Sunday, 15 February 2026

तंत्रज्ञानाची कास: AI आणि एम्ब्रियो ट्रान्सप्लांट

 तंत्रज्ञानाची कास: AI आणि एम्ब्रियो ट्रान्सप्लांट

दुग्ध व्यवसायातील तफावत मांडताना मुख्यमंत्री म्हणाले, "पंजाबमध्ये गाय 10-15 लिटर दूध देतेतर आपल्याकडे 2.5 लिटर ही तफावत भरून काढण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत.  पशुधन संवर्धन,  आरोग्य व अचूक निरीक्षण आणि उत्पादकता वाढविण्यासाठी 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मिशनचा वापर करण्यात येईल. एम्ब्रियो ट्रान्सप्लांट आणि सेक्स-सॉर्टेड सीमेन तंत्रज्ञानाद्वारे उच्च दर्जाच्या कालवडींची पैदास वाढवून दुग्धोत्पादन वाढवले जाईल. यासाठी विदर्भ- मराठवाड्यात 'मदर्स डेअरीसोबत करार देखील करण्यात आला आहे.

थेट विक्री क्षेत्रातील विश्वासार्हता वाढवण्यासाठी शासन आणि उद्योग क्षेत्राने एकत्रितपणे काम करणे आवश्यक

 थेट विक्री क्षेत्रातील विश्वासार्हता वाढवण्यासाठी

शासन आणि उद्योग क्षेत्राने एकत्रितपणे काम करणे आवश्यक

            -अतिरिक्त मुख्य सचिव  अनिल डिग्गीकर

 

·         थेट विक्री क्षेत्रात महाराष्ट्र देशात अग्रेसरमुंबईत 'महाविकास २०२६परिषद

 

मुंबई,, दि १४ :  सुरक्षित आणि पारदर्शक बाजारपेठ निर्माण करण्यामध्ये ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव असणे आणि कंपन्यानी त्यादृष्टीने योग्य सेवा देण्यासाठी बांधील असणे गरजेचे आहे. यासाठी थेट विक्री क्षेत्रातील विश्वासार्हता वाढवण्यासाठी  शासन आणि उद्योग क्षेत्राने एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी सांगितले.

मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे 'महाविकास-२०२६या विशेष संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले. राज्यातील ग्राहक संरक्षण चळवळ बळकट करण्यासाठी आणि थेट विक्री क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी भारतीय थेट विक्री संघ (आयडीएसएआणि अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले.

मुंबईतील विस्मृतीत गेलेल्या गिरण्यांचा वारसा नव्या पिढीसमोर आणण्यासोबतच

 या प्रकल्पांतर्गत आकर्षक गॅलरीकला स्टुडिओपरफॉर्मन्स स्पेसेसखुल्या जागेतील शिल्प उद्यानरेस्टॉरंट्स व कॅफेकार्यशाळा व कार्यक्रमांसाठी स्वतंत्र सेक्शन्स अशा बहुउद्देशीय आणि आधुनिक सुविधांचा समावेश असणार आहे. संग्रहालयाला लिव्हिंग म्युझियम म्हणून विकसित करण्यात येणार असूनजुन्या गिरणीचा ऐतिहासिक औद्योगिक वारसा जतन करत आधुनिक सांस्कृतिक वातावरणाची सांगड घातली जाणार आहे.

या प्रकल्पाचे संपूर्ण काम जेएसडब्ल्यू फाउंडेशन विनालाभ पद्धतीने करीत असूनसंग्रहालयातून प्राप्त होणारे उत्पन्न देखभाल व सार्वजनिक उपक्रमांसाठी वापरले जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या 'शहरी वारसा संवर्धन व सांस्कृतिक पुनरुत्थानया दृष्टीकोनाला हा प्रकल्प आधार देणारा असून मुंबईतील विस्मृतीत गेलेल्या गिरण्यांचा वारसा नव्या पिढीसमोर आणण्यासोबतच हा प्रकल्प महत्त्वपूर्ण शहरी पुनरुत्थानाचे आदर्श उदाहरण ठरेल या प्रकल्पाला अधिक गती देण्यासाठी या प्रकल्पाचे कालबद्ध नियोजन करावे आणि सर्व संबधित विभागाने सहकार्य करावे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत असे जेएसडब्ल्यू फाउंडेशनने स्पष्ट केले आहे.

भायखळ्यातील गिरणी परिसरात जागतिक दर्जाचे टेक्सटाईल क्राफ्ट आणि कल्चरल म्युझियम उभारण्याला गती

 भायखळ्यातील गिरणी परिसरात जागतिक दर्जाचे टेक्सटाईल क्राफ्ट आणि

कल्चरल म्युझियम उभारण्याला गती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला मूर्त रूप

 

मुंबईदि. 14 : भायखळा परिसरातील ऐतिहासिक इंडिया युनायटेड गिरणी जागेवर अत्याधुनिक टेक्सटाईलक्राफ्ट आणि कल्चरल म्युझियम प्रकल्प उभारण्याच्या कामांना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पना आणि पुढाकारातून विकसित होणारा हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात येणार असूनया संदर्भातील सामंजस्य करार झाला आहे

मुंबईच्या समृद्ध वस्त्रोद्योग वारशाचे जतनपुनरुज्जीवन आणि सांस्कृतिक पुनरुत्थान साधण्याचे ध्येय या भव्य प्रकल्पामागे आहे. मुंबई महानगरपालिकानॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन (एनटीसी) आणि जिंदाल साऊथ वेस्ट (जेएसडब्लू) फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येत असूनसुमारे चार हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे हे गिरणी प्रांगण जागतिक दर्जाच्या सांस्कृतिक केंद्रात रूपांतरित होणार आहे.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता 21 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता

21 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबईदि. 14 : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत देण्यात येणारे महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारनटराज पुरस्कारविश्वकर्मा पुरस्कार आणि क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार या पुरस्कारासाठी सन 2025-26 वर्षाकरिता इच्छुक व्यक्ती तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी व्यक्ती व संस्थांनी 21 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज करावे असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक मुंबई शहर प्रसाद खैरनार यांनी केले आहे. 

 

पुरस्कारासाठी अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहेतअर्जदार व्यक्तीसंस्था महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराने संबंधित समाजाच्या शैक्षणिकसामाजिकसांस्कृतिकआर्थिक अथवा अन्य क्षेत्रातील उत्थानासाठी सलग व उल्लेखनीय स्वरूपाचे कार्य केलेले असावे. अर्ज विहित नमुन्यात करणे बंधनकारक असून शासन निर्णयात नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रेकार्याचा सविस्तर अहवालशिफारस पत्रे व प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अपूर्णचुकीची माहिती असलेले अथवा मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत. पुरस्काराबाबत अंतिम निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.

 

अर्जाचा नमुनाशासन निर्णयातील सविस्तर अटी व शर्ती तसेच पुरस्कारांबाबतची अधिक माहिती सहाय्यक संचालकइतर मागास बहुजन कल्याणमुंबई शहर (चौथा मजलानवीन प्रशासकीय इमारतआर.सी. चेंबुरकर मार्गचेंबुर पुर्व 400071) येथे उपलब्ध असून दि. 21 फेब्रुवारी 2026 सायं. पाच वाजेपर्यंत संबंधित पुरस्कारासाठीचे प्रस्ताव या कार्यालयास करणे आवश्यक आहे. पात्र व इच्छुक व्यक्ती व संस्थांनी विहित मुदतीत प्रस्ताव करावेतअसे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

मुख्यमंत्री के भाषण के मुख्य बिंदु

 मुख्यमंत्री के भाषण के मुख्य बिंदु

·        उदगीर परियोजना: उदगीर के दूध पाउडर केंद्र को 100 करोड़ रुपये खर्च कर पुनः शुरू किया जाएगा।

·        प्राकृतिक खेती: रासायनिक उर्वरकों से बिगड़ी मिट्टी की गुणवत्ता सुधारने के लिए गोमूत्र और गोबर से बने जीवामृत’ को प्रोत्साहन।

·        स्वास्थ्य सेवा: राज्य के 2841 पशु चिकित्सालयों का आधुनिकीकरण और मोबाइल पशु एम्बुलेंस सेवा का विस्तार।

·        विकास दर: पशुसंवर्धन क्षेत्र की विकास दर 48% से बढ़ाकर 25% करने का लक्ष्य।

·        राष्ट्रीय पशुधन अभियान: महाराष्ट्र में 366 परियोजनाओं को स्वीकृति।

00000


गांव का युवा बनेगा ‘पशुधन उद्यमी

 गांव का युवा बनेगा पशुधन उद्यमी’ – पंकजा मुंडे

पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ने कहासिर्फ नौकरी की तलाश में न लगकर गांव के युवाओं को मालिक बनना चाहिए। इसके लिए हम जल्द ही मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्यमी योजना’ शुरू कर रहे हैं। महिलाओं को लखपति दीदी’ बनाने के लिए सरकार शून्य प्रतिशत ब्याज पर ऋण उपलब्ध करा रही है। उन्होंने बताया कि पशुसंवर्धन को कृषि का दर्जा देने वाला महाराष्ट्र देश का पहला राज्य है।

पूर्व मंत्री एवं विधायक धनंजय मुंडे ने बीड और परळी के विकास के लिए स्थायी निधि उपलब्ध कराने पर मुख्यमंत्री का आभार व्यक्त किया।

Featured post

Lakshvedhi