Saturday, 21 February 2026

श्रीलंकेत माजी अध्यक्ष आणि खासदारांचे पेन्शन रद्द.*

 *श्रीलंकेत माजी अध्यक्ष आणि खासदारांचे पेन्शन रद्द.*

-----------------------------

-- प्रमोद कुलकर्णी, पुणे

-----------------------------

श्रीलंकेच्या पार्लमेंट सदस्यांनी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी इतिहास घडवला.

सरकारने, निवडणूकपूर्व प्रचाराचे एक महत्त्वाचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी, संसदेच्या सर्व माजी सदस्यांचे पेन्शन रद्द करण्यासाठी एक बील संसदेत मांडले होते. १७ फेब्रुवारी, मंगळवारी, संसदेत त्यावर मतदान झाले. सदस्यांनी प्रचंड मताधिक्याने हे बील मंजूर केले. २२५ सदस्यांच्या सभागृहात १५४ मतांनी ४९ वर्षे जुना संसदीय पेन्शन कायदा रद्द करण्याचे विधेयक मंजूर केले गेले. फक्त दोन सदस्यांनी विरोधात मत दिले. बाकी सदस्य गैरहजर होते.

देशाच्या आर्थिक संकटावर जनतेचा रोष असल्याने हे पाऊल उचलण्यात आले.

श्रीलंकेत, पाच वर्षे संसद सदस्य म्हणून राहिल्यानंतर,आणि त्याच्या किंवा तिच्या मृत्यूनंतर त्यांच्या विधवेला/विधुराला पेन्शन मिळण्याचा अधिकार होता. नवीन कायद्यामुळे असे सर्व पेमेंट आणि पेन्शन बंद झाले आहे.

२०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत सत्तेत आलेले राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान ही प्रथा बंद करण्याचे वचन दिले होते.

यापूर्वी दिसानायके यांच्या सरकारने सप्टेंबर २०२५ मध्ये लोकांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून माजी राष्ट्रपतींना देण्यात येणारे भत्ते रद्द केले होते. त्यामध्ये माजी राष्ट्रपती आणि त्यांच्या विधवांसाठी घरे, भत्ते, पेन्शन, सरकारी निधी असलेल्या इंधनासह लक्झरी वाहने, अंगरक्षक, कार्यालय आणि कर्मचारी यांचा समावेश होता. हे सर्व आता रद्द करण्यात आले आहे. सध्या पाच माजी राष्ट्रपती आणि एक विधवा या सोयी सुविधा उपभोगत होते.

न्यायमंत्री हर्षणा नानयक्कारा यांनी संसदेत पेन्शन रद्द करण्याचे विधेयक सादर केले आणि त्यावेळी म्हटले की निवडणुकीतील आश्वासन आता पूर्ण झाले आहे आणि देश सर्वात वाईट आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करत असताना 

कायदेकर्त्यांना पेन्शन मिळण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यांनी पुढे जे सांगितले ते अतिशय विचार करायला लावणारे आणि धाडसी होते. ते म्हणाले, *"जेव्हा लोक या सभागृहातल्या चर्चेचा दर्जा आणि सदस्य संसदेत काय बोलतात ते पाहतात तेव्हा त्यांना संसद सदस्य पेन्शन मिळण्यास पात्र वाटत नाहीत,"*

पेन्शन रद्द करण्याच्या विधेयकाला विरोध करणारे विरोधी पक्षनेते साजित प्रेमदासा यांची प्रतिक्रिया अत्यंत अनाकलनीय होती. त्यांनी आक्षेप घेतला आणि म्हटले की, पद सोडल्यानंतर आमदारांना सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी पेन्शन आवश्यक आहे. अन्यथा, निवृत्तीनंतर स्वतःचे भविष्य सुनिश्चित करण्यासाठी भ्रष्टाचाराद्वारे संपत्ती जमवण्याचा मोह त्यांना होऊ शकतो.

अश्या प्रकारे सर्व माजी अध्यक्ष, खासदार यांना मिळणारे पेन्शन आणि सुविधा श्रीलंकेत बंद झाल्या आहेत.

देशहिताचा विचार करून स्वतःचेच भविष्यातील आर्थिक फायदे रद्द करण्याचे विधेयक मंजूर करणारे श्रीलंकन संसद सदस्य नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत.

-----------------------------

१९ फेब्रुवारी, २०२६.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांनी अनुभवली 'गोरेगाव चित्रनगरी'

 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांनी अनुभवली 'गोरेगाव चित्रनगरी'

 

मुंबई, दि. 20 : गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी (फिल्मसिटी) येथे यवतमाळ येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांनी भेट दिली. या महिलांना संपूर्ण चित्रनगरी फिरण्याची संधी मिळाली. या महिलांचे चित्रनगरीचे सह-व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी स्वागत केले.

 

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे 'रसिकाश्रय' संस्था ही गेले 25 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने दरवर्षी 'जीवाची मुंबई' हा आगळा वेगळा उपक्रम राबविला जातो. यावर्षी या उपक्रमाच्या माध्यमातून पतीच्या निधनानंतर शेती आणि घराची जबाबदारी पेलणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याच्या दुर्गम भागातील  महिलांना मुंबईतील गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीची सफर घडवून आणण्यात आली.

 

आजवर ज्या मालिका आणि चित्रपट केवळ दूरदर्शनच्या पडद्यावर पाहिले होते, त्याचे प्रत्यक्ष चित्रीकरण कसे चालते, भव्य सेट कसे असतात आणि कलाकार प्रत्यक्षात कसे दिसतात, याचा प्रत्यक्ष अनुभव महिलांनी या सहलीच्या माध्यमातून घेतला. यावेळी महिलांना चित्रीकरण कसे चालते, याविषयी मार्गदर्शन देखील करण्यात आहे. गोरेगाव चित्रनगरीत या महिलांचे आगमन झाले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह आणि कुतूहल पाहायला मिळाले."आम्ही कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मुंबईला येऊन चित्रनगरी प्रत्यक्ष पाहता येईल," अशी भावूक प्रतिक्रिया यावेळी अनेक महिलांनी दिली.

चित्रनगरीत दाखल झालेल्या या महिलांकरिता प्रशासनाने त्यांना चित्रीकरणाच्या पडद्यामागचे जग जवळून पाहण्यासाठी विशेष सहकार्य केले.

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक जाहीर; 16 मार्चला मतदान व मतमोजणी

 राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक जाहीर;

16 मार्चला मतदान व मतमोजणी

 

मुंबई, दि. 20 : भारत निवडणूक आयोगाने  10 राज्यांमधील रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या 37 जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश आहे. या सात जागांसाठी 16 मार्च 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे.

 

महाराष्ट्रातील डॉ. भागवत किशनराव कराड, डॉ. फौजिया तहसीन अहमद खान, प्रियंका विक्रम चतुर्वेदी, शरदचंद्र गोविंदराव पवार, धैर्यशील मोहन पाटील, रजनी अशोकराव पाटील आणि रामदास बंडू आठवले या सदस्यांची मुदत 2 एप्रिल 2026 रोजी संपणार असल्याने भारत निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या या  सात जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे.

 

या निवडणुकीची अधिसूचना गुरुवार, 26 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून यासाठी  नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक  5 मार्च 2026 असा आहे. या नामनिर्देशन पत्रांची छाननी  शुक्रवार,  6 मार्च 2026रोजी करण्यात येईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 9 मार्च 2026 आहे. निवडणुकीसाठीचे मतदान सोमवार, 16 मार्च 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत होणार असून याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी सुरू होईल. ही निवडणूक प्रक्रिया शुक्रवार, 20 मार्च 2026 रोजी  पूर्ण होईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

डिजिटल रथामध्ये भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया, संविधान सभेची भूमिका तसेच नागरिकांना

 सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या डिजिटल रथामध्ये भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया, संविधान सभेची भूमिका तसेच नागरिकांना प्रदान केलेले मूलभूत अधिकार व कर्तव्ये यांची सविस्तर माहिती प्रभावी माध्यमातून सादर करण्यात आली आहे. समतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणविरोधी अधिकार, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार तसेच घटनात्मक उपायांचा अधिकार यांसह संविधानातील महत्त्वपूर्ण तरतुदींची माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.

 

या जनजागृती उपक्रमाद्वारे लोकशाही मूल्यांचे महत्त्व, संविधानाचे सामाजिक स्थान आणि नागरिकांची जबाबदारी याबाबत प्रभावी मार्गदर्शन केले जात आहे.

 

या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये संविधानाबाबत अभिमानाची भावना वृद्धिंगत होत असून, विशेषतः विद्यार्थी व युवा पिढीत संविधानाचा आदर, कर्तव्यभावना आणि लोकशाही मूल्यांविषयीची जाणीव अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

000

‘आपलं संविधान – आपला अभिमान’ उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे डिजिटल रथास उत्स्फूर्त प्रतिसाद

 ‘आपलं संविधान – आपला अभिमान’ उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे

डिजिटल रथास उत्स्फूर्त प्रतिसाद

 

मुंबई, दि.20 : स्वातंत्र्यानंतर देशाचे संविधान अंमलात येऊन यंदा 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक पर्वानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘संविधान अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘आपलं संविधान – आपला अभिमान’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या संविधान जनजागृती डिजिटल रथाचे उद्घाटन नुकतेच मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 या उपक्रमाचा भाग असलेला संविधान जनजागृती डिजिटल रथ छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी भेट देत आहे. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असून, नागरिकांनीही या रथास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कोकणातील आंबा पिकांवर मोहोर आला नसल्याने आंबा उत्पादकांचे आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान

कोकणातील आंबा पिकांवर मोहोर आला नसल्याने आंबा उत्पादकांचे आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्याचबरोबर, पुढील काळात जर पाऊस आला किंवा उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली तर आंबा उत्पादकांच्या हाती काहीही पडणार नाही. त्यामुळे आंबा उत्पादकांना ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करून कोकणातील आंबा बागायतदारांना शासन मोठ्या प्रमाणात मदत करेल, असा विश्वास मंत्री श्री.राणे यांनी आंबा बागायतदारांना दिला.

 

आंबा पिकांवर वेगवेगळी किटकनाशके फवारणी केल्याने उत्पादनात घट होते. यासाठी धोरण ठरविण्याचीही गरज पालकमंत्री राणे यांनी व्यक्त केली. कृषी विद्यापीठे सक्षम करण्यावर अधिक भर देण्यात येण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. कोकणातील आंब्यांच्या उत्पादनात अधिक प्रमाणात वाढ व्हावी, यासाठी परदेशी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घेण्याबाबत त्यांनी सकारात्मकता दाखविली.

000

कोकणातील आंब्यावरील नैसर्गिक आपत्तीचा सकारात्मक अहवाल सादर करा - पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

 कोकणातील आंब्यावरील नैसर्गिक आपत्तीचा सकारात्मक अहवाल सादर करा

                                                                                    - पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

 

मुंबई, दि. 20 : नोव्हेंबर महिन्यात सुरुवातीला पाऊस ल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंब्यांच्या झाडांना मोहर येण्यास उशीर झाला. त्यानंतर डिसेंबर पासून जिल्ह्यात सातत्याने कमी असणारे तापमान व थंड वातावरणामुळे त्यावर चांगला मोहोर आला. त्याचप्रमाणे आता तिसरा मोहोर आल्यानंतर त्यातून किती उत्पन्न आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल, याचा अंदाज नाही. त्यामुळे कृषी विभागाने योग्य अहवाल तयार करून तो शासनाकडे तात्काळ सादर करावा, असे निर्देश मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंब्यावर आलेल्या रोगामुळे झालेल्या नुकसानीबाबत तातडीने उपाययोजना करण्याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे उपकुलगुरू  संजय भावे, फलोत्पादन संचालक अंकुश माने, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे संशोधन संचालक डॉ.वी.यू.शहारे, वनस्पतीरोग शास्त्रज्ञ विभागाच्या विभागप्रमुख  डॉ.पुष्पा पाटील, कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. विजय देसाई, कृषी विभागाचे अवर सचिव डॉ. ललितकुमार धायगुडे तसेच आंबा व इतर फळ बागायती शेतकरी संघआंबा बागायदार व व्यापारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

कोकणातील आंबा पिकांवर मोहोर आला नसल्याने आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान होणार आहे. त्याचबरोबर, पुढील काळात जर पाऊस आला किंवा उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली तर आंबा उत्पादकांच्या हाती काहीही पडणार नाही. त्यामुळे आंबा उत्पादकांना ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करून कोकणातील आंबा बागायतदारांना शासन मोठ्या प्रमाणात मदत करेल, असा विश्वास मंत्री श्री.राणे यांनी आंबा बागायतदारांना दिला.

 

आंबा पिकांवर वेगवेगळी किटकनाशके फवारणी केल्याने उत्पादनात घट होते. यासाठी धोरण ठरविण्याचीही गरज पालकमंत्री राणे यांनी व्यक्त केली. कृषी विद्यापीठे सक्षम करण्यावर अधिक भर देण्यात येण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. कोकणातील आंब्यांच्या उत्पादनात अधिक प्रमाणात वाढ व्हावी, यासाठी परदेशी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन घेण्याबाबत त्यांनी सकारात्मकता दाखविली.

000

Featured post

Lakshvedhi