‘आपलं संविधान – आपला अभिमान’ उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे
डिजिटल रथास उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, दि.20 : स्वातंत्र्यानंतर देशाचे संविधान अंमलात येऊन यंदा 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक पर्वानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘संविधान अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘आपलं संविधान – आपला अभिमान’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या संविधान जनजागृती डिजिटल रथाचे उद्घाटन नुकतेच मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमाचा भाग असलेला संविधान जनजागृती डिजिटल रथ छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी भेट देत आहे. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असून, नागरिकांनीही या रथास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
No comments:
Post a Comment