Wednesday, 18 February 2026

पर्यावरण विभागाचे दोन महत्त्वाचे सामंजस्य करार, दोन मार्गदर्शक अहवाल प्रसिद्ध पीईटी बाटल्यांच्या संकलन-पुनर्वापरासाठी पर्यावरण विभाग व कोकाकोला यांच्यात देशातील पहिला सामंजस्य करार

 पर्यावरण विभागाचे दोन महत्त्वाचे सामंजस्य करारदोन मार्गदर्शक अहवाल प्रसिद्ध

पीईटी बाटल्यांच्या संकलन-पुनर्वापरासाठी पर्यावरण विभाग व

कोकाकोला यांच्यात देशातील पहिला सामंजस्य करार

 

मुंबईदि. १८ :- हवामान बदलाचा मुकाबला आणि चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व राज्य हवामान कृती कक्षाने मुंबई क्लायमेट वीक २०२६ दरम्यान दोन महत्त्वाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राज्य हवामान कृती कक्षाने क्लायमेट ट्रेड एलएलपी सोबत आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने हिंदुस्थान कोकाकोला बेव्हरेज कंपनीसोबत महा-आरईपीटी अभियान राबविण्यासंदर्भात करार केला. पीईटी बाटल्यांचे संकलन व पुनर्वापरासाठी पहिल्यांदाच देशात कोकाकोला कंपनीने राज्य शासनासोबत सामंजस्य करार केला आहे.

पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोजवातावरणीय बदल कक्षाचे संचालक अभिजित घोरपडे यांनी या करारावर स्वाक्षरी केल्या.

पर्यावरण संवर्धनाची संकल्पना स्थानिक पातळीवर रुजून

 पर्यावरण संवर्धनाची संकल्पना स्थानिक पातळीवर रुजून ती जागतिक चळवळ बनावी, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी मार्गदर्शन, तांत्रिक सहकार्य आणि गुंतवणुकीसाठी सक्षम व्यासपीठ निर्माण करण्यावर भर दिला. या उपक्रमातून विश्वासार्ह आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीयोग्य उपायांना चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

जेसन नॉफ म्हणाले कीज्याप्रमाणे मानवाने चंद्रावर पाऊल ठेवण्याचे धाडसी ध्येय गाठलेतसेच पृथ्वी वाचवण्यासाठी आता मोठ्या आणि  आहे. भारताने या उपक्रमात सर्वाधिक विजेते देऊन आपले जागतिक नेतृत्व सिद्ध केले असल्याचे जेसन नॉफ यांनी सांगितले.

पर्यावरण संवर्धन हे आर्थिक विकासाला चालना देणारे

 पर्यावरण संवर्धन हे आर्थिक विकासाला चालना देणारे आहे, हे भारताने जगाला दाखवून दिले आहे. कचरा व्यवस्थापनासाठी वैज्ञानिक पद्धती, चक्रीय अर्थव्यवस्था आणि कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती यांवर भर दिला जात असून स्थानिक स्वराज्य संस्था यासाठी सक्रिय आहेत. यामुळे ऊर्जा स्वावलंबन साध्य होण्यास मदत होईल, असे मंत्री मुंडे यांनी सांगितले.

निसर्गवनसंपदा आणि जैवविविधतेचे संरक्षण हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. महाराष्ट्राची विस्तीर्ण किनारपट्टी लक्षात घेता सागरी किनारी पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य दिले जात असून नैसर्गिक उपाययोजनांद्वारे हवामान बदलाला सामोरे जाण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले.

अर्थशॉट उपक्रमाने स्वच्छ हवा, कचरामुक्त जग, निसर्ग संवर्धन, सागरी परिसंस्थेचे पुनरुज्जीवन

 मंत्री मुंडे म्हणाल्या, अर्थशॉट उपक्रमाने स्वच्छ हवा, कचरामुक्त जग, निसर्ग संवर्धन, सागरी परिसंस्थेचे पुनरुज्जीवन आणि हवामान सुधारणा या पाच महत्त्वाच्या उद्दिष्टांना प्राधान्य दिले आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करताना स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा आणि स्वच्छ माती या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यास पर्यावरणाचे नैसर्गिक संरक्षण होते.

विकासासोबत जबाबदारीही येतेहे लक्षात घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करून मंत्री मुंडे म्हणाल्या कीऔद्योगिक आणि तांत्रिक प्रगतीमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा गांभीर्याने विचार करूनच पुढील वाटचाल करावी लागेल. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावर सुरू होणाऱ्या कृतींचा जागतिक पातळीवर सकारात्मक प्रभाव पडू शकतोअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जगप्रसिद्ध 'द अर्थशॉट प्राइज' या जागतिक पर्यावरणीय

 जगप्रसिद्ध 'द अर्थशॉट प्राइज' या जागतिक पर्यावरणीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नोव्हेंबर 2026 मध्ये मुंबईत होणार असल्याची अधिकृत घोषणा यावेळी करण्यात आली.

भारतात प्रथमच अर्थ शॉट प्राईज उपक्रम होत असल्याचा आनंद व्यक्त करत पर्यावरण मंत्री श्रीमती मुंडे यांनी या आयोजनासाठी सर्व सहभागी व आयोजकांचे आभार मानले.

स्वच्छ हवा, ऊर्जा आणि वाहतूक व्यवस्थेला राज्य शासनाचे प्राधान्य

 पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत अर्थ शॉट प्राईज कार्यक्रमाची घोषणा

स्वच्छ हवाऊर्जा आणि  वाहतूक व्यवस्थेला राज्य शासनाचे प्राधान्य

-         पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

 

मुंबईदि. 18 : राज्य शासन स्वच्छ हवास्वच्छ ऊर्जा आणि स्वच्छ वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देत असल्याचे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

मुंबई क्लायमेट वीकदरम्यान आयोजित अर्थशॉट प्राईज उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी अर्थशॉट प्राइजचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेसन नॉफपर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज आदी उपस्थित होते.

 जगप्रसिद्ध 'द अर्थशॉट प्राइजया जागतिक पर्यावरणीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नोव्हेंबर 2026 मध्ये मुंबईत होणार असल्याची अधिकृत घोषणा यावेळी करण्यात आली.

विवेक भीमनवार लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी लोकभवन येथे राज्यपालांकडून शपथ

 विवेक भीमनवार लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी

लोकभवन येथे राज्यपालांकडून शपथ

 

मुंबई, दि. 18 : भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी विवेक भीमनवार यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदाची शपथ देण्यात आली.

लोकभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भीमनवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

शपथविधीनंतर राज्यपालमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी भीमनवार यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

भीमनवार यांची नियुक्ती सहा वर्षांच्या कालावधीसाठी किंवा ते वयाची ६२ वर्षे पूर्ण करेपर्यंत (जे अगोदर येईल तेथपर्यंत) करण्यात आली आहे.

शपथविधी सोहळ्याला आयोगाचे माजी अध्यक्ष रजनीश सेठकार्यवाहू अध्यक्ष डॉ अभय वाघआयोगाचे सदस्यमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशीशासनाचे अधिकारी तसेच भीमनवार यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

सुरुवातीला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी विवेक भीमनवार  यांच्या नियुक्तीची सामान्य प्रशासन विभागाची अधिसूचना वाचली. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार शपथविधी सोहळ्याची सुरुवात वंदेमातरमराष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर समारोप वंदेमातरम व राष्ट्रगीताने झाला.

Featured post

Lakshvedhi