Sunday, 15 February 2026

अफवांवर विश्वास नको

 अफवांवर विश्वास नको

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्राला जागतिक स्पर्धेपासून सुरक्षित ठेवले आहे. भारत- अमेरिका करारात सोयाबीन किंवा कापूस आयातीचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे बाहेरील माल येऊन भाव पडतीलया अफवांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये," असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. याउलट भारतीय शेतकऱ्यांना अमेरिकेची मोठी बाजारपेठ आता खुली झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

तंत्रज्ञानाची कास: AI आणि एम्ब्रियो ट्रान्सप्लांट

 तंत्रज्ञानाची कास: AI आणि एम्ब्रियो ट्रान्सप्लांट

दुग्ध व्यवसायातील तफावत मांडताना मुख्यमंत्री म्हणाले, "पंजाबमध्ये गाय 10-15 लिटर दूध देतेतर आपल्याकडे 2.5 लिटर ही तफावत भरून काढण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत.  पशुधन संवर्धन,  आरोग्य व अचूक निरीक्षण आणि उत्पादकता वाढविण्यासाठी 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मिशनचा वापर करण्यात येईल. एम्ब्रियो ट्रान्सप्लांट आणि सेक्स-सॉर्टेड सीमेन तंत्रज्ञानाद्वारे उच्च दर्जाच्या कालवडींची पैदास वाढवून दुग्धोत्पादन वाढवले जाईल. यासाठी विदर्भ- मराठवाड्यात 'मदर्स डेअरीसोबत करार देखील करण्यात आला आहे.

शेतीला 'क्लायमेट रिस्क' मधून वाचवणार

 शेतीला 'क्लायमेट रिस्कमधून वाचवणार

मुख्यमंत्री म्हणाले, "हे प्रदर्शन कोरडवाहू शेतीतील हवामान जोखीम (Climate Risk) कमी करण्यासाठी उचललेले एक धोरणात्मक पाऊल आहे. पिकांचे नुकसान झाले तर पशुधन हेच शेतकऱ्यासाठी आधार म्हणून काम करते. त्यामुळेच आम्ही गाईला केवळ धार्मिक महत्त्व न देता तिचे आर्थिक योगदान लक्षात घेऊन राज्यमाता’ दर्जा दिला आहे."

पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणार

 पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणार

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'महा पशुधन एक्स्पो’ 2026 ला मुख्यमंत्र्यांची भेट

मंत्री पंकजा मुंडेंची 'पशुधन उद्योजकयोजनेची घोषणा

परळी वैजनाथ (दि. 14): "आमची माय आणि आमची माती हेच आमचे खरे प्रेम आहे. ज्याप्रमाणे शिवशंभूंच्या दर्शनापूर्वी नंदीला वंदन करण्याची आपली संस्कृती आहेत्याच धर्तीवर पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून आम्ही ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळकट करत आहोत. तंत्रज्ञानाच्या जोडणीतून हे क्षेत्र महाराष्ट्राला जागतिक स्तरावर दुग्ध उत्पादनात अग्रेसर करेल," असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

परळीतील अंबेजोगाई रस्ता लगत असलेल्या ओपळे मैदानावर पशुसंवर्धन विभाग आयोजित तीन दिवसीय महा पशुधन एक्स्पोच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. 

*आज श्री समर्थ रामदास स्वामी रचित श्री शंकराच्या आरतीचा भावार्थ पाहुयात...*

 *आज श्री समर्थ रामदास स्वामी रचित श्री शंकराच्या आरतीचा भावार्थ पाहुयात...*


लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा

लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा॥१॥


जय देव जय देव जय श्रीशंकरा, आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा

जय देव जय देव ॥धृ॥


कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा

विभुतीचे उधळण शितकंठ नीळा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा ॥२॥


जय देव जय देव जय श्रीशंकरा, आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा

जय देव जय देव ॥धृ॥


देवी दैत्यी सागरमंथन पै केले, त्यामाजी अवचित हळहळ जे उठले

ते त्वा असुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥३॥


जय देव जय देव जय श्रीशंकरा, आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा

जय देव जय देव ॥धृ॥


व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी

शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुलटिळक रामदासा अंतरी॥४॥


जय देव जय देव जय श्रीशंकरा, आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा

जय देव जय देव ॥धृ॥


पुणे जिल्ह्यात जेजुरी गडाजवळ लवथळेश्वराचे मंदीर आहे...

समर्थ जेंव्हा लवथळेश्वराच्या दर्शनास आले तेंव्हा त्यांना जी आरती सुचली तीच आपण रोज म्हणतो! बरेचदा केवळ पाठ झाल्याने आपण आरत्या गातो, तिचा अर्थ ठाऊक असेल तर मात्र ती अधीक आर्ततेने करता येईल!


लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।


ब्रह्मांडातील ग्रहता-यांच्या, आकाशमालांच्या माळा तुझ्या गळ्यात लवथवत आहेत, डोलत, वळवळत आहेत!


वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥


समुद्रमंथनातून आलेले विष प्राशन करून तुझा कंठ काळवंडला आहे, तुझ्या तीन्ही नेत्रातून भयानक ज्वाळा बाहेर पडत आहेत!


लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।


अतीशय लावण्यवती, सुंदर अशी बाळा, कन्या, स्त्री तुझ्या मस्तकावर आहे (गंगा)


तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥


तिथून अतीशय निर्मळ अशा गंगाजलाचा झरा वाहातो आहे!


जय देव जय देव जय श्रीशंकरा ।


हे शंकरा तुझा जयजयकार असो!


आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥


कापरासाख्या गो-या वर्णाच्या तुझी आम्ही आरती ओवाळतो!


कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।


हे कर्पुरगौर शंकरा, तु भोळा आहेस, विशाल नेत्र असलेला आहेस...


अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥


तुझी अर्धांगिनी पार्वती (शक्ती) ही जणु तुझे (शिवाचे) अर्धे अंगच आहे,

तुझ्या गळ्यात फ़ुलांच्या माळा आहेत.


विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।


चिताभस्माची उधळण अंगभर केलेल्या तुझा कंठ विषप्राशनाने काळा-निळा (शिति) पडलेला आहे... 


ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥


असा तु उमेवर अत्यंत प्रेम करणारा शोभत आहेस!


देवीं दैत्यीं सागरमंथन पै केलें ।त्यामाजीं अवचित हलहल ते उठिलें ॥


देव आणि दैत्य यांनी जेंव्हा समुद्रमंथन केले तेंव्हा त्यातून अचानक हलाहल नामक विष बाहेर पडले...


तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥


ते तू आसुरी वृत्ती धारण करून प्राशन केल्यानेच तुला मिळकंठ या नावाने प्रसिद्धी मिळाली...


व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।


वाघाचे कातडे ल्यालेल्या, नागबंध धारण केलेल्या, सुंदर रुप असलेल्या, मदनाचा संहार केलेल्या...


पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥


पाच मुखे असणा-या, मनमोहका, मुनीजनांना आनंद देणा-या...


शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।


शतकोटी नामांचा जो बीज मंत्र, तो "श्रीराम जय राम जय जय राम " हा मंत्र सतत वाचेने उच्चारणा-या...


रघुकुलतिलक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥


आणि त्या रामनाम उच्चारणाने साक्षात रामरूप झालेल्या हे शंकरा. रघुकुलतिलका, तुला रामदासाचा अंत:करण पूर्वक नमस्कार असो !!

Saturday, 14 February 2026

भायखळ्यातील गिरणी परिसरात जागतिक दर्जाचे टेक्सटाईल क्राफ्ट आणि कल्चरल म्युझियम उभारण्याला गती

 भायखळ्यातील गिरणी परिसरात जागतिक दर्जाचे टेक्सटाईल क्राफ्ट आणि

कल्चरल म्युझियम उभारण्याला गती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला मूर्त रूप

 

मुंबईदि. 14 : भायखळा परिसरातील ऐतिहासिक इंडिया युनायटेड गिरणी जागेवर अत्याधुनिक टेक्सटाईलक्राफ्ट आणि कल्चरल म्युझियम प्रकल्प उभारण्याच्या कामांना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पना आणि पुढाकारातून विकसित होणारा हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येणार असूनया संदर्भातील सामंजस्य करार झाला आहे

मुंबईच्या समृद्ध वस्त्रोद्योग वारशाचे जतनपुनरुज्जीवन आणि सांस्कृतिक पुनरुत्थान साधण्याचे ध्येय या भव्य प्रकल्पामागे आहे. मुंबई महानगरपालिकानॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन (एनटीसी) आणि जिंदाल साऊथ वेस्ट (जेएसडब्लू) फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येत असूनसुमारे चार हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे हे गिरणी प्रांगण जागतिक दर्जाच्या सांस्कृतिक केंद्रात रूपांतरित होणार आहे.

या प्रकल्पांतर्गत आकर्षक गॅलरीकला स्टुडिओपरफॉर्मन्स स्पेसेसखुल्या जागेतील शिल्प उद्यानरेस्टॉरंट्स व कॅफेकार्यशाळा व कार्यक्रमांसाठी स्वतंत्र सेक्शन्स अशा बहुउद्देशीय आणि आधुनिक सुविधांचा समावेश असणार आहे. संग्रहालयाला लिव्हिंग म्युझियम म्हणून विकसित करण्यात येणार असूनजुन्या गिरणीचा ऐतिहासिक औद्योगिक वारसा जतन करत आधुनिक सांस्कृतिक वातावरणाची सांगड घातली जाणार आहे.

या प्रकल्पाचे संपूर्ण काम जेएसडब्ल्यू फाउंडेशन विनालाभ पद्धतीने करीत असूनसंग्रहालयातून प्राप्त होणारे उत्पन्न देखभाल व सार्वजनिक उपक्रमांसाठी वापरले जाणार आहे.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता 21 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता

21 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबईदि. 14 : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत देण्यात येणारे महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारनटराज पुरस्कारविश्वकर्मा पुरस्कार आणि क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार या पुरस्कारासाठी सन 2025-26 वर्षाकरिता इच्छुक व्यक्ती तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी व्यक्ती व संस्थांनी 21 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज करावे असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक मुंबई शहर प्रसाद खैरनार यांनी केले आहे. 

 

पुरस्कारासाठी अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहेतअर्जदार व्यक्तीसंस्था महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराने संबंधित समाजाच्या शैक्षणिकसामाजिकसांस्कृतिकआर्थिक अथवा अन्य क्षेत्रातील उत्थानासाठी सलग व उल्लेखनीय स्वरूपाचे कार्य केलेले असावे. अर्ज विहित नमुन्यात करणे बंधनकारक असून शासन निर्णयात नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रेकार्याचा सविस्तर अहवालशिफारस पत्रे व प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अपूर्णचुकीची माहिती असलेले अथवा मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत. पुरस्काराबाबत अंतिम निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

 

अर्जाचा नमुनाशासन निर्णयातील सविस्तर अटी व शर्ती तसेच पुरस्कारांबाबतची अधिक माहिती सहाय्यक संचालकइतर मागास बहुजन कल्याणमुंबई शहर (चौथा मजलानवीन प्रशासकीय इमारतआर.सी. चेंबुरकर मार्गचेंबुर पुर्व 400071) येथे उपलब्ध असून दि. 21 फेब्रुवारी 2026 सायं. पाच वाजेपर्यंत संबंधित पुरस्कारासाठीचे प्रस्ताव या कार्यालयास करणे आवश्यक आहे. पात्र व इच्छुक व्यक्ती व संस्थांनी विहित मुदतीत प्रस्ताव करावेतअसे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

0000

Featured post

Lakshvedhi