Wednesday, 18 February 2026

यंदाच्या अर्थसंकल्पातही स्टार्टअप परिसंस्था बळकट करण्यावर भर

 विकसित भारताच्या प्रवासाला स्टार्टअपचे इंजिन आवश्यक आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पातही स्टार्टअप परिसंस्था बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच कंटेंटनिर्मिती मजबूत करण्यासाठी १५ हजार शाळा आणि ५०० महाविद्यालयांमध्ये 'कंटेंट क्रिएटर लॅब्सस्थापन केल्या जाणार आहे. एआयक्वांटमबायोटेकसेमीकंडक्टर आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात मिशन मोडमध्ये काम सुरू आहे. तसेच वस्त्रोद्योगरसायनक्रीडा साहित्यइलेक्ट्रॉनिक्स आणि पायाभूत सुविधा अशा प्रत्येक क्षेत्रात स्टार्टअपला चालना दिली जात आहे. महिला नेतृत्वाखालील संशोधन आणि स्टार्टअप मध्ये भारत जगात आदर्श उदाहरण बनत असल्याचेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

भारतीय 'स्टार्टअप' मध्ये जागतिक आव्हानांवर मात करण्याची क्षमता

 भारतीय 'स्टार्टअपमध्ये जागतिक आव्हानांवर मात करण्याची क्षमता

-         प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

·         भारत जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था

मुंबईदि. १७ : जगासमोर सध्या बऱ्याच क्षेत्रात अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांवर मात करण्याची क्षमता भारतीय स्टार्टअप मध्ये आहे. भारत हा जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअपची परिसंस्था बनला आहेअसे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ताजमहाल हॉटेल मधील क्रिस्टल सभागृहात आयोजित भारत - फ्रान्स स्टार्टअप मंचच्या कार्यक्रम प्रसंगी काढले. यावेळी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रोन उपस्थित होते.             

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणालेभारत आणि फ्रान्स पुन्हा जूनमध्ये भारत इनोव्हेट्स २०२६अंतर्गत आयोजित कार्यक्रमात फ्रान्समध्ये  एकत्र येणार आहेत. यावेळी हवामान बदलसुरक्षाआरोग्य या क्षेत्रात समाधान शोधत असलेले भारतातील बेस्ट स्टार्टअपजगासमोर आणण्यात येतील. अटल इनोव्हेशन मिशन २४ फेब्रुवारी रोजी दशक पूर्ण करणार आहे. या मिशन अंतर्गत १० हजार पेक्षा जास्त टिंकरिंग प्रयोगशाळांच्या माध्यमातून १ कोटीहून अधिक विद्यार्थी स्टार्टअपसोबत कार्यरत आहेत. तसेच १०० हून अधिक इन्क्युबेटर्स आणि अनेक एडटेक स्टार्टअप्स या मोहिमेशी जोडलेले आहेत. यावेळी उपस्थित उद्योजकांना अटल इनोव्हेशन मिशनमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही प्रधानमंत्री मोदी यांनी केले.

Tuesday, 17 February 2026

थीम साँग, माहितीपटाद्वारे प्रचार-प्रसिध्दी

 थीम साँग, माहितीपटाद्वारे प्रचार-प्रसिध्दी

याशिवाय व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून २०० शाळा जोडण्यात आल्या असूनथीम साँग आणि माहितीपटाद्वारे विद्यार्थ्यांना कार्यक्रमाची माहिती देण्यात येत आहे. चेंबूरदेवनार आणि मानखुर्द येथून नवी मुंबईकडे जाणाऱ्या भाविकांसाठी वाहतूक व सुरक्षा व्यवस्थेची तयारी करण्यात आली आहे.

या शहीदी समागमाच्या निमित्ताने सिखसिकलगरबंजारालबानासिंधीमोहयालवाल्मीकीउदासीन आणि वारकरी संप्रदायातील प्रतिनिधी सुमारे ३०० वर्षांनंतर एकत्र येणार असूनराष्ट्रीय एकात्मतेचा संदेश या कार्यक्रमातून दृढ होणार आहे. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावेअसे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. बैठकीत विविध विभागांकडून करण्यात येणाऱ्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

 

यावेळी पश्चिम उपनगरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगेसहा.जनसंपर्क अधिकारी बृह्न्मुंबई महानगरपालिका विवेक राठोड, उपविभागीय अधिकारी पूर्व उपनगर कल्पना गोडे, तहसिलदार (महसूल) युवराज बांगर, तहसिलदार बोरीवली मुंबई उपनगर इरेश चप्पलवारशासकीय सदस्यतहसिलदार अंधेरी स्नेहलता स्वामीशासकीय सदस्यनायब तहसिलदार कुर्ला सुनिल कापडनिसमनमोहन सिंगसुखविंदर सिंग चेंबुरकॅम्पगुरपिंदर सिंगगुरू नानक सभा आदिसंह अधिकारी उपस्थित होते.

मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमानिमित्त दोन दिवसीय व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात येणार

 मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘हिंद दी चादर’ कार्यक्रमानिमित्त

 दोन दिवसीय व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात येणार

-जिल्हाधिकारी सौरभ कटियार

·         वक्तृत्व, निबंध व घोषवाक्य स्पर्धेचेही आयोजन

 

मुंबईदि. १६ : संतांच्या भूमीत गुरू तेग बहादुर यांच्या गौरवशाली शहादतीच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी ओवे मैदानखारघर (नवी मुंबई) येथे भव्य शहिदी समागम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंद दी चादर’ गुरू तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या कार्यक्रमानिमित मुंबई उपनगर जिल्ह्यात दोन दिवसीय व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात येणार असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी दिले.

कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसंदर्भात मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाडनिवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागलआरोग्यशिक्षणपोलीस विभागांचे प्रतिनिधी आणि गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कटीयार म्हणाले कीसंस्कृती रक्षण आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी गुरू तेग बहादुर यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे. त्यांच्या शहादतीचा इतिहास शाळामहाविद्यालयेसंस्था आणि गुरुद्वारांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यात ३ लाख २० हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वक्तृत्वनिबंध व घोषवाक्य स्पर्धा तसेच प्रभातफेरीद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई ‘गट-ड’ भरतीची निवड यादी प्रसिद्ध; लवकरच होणार समुपदेशन

 नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई गट-ड’ भरतीची निवड यादी प्रसिद्ध;

लवकरच होणार समुपदेशन

 

मुंबईदि. 17 : नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई गट-ड’ संवर्गातील २८४ पदांच्या भरती प्रक्रियेतील अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांना आता नियुक्तीपूर्वी समुपदेशनासाठी  बोलविण्यात  येणार आहे.

 

            नोंदणी व मुद्रांक विभागात रिक्त असलेल्या २८४ पदांसाठी जुलै २०२५ मध्ये आयबीपीएस कंपनीमार्फत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल २० ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतरगुणवत्ता आणि सामाजिक व समांतर आरक्षणानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया राबविण्यात आली होती.

 

            उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणीअंती निवड यादी व प्रतीक्षा यादी,निवडीसाठी नकार दिलेल्या उमेदवारांची यादीअपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी, तसेच कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर राहिलेल्या उमेदवारांची यादी दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

 

समुपदेशन प्रक्रिया

            निवड यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी त्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. या समुपदेशनासाठीचा दिनांक आणि ठिकाण लवकरच विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईलअशी माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे

भारतीय टपाल विभागाने काढलेल्या विशेष टपाल तिकिटाचे तसेच हवामान बदल

 मुंबई क्लायमेट वीकनिमित्ताने भारतीय टपाल विभागाने काढलेल्या विशेष टपाल तिकिटाचे तसेच हवामान बदल विषयक अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस व केंद्रीय मंत्री श्री. जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व संयुक्त राष्ट्र संघ पर्यावरण कार्यक्रम यांच्यात मुंबई हवामान अनुकूल आराखडे तयार करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व सी ४० सिटीज क्लायमेट लिडरशिप ग्रुप यांच्यातही हवामान बदल व शहरी उपाय योजना बळकट करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला.

मुंबई क्लायमेट वीकनिमित्ताने भारतीय टपाल विभागाने काढलेल्या विशेष टपाल तिकिटाचे तसेच हवामान बदल

 मुंबई क्लायमेट वीकनिमित्ताने भारतीय टपाल विभागाने काढलेल्या विशेष टपाल तिकिटाचे तसेच हवामान बदल विषयक अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस व केंद्रीय मंत्री श्री. जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व संयुक्त राष्ट्र संघ पर्यावरण कार्यक्रम यांच्यात मुंबई हवामान अनुकूल आराखडे तयार करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व सी ४० सिटीज क्लायमेट लिडरशिप ग्रुप यांच्यातही हवामान बदल व शहरी उपाय योजना बळकट करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला.

Featured post

Lakshvedhi