Sunday, 22 February 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ­­‘कुंभदूत’ ॲपचे अनावरण · एआय समिटमधील महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ­­‘कुंभदूत’ ॲपचे अनावरण

·         एआय समिटमधील महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट

नवी दिल्ली २० : नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित 'इंडिया एआय समिट २०२६' मध्ये महाराष्ट्र राज्याने आपल्या तंत्रज्ञानस्नेही धोरणांचा आणि प्रगत उपक्रमांचा प्रभावी ठसा उमटवला आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समिटमधील 'महाराष्ट्र पॅव्हेलियन'ला भेट देऊन राज्यातील विविध एआय प्रकल्पांची पाहणी केली. यावेळी नाशिक येथे होणाऱ्या महाकुंभमेळ्याच्या नियोजनासाठी विकसित 'कुंभदूत' या एआय-आधारित ॲपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  अनावरण करण्यात आले.

            या कार्यक्रमाला माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, बंदरे विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, नाशिक विभागीय आयुक्त तसेच नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण प्रमुख डॉ. प्रवीण गेडाम आणि कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व तंत्रज्ञ उपस्थित होते.

            यावेळी अनावरण करण्यात आलेले कुंभदूत ॲप आगामी महाकुंभमेळ्यासाठी हाय-टेक सारथी म्हणून ओळखले जाईल. लाखो भाविकांचे व्यवस्थापन, गर्दीचे नियंत्रण आणि आपत्कालीन सेवांच्या समन्वयासाठी हे महत्वपूर्ण ठरणार आहे. या ॲपमुळे भाविकांना रिअल-टाइम माहिती मिळण्यासोबतच प्रशासनाला सुरक्षेच्या दृष्टीने अचूक नियोजन करणे सुलभ होणार आहे.

डिजिटल इंडियाच्या ध्येयाला गती देत महाराष्ट्र राज्य आता एआय क्रांतीमध्ये आघाडीवर असल्याचे या प्रदर्शनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

ही संकल्पना एजेंटिक कुंभ या मॉडेलवर आधारित आहे. सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर, सिंहस्थ २०२७ मध्ये नोंदणीकृत प्रत्येक भाविकाला एक वैयक्तिक एआय सहाय्यक मिळणार आहे. या सहाय्यकाचे नाव कुंभदूत असेल. हा कुंभदूत भाविकाला प्रवास, निवास, घाटांची माहिती, आपत्कालीन मदत, पेमेंट, भाषांतर आदी बाबतीत मार्गदर्शन करेल.

            कुंभदूत एआय सहाय्यक २० पेक्षा अधिक भारतीय भाषांमध्ये कार्य करू शकणार आहे. स्मार्टफोन असो वा साधा फीचर फोन, अगदी कॉल करूनही (आयव्हीआर प्रणालीद्वारे) भाविक या सेवांचा लाभ घेऊ शकतील. डिजिटल साक्षरता नसलेल्या किंवा वयोवृद्ध भाविकांनाही सोप्या आवाजाच्या माध्यमातून माहिती मिळेल.

            या प्रणालीमध्ये ‘कुंभ पास’ ही संकल्पना देखील प्रस्तावित आहे. हा पास ऐच्छिक असेल आणि तो डिजीलॉकरमध्ये सुरक्षित स्वरूपात ठेवला जाईल. यामुळे प्रवेश प्रक्रिया, सेवा मिळविणे आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत करणे अधिक सुलभ होईल.

ही संपूर्ण यंत्रणा भारताच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरवर आधारित असेल. यूपीआयद्वारे पेमेंट, आरोग्य नोंदीसाठी, व्यापाऱ्यांसाठी, तसेच डिजीलॉकर यांचा समन्वय या प्रणालीत असेल. मात्र, भाविकांची वैयक्तिक माहिती केंद्रीकृत स्वरूपात साठवली जाणार नाही. सर्व माहिती ही मर्यादित कालावधीसाठी आणि भाविकाच्या संमतीनेच वापरली जाईल.

            ही प्रणाली सिंहस्थ काळात १ कोटीपर्यंत भाविकांना आणि लाखो डिजिटल एजंट्सना हाताळण्यास सक्षम असेल. सिंहस्थ २०२७ पूर्वी नाशिकमधील महाविद्यालयांमध्ये १०,००० सहभागींसह पायलट प्रकल्प राबविण्यात येणार आहे .

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सिंहस्थ २०२७ हे श्रद्धा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम ठरणार आहे. एजेंटिक कुंभ ही संकल्पना महाराष्ट्राला जबाबदार आणि नैतिक एआय वापराच्या क्षेत्रात आघाडीवर नेईल.

विविध भेटीगाठी

 विविध भेटीगाठी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष जोहॅन्स झुट यांची भेट घेत त्यांच्याशी शेती क्षेत्रात परिवर्तन, एआय आधारित सेवा प्रदान प्रणाली, रोजगारनिर्मिती आणि युवकांना डिजिटल कौशल्यांचे प्रशिक्षण इत्यादी विविध विषयांवर चर्चा केली. सिंगापूरच्या डिजिटल विकास आणि माहिती मंत्री जोसपिन टिओ यांची भेट घेत डिजिटल प्रशासनाबाबत त्यांच्याशी चर्चा केली.

सहकार्यांतर्गत शासकीय प्रकल्पांसाठी एआय सॅन्डबॉक्स

 सहकार्यांतर्गत शासकीय प्रकल्पांसाठी एआय सॅन्डबॉक्स उभारण्यात येणार असून, कृषी, आरोग्य, शिक्षण, न्यायव्यवस्था, माहिती-तंत्रज्ञान तसेच शहरी व ग्रामीण विकास या प्राधान्य क्षेत्रांमध्ये 12 एआय उपाययोजनांचा विकास व त्यांची प्रायोगिक अंमलबजावणी केली जाईल. यासोबतच प्रशिक्षण, संशोधन आणि नवोन्मेषासाठी ‘महा ओपन स्पेस सॅन्डबॉक्स’ स्वरूपातील भौतिक सुविधा उभारण्याची चाचपणी केली जाईल. विविध कार्यशाळा, हॅकाथॉन आणि तज्ज्ञ परिषदांद्वारे महाराष्ट्रातील एआय व नवोन्मेष परिसंस्थेशी सातत्यपूर्ण संवाद आणि सहकार्य वाढवले जाणार आहे. नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अधिक प्रभावी व सुलभ सेवा देण्यासाठी चॅट जीपीटी च्या प्रगत क्षमतांचा वापर करून एआय-सक्षम अ‍ॅप्स किंवा संकेतस्थळे विकसित करण्यात येणार आहेत. ओपन एआय च्या नव्या क्षमतांचा प्रायोगिक वापर करून चॅट जीपीटी सोबत तृतीय-पक्ष सेवांचे सुलभ एकत्रीकरण करण्यावरही विशेष भर दिला जाणार आहे.

एआय-आधारित प्रशासनासाठी महाराष्ट्र शासन आणि ओपन एआय यांच्यात सहकार्य

 एआय-आधारित प्रशासनासाठी महाराष्ट्र शासन आणि ओपन एआय यांच्यात सहकार्य

महाराष्ट्र शासन आणि ओपन एआय यांच्यातील सामंजस्य पत्राच्या आदानप्रदान कार्यक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षस्थान भूषवले. या सहकार्यामुळे एआय-आधारित प्रशासन आणि नवोन्मेषाच्या नव्या युगाला सुरुवात होत आहे. या भागीदारीमुळे स्मार्ट, सर्वसमावेशक आणि एआय-सक्षम सार्वजनिक सेवा उपलब्ध होऊन, तंत्रज्ञानाचा लाभ महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यास मदत होणार आहे. या प्रसंगी मंत्री ॲड. आशिष शेलार, ओपन एआय चे सार्वजनिक धोरण प्रमुख ख्रिस लेहान तसेच इतर मान्यवर उपस्थित होते

माझी वसुंधरा अभियान सन्मान सोहळा दिनांक 21 फेब्रुवारी 2026 पुरस्कार वितरण

 माझी वसुंधरा अभियान सन्मान सोहळा

दिनांक 21 फेब्रुवारी 2026 

पुरस्कार वितरण



राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे  पुरस्कार : (एकूण 18 स्थानिक संस्था)

ग्राम पंचायती:

 

(1)   ग्रामपंचायत गट- 1 हजार पेक्षा कमी लोकसंख्या गट

लोहारा बु. नगरपंचायत,

जिल्हा धाराशिव

१) माझी वसुंधरा अभियान ४.० मधील उंच उडी पुरस्कार.

 

आजरा नगरपंचायत,

 जिल्हा कोल्हापूर

अभियान ४.० मधील राज्यस्तरीय उत्तेजनार्थ पुरस्कार.

मलकापूर_ को नगरपरिषद, जिल्हा कोल्हापूर

 

एकूण २ पुरस्कार:

१) माझी वसुंधरा अभियान ५.० मधील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार

२) माझी वसुंधरा अभियान ४.० मधील राज्यस्तरीय उत्तेजनार्थ पुरस्कार.

  

त्रिंबक नगरपरिषद, जिल्हा नाशिक

अभियान ४.० मधील राज्यस्तरीय उत्तेजनार्थ पुरस्कार.

 

 बेसा पिंपळा नगरपंचायत, जिल्हा नागपूर

माझी वसुंधरा अभियान ५.० मधील

उंच उडी पुरस्कार.

 

 २) नगर परिषद व नगर पंचायत गट -१५ हजार ते २५ हजार लोकसंख्या गट

  कोरेगांव नगरपंचायत,

जिल्हा सातारा

माझी वसुंधरा अभियान ४.० मधील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार

 

माळेगाव बु. नगरपंचायत,

जिल्हा पुणे

 

 

एकूण ३ पुरस्कार:

१) माझी वसुंधरा अभियान ५.० मधील  द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार

२) अभियान ५.० मधील भूमी या थीमॅटीक क्षेत्रामधील पुरस्कार

३) अभियान ४.० मधील राज्यस्तर उत्तेजनार्थ पुरस्कार.

 

राहता नगरपरिषद,

जिल्हा अहिल्यानगर.

अभियान ४.० मधील राज्यस्तरीय उत्तेजनार्थ पुरस्कार.

  

कवठेमहांकाळ नगरपंचायत,

जिल्हा सांगली.

अभियान ४.० मधील राज्यस्तरीय उत्तेजनार्थ पुरस्कार.

  

देवळी नगरपरिषद,

जिल्हा वर्धा

१) माझी वसुंधरा अभियान ५.० मधील उंच उडी पुरस्कार.

 

 ३) नगर परिषद व नगर पंचायत गट - २५ हजार ते ५० हजार  लोकसंख्या गट /
                                         २५ हजार ते ४० हजार  लोकसंख्या गट

 सासवड नगरपरिषद,जिल्हा पुणे

माझी वसुंधरा अभियान ४.० मधील  द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार

                               

चांदवड नगरपरिषद, जिल्हा नाशिक  

माझी वसुंधरा अभियान ४.० मधील 

तृतीय क्रमांकाचा पुरस्कार

 

 पलुस नगरपरिषद, जिल्हा- सांगली

माझी वसुंधरा अभियान ४.० मधील उंच उडी पुरस्कार. 

 

मोहोळ नगरपरिषद, जिल्हा सोलापूर.

अभियान ४.० मधील राज्यस्तरीय उत्तेजनार्थ पुरस्कार.

 

गडहिंग्लज नगरपरिषद,

जिल्हा कोल्हापूर 

 

एकूण २ पुरस्कार:

१) माझी वसुंधरा अभियान ५.० मधील  तृतीय क्रमांकाचा पुरस्कार

२) माझी वसुंधरा अभियान ४.० मधील राज्यस्तरीय उत्तेजनार्थ पुरस्कार

 

कागल नगरपरिषद, जिल्हा कोल्हापूर

 

एकूण २ पुरस्कार:

१ ) माझी वसुंधरा अभियान ५.० मधील  द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार.

२) अभियान ४.० मधील राज्यस्तर उत्तेजनार्थ पुरस्कार.

 

बुटीबोरी नगरपरिषद, जिल्हा- नागपूर

माझी वसुंधरा अभियान ५.० मधील उंच उडी पुरस्कार.

 

 ४) नगर परिषद व नगर पंचायत गट -  ५० हजार ते १ लक्ष लोकसंख्या गट

 हिंगोली नगरपरिषद,जिल्हा हिंगोली

 माझी वसुंधरा अभियान ४.० मधील  द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार

 

Saturday, 21 February 2026

शेतीची निर्भरता निसर्गावर अवलंबून आहे. जमीन,पाणी, हवा या नैसर्गिक घटकांवर

 महाराष्ट्र कृषी प्रधान राज्य आहे. शेतीची निर्भरता निसर्गावर अवलंबून आहे. जमीन,पाणी, हवा या नैसर्गिक घटकांवर शेती अवलंबून असते. त्यामुळे वातावरण बदलामुळे सर्वात जास्त नुकसान शेतीच होतं. याची नोंद आपण सर्वांनी घेतली पाहिजे. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखत, वैज्ञानिक नियोजन आणि लोकसहभागातून वातावरण अनुकूल महाराष्ट्र घडवावा आणि भावी पिढ्यांसाठी सुरक्षित, हरित आणि सक्षम महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करुन माझी वसुंधरा अभियानमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व पुरस्कारप्राप्त स्थानिक स्वराज्य संस्थांचं उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी अभिनंदन केले.

पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाचा विचार करत असताना

 उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाचा विचार करत असताना आपल्याला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. निसर्गाच्या बाबतीत त्यांच्या मनात असलेलं हळवेपण आपण सर्वांनी अनेकदा बघितलं आहे. अनेक क्षेत्रात महाराष्ट्रानं देशाला दिशा दिली आहे. विकास केवळ आर्थिक वाढीपुरता मर्यादित न ठेवता, शाश्वत, पर्यावरणपूरक आणि भावी पिढ्यांचा विचार करणारा असावा, हे दिवंगत अजित दादांचं स्वप्न होतं.

 

Featured post

Lakshvedhi