठे काम झाले आहे. संसाधनांचे कार्यक्षम नियोजन करण्यासाठी व्हिजन मॅनेजमेंट यूनिट’ स्थापन करण्यात आले आहे. राज्याच्या अमृत महोत्सवी वर्ष २०२९२०३४ आणि २०४७ या टप्प्यांनुसार विकासाचे नियोजन केले आहे. अर्थव्यवस्थेची दिशा त्या दिशेने नेण्यासाठी रोडमॅप तयार केला आहे. हा रोडमॅप तयार करताना ३ लाख ८० हजार नागरिकांनी सहभाग घेतला आणि ७ लाखाहून अधिक नागरिकांनी सूचना केल्या. सर्वच क्षेत्रांना सामोरे ठेवून विकसित महाराष्ट्राचे चित्र तयार केले आहे. विकसित महाराष्ट्रासाठी प्रगतीशीलशाश्वततासर्वसमावेशकता आणि सुशासन ही चार उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.


पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील १३ वी अर्थव्यवस्था होईल

 पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील १३ वी अर्थव्यवस्था होईल

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· राज्यपालाच्या अभिभाषणावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर

· ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था, दरवर्षी १० लाख रोजगार‍ निर्मिती १३-१४ अब्ज डॉलर्स गुंतवणूक आणि वित्तीय शिस्तीचे लक्ष्य गाठण्याचा निर्धार

मुंबई, दि. २६ : महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर करण्याचे लक्ष्य, दरवर्षी १० लाख रोजगारनिर्मिती, १३ ते १४ अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचे उद्दिष्ट आणि वित्तीय तूट अडीच टक्क्यांच्या खाली आणण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना व्यक्त केला.


राज्यपालांच्या अभिभाषणावर सदस्यांनी मांडलेल्या मुद्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तर दिले. भाषणाच्या सुरूवातीलाच मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवरायांनी आपल्याला जो महाराष्ट्र धर्म सांगितला तो आपण सगळे जाणतोच, मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे, महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे, अशा पद्धतीने सगळ्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत.

Thursday, 26 February 2026

महापारेषणच्या ऊर्जा प्रकल्पांची उभारणी गतीमान करा

 महापारेषणच्या ऊर्जा प्रकल्पांची उभारणी गतीमान करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईदि. 26 : राज्यात 2029-30 पर्यंत मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक होऊन अनेक उद्योग कार्यान्वित होणार आहेत. उद्योगव्यावसायिक तसेच घरगुती वापरासाठी ऊर्जा मागणीत लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर सुरू असलेले ऊर्जा प्रकल्प निर्धारित वेळेपेक्षा आधी पूर्ण व्हावेतयासाठी महापारेषणशी संबंधित प्रकल्प उभारणीचा वेग वाढवावाअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महापारेषणच्या सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवालऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्लामहावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रामहापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमारवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ताअपर मुख्य सचिव अश्विनी भिडेप्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह टाटा पॉवरजेएसडब्ल्यूआवाडासीमेन्स आदी उद्योग समूहांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यातील ऊर्जेची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी महापारेषणशी संबंधित 13 पैकी 9 महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा तपशीलवार आढावा यावेळी घेण्यात आला. प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करून आवश्यक ते प्रशासकीय निर्णय तातडीने घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवन येथे "जावे विनोदाच्या गावा" विशेष कार्यक्रम • श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन • "लोकसेवेचा लोकजागर" ग्रंथाचे प्रकाशन

 मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवन येथे

"जावे विनोदाच्या गावा" विशेष कार्यक्रम

 

•          श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन

•       "लोकसेवेचा लोकजागर" ग्रंथाचे प्रकाशन

 

        मुंबईदि. २ : महाराष्ट्र विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनी म्हणजेच २७ फेब्रुवारी२०२६ रोजी "जावे विनोदाच्या गावा" या विशेष कार्यक्रमाचे आयोजन तसेच वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे संपादित "लोकसेवेचा लोकजागर" या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. कविश्रेष्‍ठ कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा केला जातो.

मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे दि. २७ फेब्रुवारी२०२६ रोजी सकाळी १०.०० ते ११.४५ यावेळेत "जावे विनोदाच्या गावा" या कार्यक्रमाचे संयोजन मा. प्रा. राम शिंदेसभापती महाराष्ट्र विधानपरिषदमा. ॲड. राहुल नार्वेकरअध्यक्ष महाराष्ट्र विधानसभामा. डॉ. नीलम गोऱ्हेउप सभापती महाराष्ट्र विधानपरिषद आणि मा. श्री अण्णा बनसोडेउपाध्यक्ष  महाराष्ट्र विधानसभा यांच्या संकल्पनेनुसार करण्यात आले आहे.

        याप्रसंगी वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे संपादित "लोकसेवेचा लोकजागर" या ग्रंथाचे प्रकाशन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते आणि सर्व महनीय व्यक्तींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारसंसदीय कार्य मंत्री चंद्रकांत (दादा) पाटीलमराठी भाषा मंत्री उदय सामंतविधिमंडळ मराठी भाषा समिती प्रमुख आशुतोष काळे यांच्या सन्मान्य उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.

        "जावे विनोदाच्या गावा" या कार्यक्रमात अभिजात मराठी साहित्यातील विनोदाचे दालन उलगडले जाईल त्याचप्रमाणे "आचार्य अत्रे व पु.ल. देशपांडे : विनोदाची दोन शिखरे" या विषयावर वक्ते मिलिंद जोशीकार्याध्यक्षमहाराष्ट्र साहित्य परिषद हे संवाद साधतील. कार्यक्रम संकल्पना उत्तरा मोने यांची असून केदार शिंदेहृषिकेश जोशीश्रीरंग भावेअदिती प्रभुदेसाईधनश्री दामले यांचा अभिवाचक आणि गायक म्हणून सहभाग असेल. मराठीतील श्रेष्ठ लेखकांच्या अभिजात साहित्याचे यावेळी अभिवाचन तसेच मराठी गीतांचे सादरीकरण यावेळी होईल. या कार्यक्रमास दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्यअधिवेशन वार्तांकनासाठी उपस्थित पत्रकार अशा सर्वांनी उपस्थित रहावेअसे आवाहन महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे सचिव-१ श्री.जितेंद्र भोळे यांनी केले आहे.

***

Featured post

Lakshvedhi