Friday, 20 February 2026

भविष्यातील नियोजित शहरी केंद्र म्हणून कल्याण-डोंबिवली परिसराचा विस्तार

 भविष्यातील नियोजित शहरी केंद्र म्हणून कल्याण-डोंबिवली परिसराचा विस्तार होणार असून येथे 2,500 ते 3,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 1,239 कोटींच्या कल्याण रिंग रोड या प्रकल्पाकरिता 600 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भिवंडी-कल्याण मेट्रो 5, उल्हासनगर विस्तार 5-ए आणि कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रो 14 मुळे कल्याण हे एमएमआरमधील महत्त्वाचे 'ट्रान्झिट हब' बनेल. ऐरोली-काटई नाका मार्ग 584 कोटींच्या या प्रकल्पामुळे नवी मुंबईशी कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल असे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे-कल्याणचा कायापालट: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे ‘मोबिलिटी हब’ तर कल्याण ‘प्रगत शहरी केंद्र’ म्हणून विकसित करणार

 एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे-कल्याणचा कायापालट: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे मोबिलिटी हब’ तर कल्याण प्रगत शहरी केंद्र’ म्हणून विकसित करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

            मुंबईदि.19 : मुंबई महानगर प्रदेशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि वाढत्या शहरीकरणाची गरज ओळखून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी झालेल्या एमएमआरडीच्या बैठकीत 48 हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी दिली आहे. या माध्यमातून ठाणे आणि कल्याण या दोन शहरांचा कायापालट होणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ठाण्याला 'मोबिलिटी हबम्हणून विकसित करताना कल्याण हे भविष्यातील प्रगत शहरी केंद्र म्हणून उदयास येईलअसे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

            ठाणे शहर हे मुंबईचे महत्त्वाचे प्रवेशद्वार मानून येथे 12 ते 13 हजार कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे 12 किमी लांबीचा ठाणे-बोरीवली दुहेरी बोगदा ह्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 2026-27 या वर्षाकरिता 3 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून याला एकूण 18 हजार 838 कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

हवामान लवचिकतेसाठी सार्वत्रिक प्रयत्न आवश्यक –

 हवामान लवचिकतेसाठी सार्वत्रिक प्रयत्न आवश्यक – महापौर रितु तावडे

            शहराचा विकासवाढ आणि हवामान जबाबदारी या एकमेकांपासून वेगळ्या न ठेवता समांतर आणि समन्वयाने पुढे नेण्याची आवश्यकता असल्याचे मुंबईच्या महापौर श्रीमती रित तावडे यांनी सांगितले. हवामान लवचिकता केवळ शासनापुरती मर्यादित नसून सार्वजनिक संस्था, खाजगी उद्योग, वित्तीय भागीदार, संशोधन संस्था आणि नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शक्य होईल. यासाठी मजबूत सार्वजनिक-खाजगी भागीदारी, नवोन्मेषी वित्तपुरवठा, तांत्रिक सहकार्य आणि नागरिकांच्या वर्तनातील सकारात्मक बदल आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

उद्योगवृद्धीसाठी आधुनिक पायाभूत सुविधा, वेगवान आणि सुसंगत कनेक्टिव्हिटी, एकल खिडकी प्रणालीद्वारे

 उद्योगवृद्धीसाठी आधुनिक पायाभूत सुविधावेगवान आणि सुसंगत कनेक्टिव्हिटीएकल खिडकी प्रणालीद्वारे उद्योग सुलभता आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी करण्यात येणारे सामंजस्य करार हे महत्त्वाचे घटक ठरत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सेंटर क्षेत्रातील संधीऔद्योगिक समूह विकासलॉजिस्टिक सक्षमता आणि कौशल्य विकास या विषयांवरही परिषदेत सखोल चर्चा झाली.

राज्यात सुरू असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळअटल सेतू आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग यांसारख्या उपक्रमांमुळे उद्योगांना सुलभ कनेक्टिव्हिटी मिळून गुंतवणुकीला चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच MMRDA, CIDCO, MIDC आणि MSRDC यांच्या माध्यमातून विकसित होत असलेल्या औद्योगिक क्षेत्रांमुळे राज्यातील रोजगारनिर्मिती आणि आर्थिक प्रगतीला गती मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या परिषदेत मांडलेल्या विचारांतून राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधून उद्योगांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यावर भर देण्यात आला. पायाभूत सुविधातंत्रज्ञानशाश्वत विकास आणि गुंतवणूक अनुकूल धोरणे यांच्या बळावर महाराष्ट्र उद्योगनवकल्पना आणि आर्थिक प्रगतीच्या दिशेने अधिक वेगाने वाटचाल करेलअसा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

000

विकसित महाराष्ट्र’साठी पायाभूत संस्थांची ठोस दिशा: ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन परिषदेत विकासदृष्टी सादर

 विकसित महाराष्ट्रसाठी पायाभूत संस्थांची ठोस दिशा: ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन परिषदेत विकासदृष्टी सादर

मुंबईदि. 19 : परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आयोजित ग्लोबल इकॉनॉमिक को-ऑपरेशन परिषदेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पायाभूत व औद्योगिक संस्थांच्या प्रमुखांनी राज्याच्या उद्योगविकासगुंतवणूक वाढ आणि विकसित महाराष्ट्र’ या ध्येयपूर्तीसाठी ठोस दिशा मांडली.

मुंबई येथे आयोजित ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन परिषदेत विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाडशहर व औद्योगिक विकास महामंडळाचे (CIDCO) व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघलमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळचे (MIDC) सह मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कुणाल खेमनार आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य गुंतवणूक व नियोजन अधिकारी (MMRDA) डॉ.शंकर देशपांडे यांनी सहभाग घेत राज्यातील चालू व नियोजित विकास प्रकल्पांची माहिती दिली.

मुंबई उपनगर जिल्हा : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य पदयात्रा उत्साहात संपन्न

मुंबई उपनगर जिल्हा : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त

भव्य पदयात्रा उत्साहात संपन्न

मुंबई दि. 19 : मुंबई उपनगर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयजिल्हा प्रशासन मुंबई उपनगर जिल्हा व माय भारत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य पदयात्रा उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरित्या पार पडली.

वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पार पडलेल्या कार्यक्रमात शिवरायांच्या पराक्रमावर आधारित प्रभावी पथनाट्यमर्दानी व पारंपरिक खेळांचे सादरीकरण तसेच ढोल-ताशांच्या गजरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे मन वेधले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि निवासी जिल्हाधिकारी सतीश बागल यांची प्रमुख उपस्थिती होती.

पदयात्रेत नॅशनल कॅडेट कॉप्रस, नॅशनल सर्व्हिस स्किम, भारत स्काऊटस ॲण्ड गाईडस (National Cadet Corps, National Service Scheme, Bharat Scouts and Guides) विविध लेझीम पथके तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या उपक्रमातून युवकांमध्ये राष्ट्रप्रेमशौर्य आणि सामाजिक एकात्मतेचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.

000

उद्योगवृद्धीसाठी आधुनिक पायाभूत सुविधा, वेगवान आणि सुसंगत कनेक्टिव्हिटी, एकल खिडकी प्रणालीद्वारे

 उद्योगवृद्धीसाठी आधुनिक पायाभूत सुविधावेगवान आणि सुसंगत कनेक्टिव्हिटीएकल खिडकी प्रणालीद्वारे उद्योग सुलभता आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी करण्यात येणारे सामंजस्य करार हे महत्त्वाचे घटक ठरत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सेंटर क्षेत्रातील संधीऔद्योगिक समूह विकासलॉजिस्टिक सक्षमता आणि कौशल्य विकास या विषयांवरही परिषदेत सखोल चर्चा झाली.

राज्यात सुरू असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळअटल सेतू आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग यांसारख्या उपक्रमांमुळे उद्योगांना सुलभ कनेक्टिव्हिटी मिळून गुंतवणुकीला चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच MMRDA, CIDCO, MIDC आणि MSRDC यांच्या माध्यमातून विकसित होत असलेल्या औद्योगिक क्षेत्रांमुळे राज्यातील रोजगारनिर्मिती आणि आर्थिक प्रगतीला गती मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या परिषदेत मांडलेल्या विचारांतून राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधून उद्योगांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यावर भर देण्यात आला. पायाभूत सुविधातंत्रज्ञानशाश्वत विकास आणि गुंतवणूक अनुकूल धोरणे यांच्या बळावर महाराष्ट्र उद्योगनवकल्पना आणि आर्थिक प्रगतीच्या दिशेने अधिक वेगाने वाटचाल करेलअसा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

Featured post

Lakshvedhi